AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Narendra Modi | पोटाचा प्रश्न, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या एका निर्णयामुळे शेजारच्या देशाची मोठी चिंता मिटली

Narendra Modi | धान्य पुरवठ्याच्या बाबतीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'या' देशाला मोठा दिलासा दिलाय. भारत सरकारच्या या निर्णयाचा जगातील अनेक देशांना फटका बसतोय.

Narendra Modi | पोटाचा प्रश्न, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या एका निर्णयामुळे शेजारच्या देशाची मोठी चिंता मिटली
PM narendra modi
| Updated on: Aug 07, 2023 | 12:24 PM
Share

नवी दिल्ली : सध्या टोमॅटोचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे जनता चांगलीच त्रस्त झाली आहे. त्यात आणखी कुठल्या फळ भाज्या किंवा धान्याचा तुटवडा निर्माण होऊ नये, यासाठी केंद्र सरकार सर्तक आहे. भारतात तांदळाच उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं. भारतीयांच्या आहारात तांदूळ हा महत्त्वाचा घटक आहे. तांदळाच्या तुटवड्यामुळे समस्या निर्माण होऊ नये, यासाठी केंद्र सरकारने तांदळाला निर्यात बंदी केली आहे. बासमती सोडून अन्य प्रकारच्या तांदूळ निर्यातीवर बंदी आहे.

भारत सरकारच्या या निर्णयाचा जगातील अनेक देशांना फटका बसतोय. तिथे तांदूळ महाग झाला आहे. भारत सरकारच्या या निर्णयाचा शेजारील देशांना सुद्धा फटका बसतोय.

भारताने दिला मोठा दिलासा

भारताचा शेजारी नेपाळला सुद्धा याची झळ बसत होती. मात्र, भारताने आता तांदूळ निर्यात बंदीमधून नेपाळला वगळलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी 5 एप्रिलला नेपाळचे पंतप्रधान पुष्पकमल दहल प्रचंड यांच्यासोबत टेलिफोनवरुन चर्चा केली. तांदूळ निर्यात बंदीचा निर्णय नेपाळला लागू होणार नाही, असं मोदी यांनी आश्वासन दिलं.

भारताने अजून काय आश्वासन दिलं?

नेपाळच्या पंतप्रधान कार्यालयाने या बद्दल समाधान व्यक्त केलं. भारतातून नेपाळला तांदळाची निर्यात पहिल्यासारखी चालू राहिलं. त्याशिवाय नेपाळला अन्य खाद्यपदार्थांची कमतरता भासू देणार नाही, असं आश्वासनही भारताने दिलय. भारताने असा निर्णय का घेतला?

भारताने बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर जी बंदी घातली होती, त्याचा परिणाम नेपाळमध्येही दिसून येत होता. नेपाळकडे तीन महिन्यांचा स्टॉक होता. मात्र, तरीही काळाबाजार आणि भाववाढीमुळे 10 लाख मॅट्रिक टन धान्य खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. भारतात येणारा काळ हा सणांचा आहे. देशांतर्गत मागणी लक्षात घेऊन, बासमती व्यतिरिक्त अन्य तांदूळ निर्यातीवर बंदी घातली आहे.

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.