Omicron : ओमिक्रॉनला रोखण्यासाठी बीएमसीचा प्लॅन; परदेशातून आलेल्या प्रवाशांना 7 दिवसांचं सक्तीचं क्वारंटाईन

महाराष्ट्रात (Maharashtra) ओमिक्रॉनचा (Omicron) पहिला रुग्ण शनिवारी आढळला असून भारतातील ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्या आता 4 वर पोहोचलीय.

Omicron : ओमिक्रॉनला रोखण्यासाठी बीएमसीचा प्लॅन; परदेशातून आलेल्या प्रवाशांना 7 दिवसांचं सक्तीचं क्वारंटाईन
CORONA AND BMC
Follow us
| Updated on: Dec 05, 2021 | 11:09 AM

मुंबई: महाराष्ट्रात (Maharashtra) ओमिक्रॉनचा (Omicron) पहिला रुग्ण शनिवारी आढळला असून भारतातील ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्या आता 4 वर पोहोचलीय. मुंबई महापालिका (BMC) देखील ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर सतर्क झाली आहे. हायरिस्क देशांमधून येणाऱ्या प्रवाशांसाठी सात दिवसांचं क्वारंटाईन सक्तीचं करण्यात आलं आहे. महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी यांसंदर्भात माहिती दिली आहे. तर, सात दिवसांच्या क्वारंटाईनमुळं कोरोनाच्या नव्या वेरिएंटच्या संसर्गाला रोखण्यात यश येईल, असं महापालिका आयुक्त इकबाल चहल म्हणाले आहेत. मुंबई महापालिकेनं कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी यापूर्वी जारी केलेल्या नियमावलीप्रमाणेच यावेळी देखील लागू करण्यात आली आहे. मात्र, यावेळी होम क्वारंटाईन आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांना अधिक सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

सात दिवस क्वारंटाईन, पालिका दररोज संपर्क करणार

मुंबई विमानतळ प्राधिकरणाकडून आलेली यादी पालिकेच्या आपत्कालीन कक्षाला पाठवली जाणार आहे. ही यादी सॉफ्टवेअरच्या माध्यमातून पाठवली जाणार आहे. मुंबई महापालिकेच्या वॉर रुमकडून ही यादी 24 वॉर्डमधील कक्षांना ही यादी पत्त्यासह कळवली जाणार आहे. वॉर रुममधून सतत 7 दिवस परदेशातून आलेल्या प्रवाशांसी संपर्क ठेवला जाईल. काही जणांना फोनच्या माध्यमातून संपर्क ठेवला जाईल. विलगीकरणाचा नियम प्रवासी पाळत आहेत की नाही यावर लक्ष ठेवलं जाईल.

प्रत्येक वार्डमध्ये 10 रुग्णवाहिका तैनात

प्रत्येक वार्डमध्ये 10 रुग्णवाहिका तैनात ठेवलेल्या आहेत. एखाद्या व्यक्तीला माणसाला अडचण आल्यास तो रुग्णालयात तातडीन पोहोचावा यासाठी पथक तैनात ठेवण्यात आलं आहे. जिथ तो प्रवासी राहणार तिथल्या सोसायटीला आम्ही मदतीसाठी सहभागी करुन घेणार आहोत. नागरिकांच्या सहकार्यानं या सर्व गोष्टी होणार आहेत, अशी माहिती किशोरी पेडणेकर यांनी दिली होती.

लसीकरणावर जोर

कोरोना लसीकरण केलं नसेल तर त्या व्यक्तींना कोरोना लस घेण्यासाठी प्रवृत्त करण्याचं काम करावं लागेल. आपण पहिला डोस शंभर टक्के पूर्ण केला आहे. प्रयत्न केल्यास आपण दुसरा डोस 100 टक्के पूर्ण करु शकतो, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

इतर बातम्या:

बीडमध्ये आगार प्रशासनाकडून आंदोलन उधळून लावण्याचा प्रयत्न; महिला कर्मचाऱ्यांना आश्रू अनावर

Omicron Virus: ओमिक्रॉनचा धोका कुणाला?, काय करावं आणि काय नाही?; डॉ. भोंडवेंनी दिला लाखमोलाचा सल्ला

BMC issue new guidelines for travelers who came from foreign to Mumbai

Non Stop LIVE Update
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.