Corona Cases in India | देशात कोरोनाग्रस्तांचे आकडे पुन्हा वाढले, एका दिवसात विक्रमी 4529 कोरोनाबळी

गेल्या 24 तासात भारतात 2 लाख 67 हजार 334 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. (New Corona Cases in India)

Corona Cases in India | देशात कोरोनाग्रस्तांचे आकडे पुन्हा वाढले, एका दिवसात विक्रमी 4529 कोरोनाबळी
कोरोना
Follow us
| Updated on: May 19, 2021 | 9:52 AM

नवी दिल्ली : देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार (Corona Cases in India) पाहायला मिळत आहे. सलग दुसऱ्या दिवशी देशात 24 तासाच्या कालावधीत तीन लाखांपेक्षा कमी नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. तरी आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत चार हजारांनी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. कालच्या दिवसात 2 लाख 67 हजार 334 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. मात्र कोरोनाबळींचा आकडा काहीसा धडकी भरवणारा आहे. कारण एका दिवसात तब्बल 4 हजार 529 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. हा एका दिवसातील कोरोनाबळींचा विक्रम आहे. (New 267334 Corona Cases in India in the last 24 hours)

24 तासातील आकडेवारी

गेल्या 24 तासात भारतात 2 लाख 67 हजार 334 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 4 हजार 529 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 3 लाख 89 हजार 851 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

आतापर्यंतची आकडेवारी

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 कोटी 54 लाख 96 हजार 330 वर गेला आहे. देशात 2 कोटी 19 लाख 86 हजार 363 रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत 2 लाख 83 हजार 248 रुग्णांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. तर 32 लाख 26 हजार 719 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.

आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 18 कोटी 58 लाख 9 हजार 302 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

देशातील कोरोना रुग्ण आकडेवारी

देशात 24 तासात नवे रुग्ण – 2,67,334

देशात 24 तासात डिस्चार्ज – 3,89,851

देशात 24 तासात मृत्यू – 4529

एकूण रूग्ण – 2,54,96,330

एकूण डिस्चार्ज – 2,19,86,363

एकूण मृत्यू – 2,83,248

एकूण अॅक्टिव्ह रुग्ण – 32,26,719

आतापर्यंत लसीकरण झालेली संख्या – 18,58,09,302 (New Corona Cases in India)

India reports 2,67,334 new #COVID19 cases, 3,89,851 discharges & 4529 deaths (highest in a single day) in last 24 hrs, as per Health Ministry.

Total cases: 2,54,96,330 Total discharges: 2,19,86,363 Death toll: 2,83,248 Active cases: 32,26,719

Total vaccination: 18,58,09,302 pic.twitter.com/iXabFEM0M5

— ANI (@ANI) May 19, 2021

संबंधित बातम्या :

(New Corona Cases in India)

Non Stop LIVE Update
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.