Loksabha election : बिहारमध्ये एनडीएचे जागावाटप ठरले, पाहा कोणाला किती जागा

बिहारमध्ये जागावाटप निश्चित झाले आहे. एनडीएनमध्ये सहा पक्ष असले तरी जागावाटप पूर्ण झाले असून भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. त्यापाठोपाठ जेडीयूला १६ जागा मिळाल्या आहेत. चिराग पासवान यांना देखील ५ जागा देण्यात आल्या आहेत. कशी आहेत बिहारमध्ये समीकरणं जाणून घ्या.

Loksabha election : बिहारमध्ये एनडीएचे जागावाटप ठरले, पाहा कोणाला किती जागा
Follow us
| Updated on: Mar 18, 2024 | 8:39 PM

पाटणा : लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. एनडीएचे बिहारमधील जागावाटप जाहीर झाले आहे. भाजप आणि मित्रपक्षांच्या उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. मित्रपक्षांच्या नेत्यांची आज दिल्लीत बैठक होत आहे. नितीश कुमार देखील दिल्लीत दाखल होत आहेत. आरएलजेपी नेते आणि केंद्रीय मंत्री पशुपती पारस हे नाराज असल्याचं म्हटलं जातं, पण बदललेल्या परिस्थितीत एनडीएकडे आता त्यांचे समाधान करण्याचा कोणताही मार्ग दिसत नाहीये.

जेडीयूला 1 जागा कमी

जेडीयूने 2019 ची लोकसभा निवडणूक भाजपसोबतच लढवली होती. भाजप आणि जेडीयूने प्रत्येकी १७ जागांवर उमेदवार उभे केले होते. जेडीयूचे 16 उमेदवार विजयी झाले होते. गेल्या वेळी एनडीएच्या घटक पक्षांची संख्या केवळ तीन असल्याने जागावाटपात कोणताही अडथळा नव्हता. LJP (अविभाजित) ने सहा जागा जिंकल्या होत्या आणि त्यांचे सर्व उमेदवार विजयी झाले होते. यावेळी एनडीएमध्ये सहा पक्ष आहेत. त्यामुळे बरेच विचारमंथन करावे लागले आहे. भाजप वगळता सर्वांच्याच जागा कमी झाल्या आहेत. यावेळी जेडीयूला 16 जागा मिळाल्या आहेत.

भाजप-जेडीयू जागांवर एकमत

जागावाटपात सर्वांनी भाजपला मोठ्या भावाच्या भूमिकेत ठेवले आहे. म्हणजे यावेळीही भाजपच्या सर्व १७ जागा अबाधित राहतील. मात्र, काही उमेदवार निश्चितच बदलले जाण्याची शक्यता आहे. भाजप आणि जेडीयूनेही काही जागांची अदलाबदल केली आहे. करकट आणि गया या जागा यापूर्वी जेडीयूकडे होत्या, ज्यामध्ये करकटची जागा उपेंद्र कुशवाह यांना देण्यात आली आहे, तर गयाची जागा जीतन राम मांझी यांच्या ‘हम’ पक्षाला देण्यात आली आहे. चिराग पासवान यांना पशुपती पारस कॅम्पच्या सर्व जागा मिळाल्या आहेत. आरएलजेपीच्या खासदार वीणा देवी यांनीही निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत.

चिराग पासवान यांना ५ जागा मिळाल्या

लोजप दोन गटात विभागला गेला आहे. त्यामुळे एका गटाचे नेते चिराग पासवान आणि दुसऱ्या गटाचे नेते पशुपती पारस आहेत. यावेळीही दोघांना मिळून केवळ सहा जागा मिळाल्या आहेत. फरक एवढाच की, गटबाजीतून पाच खासदार केंद्रात मंत्री झाले होते, मात्र जागावाटपात पशुपती पारस यांना एकही जागा देण्यात आलेली नाही. तर त्यांच्या गटाचे एकमेव खासदार असलेले चिराग पासवान यांना यावेळी पाच जागा मिळाल्या आहेत. चिराग यांना वैशाली, हाजीपूर, समस्तीपूर, खगरिया आणि जमुई या जागा मिळाल्या आहेत.

Non Stop LIVE Update
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर.
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी.
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार.
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत.
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले...
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले....
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो.
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो.
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका.
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले.
मुंबईकरांनो मोठी बातमी, मेट्रोने प्रवास करताय? तर ही बातमी वाचाच!
मुंबईकरांनो मोठी बातमी, मेट्रोने प्रवास करताय? तर ही बातमी वाचाच!.