News9 Global Summit मध्ये शालिनी पासी यांचा सहभाग, कलाकार, महिला समानतेवर केलं भाष्य!
TV9 Global Summit : दुबईत होत असलेल्या टीव्ही 9 च्या ग्लोबल समिटला शालिनी पासी यांनी हजेरी लावली.

TV9 Global Summit :c भारतातील सर्वांत मोठे न्यूज नेटवर्क टीव्ही 9 तर्फे आंतरराष्ट्रीय पातळीवर न्यूज 9 ग्लोबल समीटचे आयोजन करण्यात आले आहे. या समीटची आजपासून सुरुवात झाली आहे. दुबईत ही समीट होत आहे. या समिटसाठी भारतातील अनेक दिग्गजांना आमंत्रित करण्यात आले आहे. यामध्ये अभिनेता विवेका ओबेरॉय, सुनिल शेट्टी, कॉमेडियन तथा अभिनेता सायरस ब्रोचा, एकता कपूर यांचाही समावेश आहे. दरम्यान, याच कार्यक्रमात टीव्ही सेलब्रिटी शालिनी पासी यांनादेखील आमंत्रित करण्यात आलं होतं.
ग्लोबल मीटमध्ये लावली हजेरी
नेटफ्लिक्सवरील लाईफ व्हर्सेस बॉलिवूड वाईव्स या शोच्या माध्यमातून शालिनी पासी यांना आज संपूर्ण देश ओळखतो. शालिनी या फक्त एक सेलब्रिटी नाहीत तर त्या एक आर्ट कलेक्टर आणि फिलँट्रॉपिस्टही आहेत. त्यांनी न्यूज 9 ग्लोबस समीटमध्ये हजेरी लावत The Diversity DIWIDEND या विषयावर आयोजित केलेल्या चर्चासत्रात मत व्यक्त केले.
हिलांना मिळणारी कामाची संधी या विषयी भाष्य
पासी यांच्यासोबत या चर्चासत्रात लँडस्केप आर्टिस्ट तसेच एन्व्हायरमेंटल आर्ट्स्ट Dr. Eng Kasia Sterriker, Assiduus Global च्या संस्थापक Somdutta Singh तसेच Women In Aviation च्या उपाध्यक्षा Dr Eng. Suaad AlShamsi या सहभागी झाल्या होत्या. यावेळी पासी यांनी भारतीय संस्कृती आणि महिलांना मिळणारी कामाची संधी या विषयी भाष्य केलं. भारत आपल्या विविधतेसाठी जगभरात ओळखला जातो. कला क्षेत्रात महिलांचे प्रमाण बरेच आहे. जगातही महिला कलाकारांना चांगली संधी मिळत आहे, असे शालिनी यांनी सांगितले.
महिला आपल्या कामात प्रामाणिक असतात
तसेच महिलांना संधी आणि साथ देत असेल तर त्या एक लीडर म्हणूनही मोठं काम करू शकतात का? असा प्रश्न शालिनीला विचारण्यात आला होता. यावर बोलताना महिला आपल्या कामत फार गंभीर असतात. संवेदनशीलपणे त्या काम करतात. माझ्याकडे काम करणाऱ्या महिलांचे प्रमाण खूप जास्त आहे, असे शालिनी यांनी सांगितले.
