AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मास्क न वापरल्यास 1 लाख रुपयांचा दंड, 2 वर्षांची जेल, झारखंडचा मोठा निर्णय

कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी झारखंड सरकारने मोठा निर्णय घेतला (Jharkhand government big decision on mask) आहे.

मास्क न वापरल्यास 1 लाख रुपयांचा दंड, 2 वर्षांची जेल, झारखंडचा मोठा निर्णय
| Edited By: | Updated on: Jul 23, 2020 | 4:57 PM
Share

रांची (झारखंड) : कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी झारखंड सरकारने मोठा निर्णय घेतला (Jharkhand government big decision on mask) आहे. जर कुणी मास्कचा वापर केला नाही किंवा कोरोना नियमांचे उल्लंघन केले तर त्यांच्यावर एक लाख रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. त्यासोबत दोन वर्षांची जेलही होऊ शकतो. झारखंड सरकारने कोरोना प्रादुर्भाव 2020 अध्यादेश काढला. कॅबिनेटच्या बैठकीत या अध्यादेशाला मंजुरी देण्यात आली (Jharkhand government big decision on mask) आहे.

कॅबिनेटच्या बैठकीत कोरोना प्रादुर्भाव 2020 च्या अध्यादेशातील 39 प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. झारखंड सरकारच्या या नव्या अध्यादेशाची चर्चा संपूर्ण देशात सुरु आहे. एक लाख रुपयांचा दंड आकारणार असल्याने नागरिकही धास्तावले आहेत.

झारखंडमध्ये काहीदिवसात मोठ्या संख्येने कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. लोकांच्या निष्काळजीपणामुळे रुग्ण संख्येत वाढ होत आहे, असं सरकारने म्हटले आहे. या दरम्यान झारखंड सरकारने एक अध्यादेश काढला. या नव्या अध्यादेशामध्ये रस्त्यावर, बाजारात कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी कुणी व्यक्तीने किंवा एखाद्या समूह मास्कचा वापर करत नसले, सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले नाही आणि एखाद्या कार्यालयात, दुकानात नव्या नियमांचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आले. तर नियम तोडणाऱ्या सर्वांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. अध्यादेशानुसार जर कुणी नियम तोडले तर एक लाख रुपयांचा दंड वसूल केला जाणार. तसेच दोन वर्षांची जेलही होऊ शकतो.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

झारखंडमध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत आहे. राज्यातील सरकारी रुग्णालयात नवीन रुग्णांना दाखल करण्यासाठी जागा उपलब्ध नाही. राज्यात आता खासगी रुग्णालय आणि इतर लग्न सभागृहांमध्येही आयसोलेशन वॉर्ड तयार करण्यात आले आहे.

काही आयसोलेशन वॉर्ड हे लोकं राहत असलेल्या भागात तयार केल्याने तेथील स्थानिकांनी याला विरोध केला आहे. स्थानिकांचे मत आहे की, आयसोलेशन वॉर्ड राहत असलेल्या भागात उभे करु नका. त्यामुळे येथे कोरोना विषाणू पसरु शकतो. हा वॉर्ड दुसरीकडे हलवण्यात यावा.

दरम्यान, झारखंडमध्ये आतापर्यंत कोरोना रुग्णांची संख्या 6485 पर्यंत पोहोचली आहे. राज्यात कोरोनामुळे आतापर्यंत 64 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत 3024 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.

संबंधित बातम्या :

Corona Special Report | महाराष्ट्र कोरोना रुग्णसंख्येत चीनच्या पुढे

India Corona Cases | दहा दिवसांत देशात कोरोनाचे 5 हजार बळी

साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.