रेल्वे कर्मचारी आता रात्री 12 वाजेपर्यंत काम करणार, रेल्वेत दोन शिफ्ट; वाचा नवे आदेश कुणासाठी?

अश्विनी वैष्णव यांनी रेल्वे मंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पहिल्याच बैठकीत मोठा निर्णय घेतला आहे. रेल्वे मंत्री वैष्णव यांनी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळा बदलल्या आहेत. (Officers will work in two shifts in Railway Minister Ashwini Vaishnav office)

रेल्वे कर्मचारी आता रात्री 12 वाजेपर्यंत काम करणार, रेल्वेत दोन शिफ्ट; वाचा नवे आदेश कुणासाठी?
Ashwini Vaishnaw

नवी दिल्ली: अश्विनी वैष्णव यांनी रेल्वे मंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पहिल्याच बैठकीत मोठा निर्णय घेतला आहे. रेल्वे मंत्री वैष्णव यांनी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळा बदलल्या आहेत. त्यानुसार रेल्वे कर्मचारी दोन शिफ्टमध्ये काम करणार आहेत. त्यामुळे रेल्वे कर्मचारी आता रात्री 12 वाजेपर्यंत काम करताना दिसणार आहेत. मात्र, हा आदेश केवळ मंत्री कार्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी लागू असणार आहे. (Officers will work in two shifts in Railway Minister Ashwini Vaishnav office)

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वे मंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर एक आदेश जारी केला आहे. त्यानुसार रेल्वे कर्मचारी दोन पाळ्यांमध्ये काम करणार आहेत. रेल्वे कर्मचाऱ्यांची पहिली शिफ्ट ही सकाळी 7 वाजता सुरू होईल. ही शिफ्ट दुपारी 4 वाजता संपेल. तर दुसरी शिफ्ट दुपारी 3 वाजता सुरू होईल आणि मध्यरात्री 12 वाजता संपेल. हा आदेश केवळ एमआर सेलला (मंत्री कार्यालय) लागू राहणार आहे. सर्व रेल्वे कर्मचारी किंवा खासगी रेल्वे कर्मचाऱ्यांना हा आदेश लागू नसेल, अशी माहिती रेल्वे मंत्रालयाचे एडीजीपीआर डीजे नारायण यांनी दिली.

आदेश तात्काळ प्रभावाने लागू

रेल्वे मंत्र्यांच्या कार्यालयाशी संबंधित सर्व कार्यालयांना हे आदेश तात्काळ प्रभावाने लागू करण्याचे आदेश रेल्वे मंत्र्याने दिले आहेत. त्यानुसार केवळ रेल्वे मंत्र्यांच्या कार्यालयाशी संबंधित कर्मचाऱ्यांनाच दोन शिफ्टमध्ये काम करावं लागणार आहे, असं नारायण यांनी सांगितलं.

मोदींचा रेल्वे खात्यावर फोकस

मिशन मोडसाठी रेल्वेसाठी बरंच काही करायचं आहे. त्यासाठी प्रत्येक मिनिट महत्वाचा आहे. एमआर सेलचा अर्थ मंत्र्याचं कार्यालय. त्यामुळे हा आदेश केवळ या कार्यालयासाठी लागू असेल, असंही ते म्हणाले. भारतीय रेल्वे हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टीकोणाचा एक भाग आहे. रेल्वेवर मोदींचा फोकस असून त्यावर त्याबाबतची त्यांची काही स्वप्ने आहेत, ती सत्यात उतरवण्याचा माझा प्रयत्न आहे, असं वैष्णव म्हणाले.

>> रेल्वे कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळा बदलल्या
>> कर्मचारी दोन शिफ्टमध्ये काम करतील
>> सकाळी 7 ते दुपारी 4 पर्यंत पहिली शिफ्ट
>> दुपारी 3 ते रात्री 12 पर्यंत दुसरी शिफ्ट
>> रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचा मोठा निर्णय (Officers will work in two shifts in Railway Minister Ashwini Vaishnav office)

 

संबंधित बातम्या:

15 ऑगस्टपर्यंत दिल्ली सोडू नका, मोदींच्या नव्या मंत्र्यांना कोणत्या 5 सुचना? वाचा सविस्तर

चर्चा दाजीच्या राजीनाम्याची, लागली लॉटरी, दानवे थेट रेल्वे राज्य मंत्री!

केंद्रीय मंत्री कसा झालो?; भागवत कराड यांनी सांगितलं नेमकं काय घडलं?

(Officers will work in two shifts in Railway Minister Ashwini Vaishnav office)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI