AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Uttar Pradesh: नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाचं भूमिपूजन 25 नोव्हेंबरला होणार

जेवर येथे आशियातील सर्वात मोठे आंतरराष्ट्रीय विमानतळ बांधले जाणार आहे. पीपीपी मॉडेलवर उभारण्यात येणाऱ्या या विमानतळाचा विकास करण्याची जबाबदारी स्विस कंपनी झुरिच इंटरनॅशनल एअरपोर्ट एजीकडे देण्यात आली आहे.

Uttar Pradesh: नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाचं भूमिपूजन 25 नोव्हेंबरला होणार
Noida International airport design plan Image
| Edited By: | Updated on: Nov 13, 2021 | 7:15 AM
Share

नोएडा (जेवर) आंतरराष्ट्रीय ग्रीनफील्ड विमानतळाचं भूमिपूजन 25 नोव्हेंबरला होणार आहे. 25 वर्षांपासून नोएडा विमानतळाची देश प्रतीक्षा करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ विमानतळाची पायाभरणी करणार आहेत. कार्यक्रमाची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. 25 डिसेंबरनंतर उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू होण्याची शक्यता वरतवली जातीये. त्यामुळे भूमिपूजन तारीख लवकर निश्चित करण्यात आली आहे. (Noida Jewar International Airport bhoomipujan by PM Narendra Modi)

जेवर येथे आशियातील सर्वात मोठे आंतरराष्ट्रीय विमानतळ बांधले जाणार आहे. पीपीपी मॉडेलवर उभारण्यात येणाऱ्या या विमानतळाचा विकास करण्याची जबाबदारी स्विस कंपनी झुरिच इंटरनॅशनल एअरपोर्ट एजीकडे देण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यातील काम 1,334 हेक्टरमध्ये होणार आहे. ही जमीन विकासक कंपनीला हैंडओवर करण्यात आली आहे. कंपनीने जागेवर सपाटीकरण व सीमाभिंतीचे काम सुरू केले आहे. आता विमानतळाच्या पायाभरणीची तारीख निश्चित झाली आहे. याबाबतचे अधिकृत पत्र लवकरच जारी करण्यात येणार आहे.

सुमारे २५ वर्षांपासून नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रतीक्षा आहे. उत्तर प्रदेशात राजनाथ सिंह मुख्यमंत्री असताना जेवर येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ बांधण्याची फाइल तयार झाली होती. हा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्र सरकारकडे पाठवला होता, मात्र ही जागा दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळापासून दूर आहे, त्यामुळे प्रकल्प रखडला होता.

हे ही वाचा –

प्रादेशिक राजकीय पक्षांनीचा 55% निधी “अज्ञात सोर्सेज” कडून, एकूण 885.95 कोटी रुपये निधी गोळा

Rahul Gandhi: “केंद्र सरकारकडून राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड, श्रीमान 56″ घाबरले”, राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका

Uttar Pradesh: CM योगींचे भाषण ऐकून बदमाशाने जामीन घेण्यास दिला नकार; न्यायालयासमोर आत्मसमर्पण

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.