AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगातील असा एकमेव देश जिथे भाड्यानं भेटते बायको, फक्त पूर्ण करावी लागते ‘ही’ छोटीशी अट

मध्यस्थांच्या माध्यमातून असे लग्न केले जातात. या लग्नाचा कालावधी कमीत कमी पाच दिवस आणि जास्तीत जास्त 20 दिवस असतो. ज्याला लग्न करायचं आहे, अशा तरुणांकडून विशिष्ट रक्कम घेतली जाते.

जगातील असा एकमेव देश जिथे भाड्यानं भेटते बायको, फक्त पूर्ण करावी लागते 'ही' छोटीशी अट
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 22, 2025 | 5:03 PM
Share

जगात असाही एक देश आहे, जिथे 15 दिवसांसाठी लग्न केलं जातं. इथे 15 दिवसांच्या करारावर लग्न केलं जातं. करार समाप्त झाल्यानंतर लग्न देखील संपुष्टात येतं. या देशांमध्ये तरुणी देखील 15 दिवसांच्या लग्नासाठी तयार होतात, कारण त्यांना हे चांगलंच माहिती असतं की हे फक्त 15 दिवसांसाठीचं लग्न आहे. त्याबदल्यात त्यांना मोबदला देखील मिळतो. त्यामुळे त्यांची देखील या लग्नाला संमती असते.

या लग्नाला शॉर्ट टर्म मॅरेज असं देखील म्हटलं जातं, सुरुवातील ही प्रथा जागातील अनेक देशांमध्ये प्रचलित होती. मात्र आता हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच देश आहेत, ज्या देशांमध्ये आज ही प्रथा सुरू आहे. इंडोनेशियामध्ये मोठ्या प्रमाणात आजही या पद्धतीने लग्न होतात तर ईराण आणि ईराकमध्ये देखील काही प्रमाणात ही प्रथा सुरू असल्याचं पाहायला मिळतं. इंडोनेशियामध्ये ही प्रथा सुरू आहे, इथे एक महिला वर्षातून कमीत -कमी 20 ते 25 वेळा लग्न करू शकते.

मध्यस्थांच्या माध्यमातून असे लग्न केले जातात. या लग्नाचा कालावधी कमीत कमी पाच दिवस आणि जास्तीत जास्त 20 दिवस असतो. ज्याला लग्न करायचं आहे, अशा तरुणांकडून विशिष्ट रक्कम घेतली जाते, त्यातून एक हिस्सा हा मध्यस्थाला देखील दिला जातो. त्यानंतर त्यांचं लग्न लावलं जातं. हे लग्न 15 दिवसांच्या कालावधी साठी असते. 15 दिवसांनंतर हा करार आपोआप संपुष्टात येतो.

इंडोनेशियामध्ये ही प्रथा अजूनही सुरू आहे. इथे येणारे पर्यटक येथील तरुणींसोबत या पद्धतीचं लग्न करतात, या बदल्यात त्या तरुणींना पैसे मिळतात. ज्याचा उपयोग ते आपलं घर चालवण्यासाठी करतात. याबाबत बोलताना एका 28 वर्षीय महिलेनं माहिती दिली की, 15 दिवसांच्या करारावर लग्न केलं जातं. वर्षभरात एक तरुणी अशा पद्धतीने वीस ते बावीस लग्न देखील करू शकते. एका लग्नाचा मोबदला म्हणून 300 ते 500 डॉलर भेटतात ज्याची किंमत भारतीय रुपयांमध्ये 25 ते 43 हजार रुपये इतकी असते. त्यानंतर तुम्हाला लग्नाला परवानगी मिळते.

Follow Us
शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा
Eknath Shinde | एकनाथ शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा, नेमकं काय ठरलं?
आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं...
Tv9 Marathi Special Report | फक्त आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं; सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी...
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी गठीत केली उच्चस्तरीय समिती
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी