AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO | लेकाच्या लग्नात प्रफुल्ल पटेलांची धमाल, ‘जुम्मे की रात’वर सलमान-शिल्पा शेट्टीसोबत डान्स

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल पटेल यांचा मुलगा प्रजय याच्या लग्नानिमित्त (Praful Patel son wedding) जयपूरमध्ये (Jaipur) विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं.

VIDEO | लेकाच्या लग्नात प्रफुल्ल पटेलांची धमाल, 'जुम्मे की रात'वर सलमान-शिल्पा शेट्टीसोबत डान्स
Praful Patel Dance with Salman Khan
| Edited By: | Updated on: Dec 19, 2021 | 2:11 PM
Share

जयपूर: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल पटेल यांचा मुलगा प्रजय याच्या लग्नानिमित्त (Praful Patel son wedding) जयपूरमध्ये (Jaipur) विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं. जयपूरमध्ये प्रजयच्या लग्नाचा आनंद साजरा करण्यासाठी जयपूरच्या रामबाग पॅलेसमध्ये (Rambagh Palace) कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला उद्योगपती अनिल अंबानी (Anil Ambani), गौतम अदानी (Gautam Adani) यांच्यासह इतर उद्योगपती, सलमान खान, शिल्पा शेट्टीसह चित्रपट क्षेत्रातील अभिनेते आणि राजकीय नेते उपस्थित  होते. सर्व पक्षीय राजकीय नेत्यांची उपस्थिती या ठिकाणी पाहायला मिळाली. मुलाच्या लग्नामिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रुफल पटेल हे सलमान खान, शिल्पा शेट्टी यांच्यासोबत डान्स करताना दिसून आले.

प्रजय पटेल याच लग्न मुंबईतील ज्वेलरी व्यावसायिक शिरीष पुंगिलिया यांची मुलगी शिविका हिच्याशी झालं आहे. शिरीष हे मूळचे जयपूरचे असल्यानं त्यांनी लग्नाचे कार्यक्रम जयपूरमध्ये आयोजित केले होते. यामध्ये सहभागी होण्यासाठी बॉलिवूडचे कलाकार, राजकीय नेते, व्यावसायिक, क्रिकेटर आपल्या कुटुंबासह होते.

कोण कोण हजर होते?

प्रफुल पटेल यांच्या मुलाच्या लग्नानिमित्त करण्यात आलेल्या कार्यक्रमासाठी उद्योगपती सज्जन जिंदल, अदानी उद्योग समुहाचे गौतम अदानी, अनिल अंबानी आणि त्यांची पत्नी टीना अंबानी, भारती एअरटेलचे सुनील भारती, हिंदुजा समुहाचे श्रीचंद हिंदुजा देखील उपस्थित होते. वेदांत रिसोर्सेस लिमिटेडचे अनिल अग्रवाल, क्रिकेटर रवी शास्त्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ, महाराष्ट्राचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे या कार्यक्रमाला उपस्थित होते.

विमानतळावर तगडा बंदोबस्त

हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा, जया बच्चन, प्रफुल पटेल यांचे बंधू अमरिश पटेल, जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री डॉ. फारुख अब्दुल्ला, डॉ. केतन देसाई, भाजप नेते राजीव प्रताप रुडी देखील  समारंभात सहभागी झाले होते. जयपूर विमानतळावर यानिमित्त तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

इतर बातम्या:

नाशिक महापालिकेची प्रभागरचना फुटल्याचा आरोप; नगरसेवकाच्या घरात बसून स्वकियांचाही करेक्ट कार्यक्रम

Nashik | अंधेर नगरी चौपट राजा…गैरकारभाराचे बिंग फोडले म्हणून नाशिकमध्ये महिला वकिलावर भरदिवसा पेट्रोलहल्ला

NCP leader Praful Patel son wedding feast celebrated in Jaipur Pink City

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.