Omicron case in Delhi : नवी दिल्लीत ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण आढळला, भारतातील रुग्णसंख्या 5 वर

भारतातील कोरोना विषाणूच्या (Corona) ओमिक्रॉन (Omicron) वेरिएंटचा पाचवा रुग्ण समोर आलेला आहे. नवी दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंदर जैन (Satyendar Jain) यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.

Omicron case in Delhi : नवी दिल्लीत ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण आढळला, भारतातील रुग्णसंख्या  5 वर
कोरोना व्हायरस फोटो

नवी दिल्ली: भारतातील कोरोना विषाणूच्या (Corona) ओमिक्रॉन (Omicron) वेरिएंटचा पाचवा रुग्ण समोर आलेला आहे. नवी दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंदर जैन (Satyendar Jain) यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. ओमिक्रॉनचा संसर्ग झालेल्या वक्तीला लोकनायक जयप्रकाश नारायण (LNJP) रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.  ओमिक्रॉनचा संसर्ग झालेला व्यक्ती  37 वर्षांचा असून त्याच्यावर उपचार करण्यात आहेत. दिल्ली प्रशासन यामुळं सतर्क झालं आहे.

टांझानियातून आला रुग्ण

नवी दिल्लीच्या आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार ओमिक्रॉनचा संसर्ग झालेला रुग्ण हा टांझानियातून आला होता. संबंधित व्यक्तीचा ओमिक्रॉनचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानं आता भारतातील ओमिक्रॉनचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या पाचवर पोहोचली आहे. कर्नाटकमध्ये 2, गुजरातच्या जामनगरमध्ये 1 आणि महाराष्ट्रात एक आणि आता दिल्लीत एक अशा पाच रुग्णांची नोंद झाली आहे. परदेशातून आलेल्या 17 जणांना दिल्लीतील लोकनायक जयप्रकाश नारायण रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेला आहे.

महाराष्ट्रातल्या रुग्णावर उपचार सुरु

दक्षिण आफ्रिकेच्या केपटाऊन शहरातून दुबईमार्गे भारतात आलेल्या या प्रवाशाला सौम्य स्वरूपाची लक्षणे जाणवत असल्यानं त्याची कोरोना टेस्ट करण्यात आली. ही टेस्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर त्याची जनुकीय तपासणी केली असता त्याला ओमीक्रॉन व्हेरीयंटची लागण झाल्याचं शनिवारी संध्याकाळी समोर आलं. ओमिक्रॉनचा संसर्ग झालेला तरुण कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील रहिवाशी असून त्याने कोणतीही कोविड प्रतिबंधक लस घेतलेली नाही. 24 नोव्हेंबर 2021 रोजी या प्रवाशाला सौम्य ताप आला होता. इतर कोणतीही लक्षणे आढळली नाहीत त्यामुळे या रुग्णाचा आजार एकूण सौम्य स्वरूपाचा असून तो सध्या कल्याण डोंबिवली येथील कोविड केअर सेंटर मध्ये उपचार घेत आहे.

गुजरातमध्येही आढळला रुग्ण

गुजरातच्या जामनगरमधील 74 वर्षीय व्यक्तीला ओमिक्रॉन वेरिएंटचा संसर्ग झाल्याचं समोर आलं आहे. संबंधित व्यक्तीनं झिम्बॉम्बे ते दुबई ते अहमदाबाद ते जामनगर असा प्रवास केला होता.

इतर बातम्या:

Omicron : ओमिक्रॉनला रोखण्यासाठी बीएमसीचा प्लॅन; परदेशातून आलेल्या प्रवाशांना 7 दिवसांचं सक्तीचं क्वारंटाईन

Nagaland: नागालँड पेटले, गोळीबारात 11 जणांचा मृत्यू, संतप्त नागरिकांकडून जाळपोळ, सुरक्षा दलाची वाहने पेटवली

First omicron case detected in Delhi patient admitted to LNJP Hospital returned from Tanzania

Published On - 11:43 am, Sun, 5 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI