OBC Reservation: भुजबळ आणि वडेट्टीवार चेहरे चमकावायला आले होते, ओबीसी आरक्षणावर दानवेंचा चिमटा

भाजप नेत्यांकडून राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला जातोय. तर मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केंद्रावर निशाणा साधला आहे. अशावेळी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना जोरदार टोला लगावलाय.

OBC Reservation: भुजबळ आणि वडेट्टीवार चेहरे चमकावायला आले होते, ओबीसी आरक्षणावर दानवेंचा चिमटा
रावसाहेब दानवे, रेल्वे राज्यमंत्री
Follow us
| Updated on: Sep 13, 2021 | 8:26 PM

नवी दिल्ली : ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा अद्याप मार्गी लागलेला नाही, अशावेळी राज्य निवडणूक आयोगाकडून 5 जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि एका जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीचा तारीख जाहीर केली आहे. त्यावरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. भाजप नेत्यांकडून राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला जातोय. तर मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केंद्रावर निशाणा साधला आहे. अशावेळी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना जोरदार टोला लगावलाय. (Raosaheb Danve Criticizes Chhagan Bhujbal and Vijay Wadettiwar over OBC Reservation)

1980 ते 1990 या कालखंडात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका राज्य सरकारकडे होत्या. आता ओबीसी आरक्षण 50 टक्क्यांवर गेलं आहे. राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयाला इम्पिरिकल डेटा देऊ शकला नाही. राज्य सरकारनं आपल्या धुंदीत राहून वकिलांची फौज उभी केली नाही. ओबीसींचं राजकीय आरक्षण केवळ राज्य सरकारला गांभीर्य नसल्यामुळे गेल्याचा आरोप रावसाहेब दानवे यांनी केलाय. त्याचबरोबर भुजबळ आणि वडेट्टीवार हे फक्त चेहरे चमकवण्यासाठी आले होते. ओबीसी आरक्षणाला आम्ही धक्का लावू देणार नाही असं बोलत होते. पण तुमच्या चुकीमुळं आरक्षण रद्द झालं, असा थेट आरोप दानवे यांनी भुजबळ आणि वडेट्टीवार यांच्यावर केलाय.

पवारांच्या ‘त्या’ उदाहरणावरुन काँग्रेसला टोला

दरम्यान, शरद पवार यांनी काँग्रेसबाबत उत्तर प्रदेशातील जमीनदाराचं उदाहरण दिलं होतं. त्याबाबत विचारलं असता, शरद पवार काँग्रेसबाबत खरं बोलत आहेत. पवारांनी मार्मिक टीका केलीय. शरद पवार स्वत: काँग्रेसमध्ये होते. त्यांनी राहुल गांधींवर नाही तर काँग्रेसच्या स्थितीबाबत उत्तर प्रदेशातील जमीनदाराचं उदाहरण दिलं आहे. राज्यात शरद पवार यांच्या आधारामुळेच काँग्रेस सरकारमध्ये असल्याचंही दानवे यांनी म्हटलंय.

एका ठराविक उद्देशासाठी महाविकास आघाडी सरकार काम करत आहे. आपला उद्देश पूर्ण झाला की महाविकास आघाडीचं हे सरकार पडेल, असा आरोप दानवे यांनी केलाय. तसंच माजी गृहमंत्री अनिल देशमुख कुठे आहेत हे राज्य सरकारला माहिती असल्याचा दावाही केला आहे.

राज्य सरकारनं ओबीसी समाजाची दिशाभूल केली- बावनकुळे

राज्य सरकारचे सर्व मंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं होतं की ओबीसी आरक्षण मिळेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार नाहीत. पण आझ राज्य निवडणूक आयोगानं निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. राज्य सरकारनं ओबीसी समाजाची दिशाभूल केली आहे. ओबीसी आरक्षण मिळेपर्यंत निवडणुका होणार नाहीत असं राज्य सरकारनं जाहीर केल्यानंतर निवडणुका लावल्या कशा? असा सवालही बावनकुळे यांनी केलाय.

‘राज्य सरकारचा खोटारडेपणा उघड’

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका व्हाव्या अशा विचाराचा एक गट या सरकारमध्ये होता, शेवटी त्यांचा मनसुबा पूर्ण झाला. आज ओबीसी समाजावर अन्याय करणारा सर्वात मोठा निर्णय झाला. त्यामुळे पुढच्या काळात सर्व निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होतील. हा मोठा घात राज्य सरकारनं ओबीसी समाजाबाबत केला आहे. ओबीसी समाज या सरकारला सोडणार नाही. भाजपनं ओबीसी उमेदवार देण्याचं जाहीर केलं आहे. पण महाविकास आघाडी सरकारचा खोटारडेपणा उघड झालाय. त्यामुळे ओबीसी समाज या सरकारचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराच बावनकुळे यांनी सरकारला दिलाय.

इतर बातम्या :

ZP Elections : इम्पिरिकल डेटा मिळाला नाही आणि निवडणुका धडकल्या तर काय? विजय वडेट्टीवारांनी सांगितला मार्ग

ZP Elections : जिल्हा परिषद निवडणुकांची तारीख जाहीर; आता राज्य सरकार, विरोधी पक्ष काय भूमिका घेणार?

Raosaheb Danve Criticizes Chhagan Bhujbal and Vijay Wadettiwar over OBC Reservation

Non Stop LIVE Update
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.