AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cyber Fraud : ऑनलाईन फसवणुकीत हा नंबर येईल कामी, मोबाईलमध्ये जपून ठेवा हे 4 आकडे

Cyber Fraud : ऑनलाईन फसवणुकीसाठी आता सायबर भामटे पण अनेक क्लृप्त्या करतात. त्यामुळे फसवणुकीचे अनेक प्रकार घडतात. सायबर गुन्हेगारांच्या या चालबाजीविरोधात हा रामबाण उपाय ठरेल फायद्याचा..

Cyber Fraud : ऑनलाईन फसवणुकीत हा नंबर येईल कामी, मोबाईलमध्ये जपून ठेवा हे 4 आकडे
सायबर क्राईम
| Updated on: Feb 17, 2023 | 10:37 PM
Share

नवी दिल्ली : देशात सायबर गुन्हे (Cyber Crime) सातत्याने वाढत आहेत. डिजिटल व्यवहार जसे वाढले आहेत, तसा हा धोका आणखी वाढला आहे. कितीही काळजी घेतली तरी कोणत्या ना कोणत्या प्रकारे फसवणूक होतेच. ऑनलाईन फसवणुकीसाठी सायबर भामटे अनेक क्लृप्त्या वापरतात. आयडियाची कल्पना लढवत ग्राहकांचे खाते साफ करण्यात येते. ऑनलाईन फसवणूक (Online Fraud) होऊ नये यासाठी केंद्र सरकार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) सातत्याने इशारा देते. तसेच जागरुकतेसाठी अनेक कार्यक्रम घेतल्या जातात. ग्राहकांची फसवणूक झाली तर त्यांना मदतीसाठी हेल्पलाईनही सुरु करण्यात आली आहे.

सायबर गुन्ह्यांना पायबंद घालण्यासाठी केंद्र सरकारने चार अंकी एक क्रमांक जारी केला आहे. हा क्रमांक प्रत्येक नागरिकाच्या मोबाईलमध्ये जतन असायला हवा. त्यामुळे आवश्यकतेवेळी हा मोबाईल क्रमांक तुम्हाला उपयोगी पडेल. या क्रमांका आधारे तुम्हाला सायबर फसवणुकीची थेट तक्रार करता येईल. त्यामुळे हा क्रमांक सेव्ह करणे तुमच्या फायद्याचे आहे.

सार्वजनिक क्षेत्रातील कॅनेरा बँकेने (Canara Bank) याविषयीचे ट्विट केले आहे. ग्राहकांना त्यांनी हेल्पलाईन क्रमांकाची माहिती दिली आहे. बँकेने ट्विट करत सांगितले की, आता कोणत्याही सायबर फसवणुकीविरोधात ग्राहकांना थेट तक्रार करता येईल. त्यासाठी राष्ट्रीय सायबर क्राईमच्या हेल्पलाईन क्रमांकाची मदत घेता येईल.

ऑनलाईन फसवणुकीविरोधात ग्राहकांना https://cybercrime.gov.in या संकेतस्थळावरही तुम्हाला तक्रार नोंदविता येईल. राष्ट्रीय सायबर गुन्हे विभागाने हेल्पलाईन क्रमांक प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार, तुम्ही 1930 या हेल्पलाईन क्रमांकावर तक्रार नोंदवू शकता. हा क्रमांक तुम्हाला मोबाईलमध्ये सेव्ह करता येईल.

2021 मध्ये सायबर हॅकिंगच्या 469 घटना समोर आल्या आहेत. तर या वर्षी 2022 मध्ये एकट्या विमा क्षेत्रालाच सायबर भामट्यांनी लक्ष्य केले आहे. फसवणुकीच्या जवळपास 283 घटना समोर आल्या आहेत. दरवर्षी सायबर गुन्ह्याच्या घटना वाढत आहे.  सायबर गुन्हेगार फसवणुकीसाठी अनेक युक्त्या वापरतात.

CloudSEK या संस्थेने एक अहवाल तयार केला आहे. त्यात 2021-22 या आर्थिक वर्षात वाढलेल्या सायबर गुन्ह्यातून हा आकडा समोर आला आहे. त्यानुसार भारतीय वित्त-बँकिंग आणि विमा क्षेत्रावर सायबर हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अनोळखी लिंकवर क्लिक करुन तुमचा तपशील शेअर करु नका.

आता केवळ देशातीलच नाही तर देशाबाहेरील सायबर भामट्यांकडूनही तुमची फसवणूक होऊ शकते. त्यामुळे तुम्हाला अशा फसवणुकीविरोधात नेहमीच अलर्ट राहणे आवश्यक आहे. कोणत्याही प्रलोभनाला, आमिषाला तुम्ही बळी पडला नाही तर तुमचा फायदा होईल.

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.