AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘जिंदा नास्त्रेदमस’ची कोरोना, युक्रेन युद्धाचे भविष्य ठरले सत्य, 2024 मध्ये भारतासंदर्भात म्हटले…

jind nostradamus | जग गेल्या अनेक शतकांपासून एलियन्सशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहे. या पृथ्वीच्या पलीकडे जीवसृष्टी असल्याची कल्पना अनेक शास्त्राज्ञांची आहे. त्यामुळे एलियन्सशी संपर्क करण्यासाठी प्रयोग सुरुच असतात.

'जिंदा नास्त्रेदमस'ची कोरोना, युक्रेन युद्धाचे भविष्य ठरले सत्य, 2024 मध्ये भारतासंदर्भात म्हटले...
| Updated on: Feb 08, 2024 | 4:03 PM
Share

नवी दिल्ली, दि. 8 फेब्रुवारी 2024 | नास्त्रेदमस यांच्या भविष्यासंदर्भात अनेकांना माहीत आहे. परंतु एथोस सॅलोमे (Athos Salomé) हे ही ‘जिंदा नास्त्रेदमस’ नावाने ओळखले जाऊ लागले आहेत. त्यांची भविष्यवाणी सध्या चांगली चर्चेत आली आहे. ब्राझीलमधील रहिवाशी असलेले 37 वर्षीय ‘जिंदा नास्त्रेदमस’ यांचे अनेक भविष्य सत्य ठरले आहेत. महाराणी एलिजाबेथ द्वितीय यांच्या मृत्यूसंदर्भात ‘जिंदा नास्त्रेदमस’ यांनी भविष्य वर्तवले होते. एलन मस्कचे यांच्या ट्विटरबाबत त्यांनी भविष्य वर्तवले होते, ते सत्य ठरले. आता त्यांनी 2024 संदर्भात धक्कादायक भविष्य वर्तवले आहे. त्यात त्यांनी चीन आणि रुसमध्ये तिसरे महायुद्ध होणार असल्याचे सांगितले.

अमेरिकेत काय होणार

‘जिंदा नास्त्रेदमस’ यांच्या मतानुसार 2024 मध्ये अमेरिकेसमोर अनेक संकटे असणार आहेत. पाणी आणि आग ही मुख्य संकट जगातील सुपर पॉवर असलेल्या अमेरिकेसमोर असणार आहे. किंग चार्ल्स यांच्या आजारपणाबाबत काहीही धक्कादायक माहिती त्यांनी दिली आहे. त्यांना आपल्या प्रकृतीकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावे लागणार आहे. ‘जिंदा नास्त्रेदमस’ यांनी 2024 हे वर्ष परिवर्तनाचे वर्ष असणार आहे, असे म्हटले आहे. यावर्षभरात एआय म्हणजेच अर्टीफिशियल इन्टेलिजेन्समध्ये वेगाने बदल होणार असल्याचे म्हटले आहे.

2024 मध्ये एलियन्ससोबत संपर्क

जग गेल्या अनेक शतकांपासून एलियन्सशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहे. या पृथ्वीच्या पलीकडे जीवसृष्टी असल्याची कल्पना अनेक शास्त्राज्ञांची आहे. त्यामुळे एलियन्सशी संपर्क करण्यासाठी प्रयोग सुरुच असतात. ‘जिंदा नास्त्रेदमस’ यांनी या वर्षी एलियन्ससोबत संपर्क होणार असल्याचे म्हटले आहे. परंतु हे एक मोठे आक्रमण असणार आहे. मानव आणि एलियन्समध्ये दुर्बिणींच्या माध्यमातून संपर्क होणार आहे.

चीनकडून तिसरे महायुद्ध, भारताचा विषय…

‘जिंदा नास्त्रेदमस’ ने म्हटले की, एका मोठ्या सायबर हल्ल्यामुळे तिसऱ्या महायुद्धासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते. रूस आणि चीन दरम्यान तिसरे युद्ध होण्याचा धोका आहे. भारतासंदर्भात भविष्यवाणी करताना जिंदा नास्त्रेदमस म्हटले आहे की, 2024 मध्ये भारत उल्लेखनीय प्रगती करणार आहे. त्यांनी भारताला जगाचा वाघ (टायगर) म्हटले आहे.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.