AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारत सरकारचा तुर्कीला आणखी एक मोठा दणका, मोठी बातमी समोर

भारतानं तुर्कीविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. तुर्कीच्या आर्थिक नाड्या आवळण्यात आल्या आहेत. तुर्कस्तानावर टाकण्यात आलेल्या बहिष्कारानंतर आता भारतानं आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे.

भारत सरकारचा तुर्कीला आणखी एक मोठा दणका, मोठी बातमी समोर
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 15, 2025 | 9:40 PM
Share

मोठी बातमी समोर येत आहे, भारत सरकारने तुर्कस्तानविरोधात आता आणखी एक मोठी कारवाई केली आहे. राष्ट्रीय सुरक्षेचा हवाला देत, नागरी विमान वाहतूक ब्युरो (Bureau of Civil Aviation) कडून तुर्की विमानतळ ग्राउंड हँडलिंग कंपनी सेलेबीची एअरपोर्ट सर्व्हिसची सिक्योरिटी क्लीयरंस रद्द करण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिस भारतातील 8 विमानतळांवर ग्राउंड हँडलिंग सेवा पुरवते.

या प्रकरणात शिवसेनेकडून देखील आंदोलन करण्यात आलं होतं. मुंबई विमानतळावर सेलेबी या कंपनीकडून सेवा पुरवली जात होती, या कंपनीचा करार रद्द करून तिच्यासोबत असलेले सर्व संबंध संपुष्टात आणावेत अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली होती. समोर आलेल्या माहितीनुसार मुंबई विमानतळावरील जवळपास 70 टक्के ग्राउंड ऑपरेशन्स सेलेबीच्या माध्यमातून केले जातात. ज्यामध्ये प्रवाशांना देण्यात येणाऱ्या विविध सुविधा, उड्डाण ऑपरेशन्स, कार्गो आणि पोस्टल सेवा यासारख्या सेवांचा समावेश आहे. मात्र भारताने आता या कंपनीला मोठा दणका दिला आहे.

तुर्कस्तानावर बहिष्कार

भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव चांगलाच वाढला, पाकिस्तानने भारतावर ज्या ड्रोनच्या मदतीने हल्ल्याचा प्रयत्न केला त्यातील 350 ड्रोन हे तुर्कीचे होते. तुर्कीने भारत आणि पाकिस्तान वादात उघडपणे पाकिस्तानला पाठिंबा दिला, त्यानंतर आता भारतानं तुर्कीविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. तुर्कीच्या आर्थिक नाड्या आवळण्यात आल्या आहेत. भारतीय व्यापाऱ्यांनी तुर्कीच्या मालावर बहिष्कार घातला आहे. तुर्कीमधून येणाऱ्या सफरचंदावर भारतामध्ये बहिष्कार घालण्यात आला आहे. भारतातून दरवर्षी लाखो पर्यटक तुर्कीला जातात, मात्र आता पर्यटकांनी देखील तुर्कीकडे पाठ फिरवली आहे.

एवढेच नाही तर बॉलिवूडने देखील तुर्कीवर बहिष्कार घातला आहे, इथून पुढे एकही चित्रपट किंवा मालिकाचं चित्रिकरण तुर्कीमध्ये होणार नसल्याची भूमिका भारतामधील चित्रपट व्यावसायिकांकडून घेण्यात आली आहे. या बहिष्काराचा मोठा फटका हा तुर्कीला बसल्याचं पाहायला मिळत आहे. तुर्कीचं प्रचंड आर्थिक नुकसान झालं आहे.

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.