AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tahawwur Rana: NIA या 30 प्रश्नांमधून काढणार तहव्वूर राणाच्या कटाची कुंडली, कोणत्या अधिकाऱ्यांवर दिली जबाबदारी

तहव्वूर राणासाठी एनआयए हेडक्वॉक्टरमध्ये ग्रॉउंड फ्लोरवर विशेष कक्ष तयार करण्यात आला आहे. परंतु चौकशी तिसऱ्या मजल्यावर होणार आहे. राणाला एनआयएने कस्टडीत घेतल्यानंतर स्पेशल सेलचे कमांडोज, एनआयएचे अधिकारी राणा याच्या हालचालीवर 24 तास लक्ष ठेवणार आहे.

Tahawwur Rana: NIA या 30 प्रश्नांमधून काढणार तहव्वूर राणाच्या कटाची कुंडली, कोणत्या अधिकाऱ्यांवर दिली जबाबदारी
Tahawwur Rana
| Updated on: Apr 11, 2025 | 9:36 AM
Share

Tahawwur Rana NIA Interrogation: मुंबईवर झालेल्या 26/11 हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणा याला भारतात आणण्यात आले आहे. कोर्टाने त्याला 18 दिवसांची कोठडी दिली. त्यानंतर राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए ) 30 प्रश्नांमधून तहव्वूर राणाच्या गुन्हेगारी कृत्याची कुंडली काढणार आहे. त्याच्या चौकशीसाठी एनआयए हेडक्वॉक्टरमध्ये तिसऱ्या मजल्यावर खास चौकशी कक्ष तयार केला आहे. त्यात 24 तास सीसीटीव्ही कॅमेऱ्याची निगराणीदेखील ठेवण्यात येणार आहे. एनआयएचे डीआयजी, आयजी संवर्गातील अधिकारी राणाची चौकशी करणार आहे.

तहव्वूर राणासाठी एनआयए हेडक्वॉक्टरमध्ये ग्रॉउंड फ्लोरवर विशेष कक्ष तयार करण्यात आला आहे. परंतु चौकशी तिसऱ्या मजल्यावर होणार आहे. राणाला एनआयएने कस्टडीत घेतल्यानंतर स्पेशल सेलचे कमांडोज, एनआयएचे अधिकारी राणा याच्या हालचालीवर 24 तास लक्ष ठेवणार आहे.

तहव्वूर राण यांना भारतात आणल्यानंतर एनआयए त्याची 26/11 च्या मुंबई हल्ल्यातील भूमिकेबाबत चौकशी करणार आहे. त्याबाबत त्याला प्रश्न विचारणार आहे. राणा याला विचारण्यात येणारी प्रश्न कोणती असतील, जाणून घेऊ या.

  1. 26 नोव्हेंबर 2008 रोजी तू कुठे होता?
  2. 8 नोव्हेंबर 2008 ते 21 नोव्हेंबर 2008 तू भारतात का आला होता? या दरम्यान तू कुठे कुठे गेला?
  3. भारतात थांबला तेव्हा तू कोणा कोणाला अन् कुठे भेटला?
  4. 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईत मोठा दहशतवादी हल्ला होईल, त्याची माहिती तुला होती का?
  5. तू डेव्हिड कोलमन हेडलीला कधीपासून ओळखतो? त्याला बनावट व्हिसावर भारतात का पाठवण्यात आले?
  6. मुंबई हल्ल्याच्या नियोजनात तू त्याला मदत केली होती की त्याने तुला मदत केली होती, तुमच्या दोघांची भूमिका काय होती?
  7. डेव्हिड कोलमन हेडलीला भारतीय व्हिसा मिळविण्यात तू कशी मदत केली?
  8. मुंबई हल्ल्यात तुझी आणि हेडलीची भूमिका काय होती?
  9. डेव्हिड कोलमन हेडली भारतात काय करण्यासाठी आला होता? भारतात असताना त्याने तुला काय सांगितले?
  10. डेव्हिड हेडली याने भारतातील त्याने भेट दिलेल्या ठिकाणांबद्दल तुला काय सांगितले?
  11. मुंबई हल्ल्यासाठी लागणारी माहिती मिळवण्यासाठी हेडलीने काय मदत केली?
  12. लष्कर-ए-तैयबाचा प्रमुख हाफिज सईद या तू कसा ओळखतो. तू हाफिजला पहिल्यांदा कधी आणि कुठे भेटलात? हाफिज सईदशी तुमचे काय संबंध होते?
  13. लष्कर-ए-तैयबाला तू कशी मदत केली? तुझ्या मदतीच्या बदल्यात लष्कर ए तैयबाने तुला काय दिले?
  14. लष्कर-ए-तैयबाच्या हाफिज सईद व्यतिरिक्त तू किती लोकांना ओळखता? तू त्याच्याशी शेवटचे कधी बोललास?
  15. लष्कर-ए-तैयबामध्ये किती लोक आहेत? त्याची रचना कशी आहे? भरती कशी होते? कोण करतो?
  16. लष्कर चालवण्यासाठी निधी कुठून येतो? सर्वात जास्त निधी उभारणारे लोक कोण आहेत?
  17. शस्त्रे कोण पुरवते? तुला कोणत्या देशांकडून शस्त्रे मिळतात?
  18. पाकिस्तानी सैन्य आणि आयएसआय तुला कशी मदत करतात?
  19. हल्ला करण्यासाठी लक्ष्य कसे निवडता? आयएसआयकडून तुला लक्ष्यावर हल्ला करण्याचे निर्देश मिळतात का?
  20. लष्कर आणि हुजीच्या लोकांना कोण प्रशिक्षण देते?
  21. किती आयएसआय अधिकारी कोणत्याही एका गटाला कोणत्या प्रकारचे प्रशिक्षण देतात? प्रशिक्षणादरम्यान काय सांगितले जाते? प्रशिक्षणात काय केले जाते?
  22. डॉक्टरची नोकरी सोडून दहशतवादाचा मार्ग का निवडला? हेडलीचा हेतू काय होता?
  23. पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयशी कोणाचे संबंध होते? हेडलीने तुझी ओळख करून दिली की तू हेडलीची ओळख करून दिली?
  24. आयएसआयचा काय प्लॅन होता? ज्या ठिकाणी हल्ले झाले तेच एकमेव लक्ष्य होते का की भारतातही असे काही लक्ष्य होते जे तुम्ही साध्य करू शकला नाही?
  25. या हल्ल्यांमध्ये आयएसआयच्या बाजूने फक्त मेजर इक्बाल आणि समीर अलीच सहभागी होते की इतर काही वरिष्ठ अधिकारीही सामील होते?
  26. दहशत पसरवण्याच्या योजनेला कोण आर्थिक मदत करते?
  27. आयएसआय व्यतिरिक्त पाकिस्तान सरकारलाही दहशतवादी हल्ल्यांची माहिती मिळते का?
  28. हल्ल्यादरम्यान दहशतवाद्यांना सूचना कोण देते?
  29. मुलांना आत्मघातकी हल्ल्यांसाठी तयार करण्यासाठी काय सांगितले जाते?
  30. संपूर्ण हल्ल्याच्या नियोजनात किती लोक सहभागी आहेत आणि त्यांची भूमिका काय आहे?
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.