AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमेरिकेला जे जमलं नाही ते भारतानं करून दाखवलं, ऑपरेशन सिंदूर अन् अजित डोभाल यांची 26 वर्षांपूर्वीची ती भीष्म प्रतिज्ञा पूर्ण

भारतानं पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक केला, या हल्ल्यामध्ये पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमधील तब्बल 9 दहशतवादी ठिकाणं उद्ध्वस्त करण्यात आली आहेत, अजित डोभाल यांची प्रतिज्ञा देखील पूर्ण झाली आहे.

अमेरिकेला जे जमलं नाही ते भारतानं करून दाखवलं, ऑपरेशन सिंदूर अन् अजित डोभाल यांची 26 वर्षांपूर्वीची ती भीष्म प्रतिज्ञा पूर्ण
Ajit DovalImage Credit source: tv9 marathi
| Updated on: May 08, 2025 | 7:26 PM
Share

भारतानं पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक केला, या हल्ल्यामध्ये पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमधील तब्बल 9 दहशतवादी ठिकाणं उद्ध्वस्त करण्यात आली आहेत, या हल्ल्यामध्ये शंभर पेक्षा अधिक दहशतवादी मारले गेले आहेत, भारतानं अनेक वर्षांपासूनचा पाकिस्तानसोबतचा आपला हिशोब चुकता केला आहे. याचबरोबर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांची ती प्रतिज्ञा देखील पूर्ण झाली आहे.

24 डिसेंबर 1999 ला घडलेली कंधार विमान हायजॅकची घटना तुम्हाला आठवतच असेल, दहशतवाद्यांनी 24 डिसेंबर 1999 रोजी काठमांडूहून लखनऊला येणाऱ्या विमानाचं अपहरण केलं होतं. त्यानंतर हे विमान कंधारला नेण्यात आलं. या विमानात 176 प्रवासी, पायलट आणि 15 क्रू मेंबर्स होते. विमान सोडण्याच्या बदल्यात दहशतवाद्यांनी भारतीय तुरुंगात असलेल्या मसूद अझहर याच्या सुटकेची मागणी केली होती. मात्र तेव्हा प्रवाशांना वाचवण्याचा दुसरा कोणताच मार्ग दिसत नसल्यानं मसूद अझहर याला मुक्त करावं लागलं, परंतु तेव्हाच अजित डोभाल यांनी या प्रकरणातील दहशतवाद्यांना मारण्याची प्रतिज्ञा केली होती, अखेर 26 वर्षांनंतर अजित डोभाल यांची ही प्रतिज्ञा पूर्ण झाली आहे. कंधार विमान अपहरणाचा मास्टरमाइंड रौफ अझहर हा ऑपरेशन सिंदूरमध्ये मारला गेला आहे.

रौफ अझहर हा जैश -ए मोहम्मदचा आका मसूद अझहरचा छोटा भाऊ होता, मुंबईवर झालेला 26/11 चा हल्ला, संसद भवनावर झालेला हल्ला, तसेच पठानकोट हल्ला अशा अनेक दहशतवादी कारवायांमध्ये त्याचा सहभाग होता. भारताकडून त्याचा शोध सुरू होता, अमेरिकेला देखील तो हवा होता. कारण अमेरिकन प्रवाशी असलेल्या डेन‍ियल पर्ल याला मारण्यामध्ये त्याचाच हात असल्याचं समोर आलं होतं, अमेरिका तर त्याला शोधू शकली नाही, मात्र भारतानं मंगळवारी केलेल्या कारवाईमध्ये त्याचा मृत्यू झाला, अजित डोभाल यांची 26 वर्षांपूर्वीची ती प्रतिज्ञा अखेर पूर्ण झाली आहे.

पाकिस्तानच्या उलट्या बोंबा 

दरम्यान भारताच्या या एअर स्ट्राईकनंतर आता पाकिस्तानकडून उलटा दावा करण्यात येत आहे. भारतानं जिथे हल्ला केला तिथे दहशतवादी अड्डे नव्हतेच असं पाकिस्तानने म्हटलं आहे.

काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा.
भाजपकडून धंगेकरांची कोंडी? मुलगा अपक्ष निवडणूक लढणार; सुत्रांची माहिती
भाजपकडून धंगेकरांची कोंडी? मुलगा अपक्ष निवडणूक लढणार; सुत्रांची माहिती.
त्यांचा आणि आमचा काडीचाही संबंध नाही! अशोक चव्हाणांचं मोठं वक्तव्य
त्यांचा आणि आमचा काडीचाही संबंध नाही! अशोक चव्हाणांचं मोठं वक्तव्य.
ठाकरे बंधूंकडून पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त 16 जागांचा प्रस्ताव?
ठाकरे बंधूंकडून पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त 16 जागांचा प्रस्ताव?.
प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आज लोकलचं वेळापत्रक बघूनचं घराबाहेर पडा
प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आज लोकलचं वेळापत्रक बघूनचं घराबाहेर पडा.
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.