Operation Sindoor : 7 मे ची रात्र, ती 23 मिनिटं, AIR STRIKE करण्याआधी IAF ने असं काय केलेलं? महत्त्वाची माहिती समोर
Operation Sindoor : भारताने 7 मे च्या मध्यरात्री ऑपरेशन सिंदूर सुरु केलं. भारताने या Action मधून आपली अत्यंत अचूक प्रहार करण्याची आपली क्षमता दाखवून दिली. पण त्याचवेळी ही कारवाई सुरु करण्याआधी अजून एक मोठी गोष्ट केली, ती माहिती आता समोर आली आहे.

ऑपरेशन सिंदूर हे भविष्यात अन्य देशांसाठी सुद्धा उपयुक्त ठरणार आहे. दुसरे देश त्यांच्या लष्करी मोहिमांच्या आखणीसाठी ऑपरेशन सिंदूरचा नक्कीच अभ्यास करतील. ऑपरेशन सिंदूर हे भविष्यात इतर देशांसाठी का उपयुक्त ठरले ते समजून घ्या. भारताने 7 मे च्या मध्यरात्री ऑपरेशन सिंदूर सुरु केलं. पाकिस्तान आणि POK मधील नऊ दहशतवादी तळांवर अत्यंत अचूक प्रहार केला. भारतीय सैन्य दलांनी एअर स्ट्राइक केला. त्यासाठी मिसाइल्स आणि आत्मघातकी ड्रोन्सचा वापर करण्यात आला. भारताच्या या कारवाईच वैशिष्ट्य म्हणजे कोलॅट्रल डॅमेज होऊ दिलं नाही. म्हणजे सोप्या शब्दात सांगायच झाल्यास जे टार्गेट होतं, ते फक्त दहशतवादीच मारले. अन्य सर्वसामान्य नागरिकांना हानी पोहोचवली नाही. भारताने या Action मधून अत्यंत अचूक प्रहार करण्याची आपली क्षमता दाखवून दिली. पण त्याचवेळी अजून एक मोठी गोष्ट केली, ती आता समोर आली आहे.
इंडियन एअर फोर्सने 7 मे च्या रात्री पाकिस्तानातू घुसून एअर स्ट्राइक केला. त्यावेळी पाकिस्तान हा हल्ला का रोखू शकला नाही? त्याची माहिती समोर आलीय. पाकिस्तानकडे सुद्धा अत्याधुनिक रडार, फायटर जेट्स आहेत. पण त्यांना काहीच करता आलं नाही, ते हतबल ठरेल. कारण इंडियन एअर फोर्सने ही कारवाई सुरु केली, त्यावेळी पाकिस्तानी रडार जॅम करुन टाकले. म्हणजे पाकिस्तानच्या हवाई हद्दीत काय घडतय हेच त्यांना कळलं नाही. पाकिस्तानकडे चिनी बनावटीची HQ 9 मिसाइल बॅटरी आणि रडार्स आहेत. पण या एअर डिफेन्स सिस्टिमचे रडारच जॅम करुन टाकले. त्यामुळे 23 मिनिटात अत्यंत अचूकतेने भारताने आपलं मिशन संपवलं. सध्या भारताकडे पाकिस्तानपेक्षा कितीतरी पटीने जास्त, प्रभावी अत्याधुनिक प्रणाली आहे हे यातून दिसून आलं.
या बाबतीत भारत पाकिस्तानपेक्षा खूपच पुढे
पाकिस्तानकडे चिनी बनावटीची PL 15 ही BVR म्हणजे नजरेपलीकडच्या टार्गेटवर हल्ला करणारी अत्याधुनिक मिसाइल्स आणि कामिकाझे ड्रोन्स आहेत. पण भारताच्या एअर डिफेन्स सिस्टिमसमोर हा चिनी आणि तुर्कीचा माल पुरता निष्प्रभ ठरला. भारताने पाकिस्तानने डागलेली मिसाइल्स आणि ड्रोन्स हवेतच नष्ट केली. भारत हवाई शक्तीमध्ये पाकिस्तानपेक्षा खूपच पुढे आहे.
