Explained : ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तान एअर फोर्सला किती वर्ष मागे ढकललं? समजून घ्या
भारताने ऑपरेशन सिंदूर लॉन्च केल्यानंतर पाकिस्तानच्या तिन्ही सैन्य दलांमध्ये त्यांच्या एअरफोर्सच सर्वात जास्त नुकसान झालं आहे. तीन दिवसांच्या या लढाईत पाकिस्तानने हल्ल्याचा प्रयत्न केल्यानंतर 9-10 मे च्या रात्री इंडियन एअर फोर्सने थक्क करणारा पराक्रम केला. भारताने या कारवाईसाठी कुठली फायटर जेट्स वापरली, त्यातून कुठली मिसाइल्स डागण्यात आली, वाचा त्याची Inside Story.

युद्धाची खुमखुमी आलेल्या पाकिस्तानला ऑपरेशन सिंदूरने चांगलाच धडा शिकवला आहे. तीन दिवसाच्या लष्करी संघर्षात पाकिस्तानला आपली मर्यादा आणि लायकी दोन्ही कळून चूकलय. अवघ्या चार दिवसांच्या लढाईत भारताने पाकिस्तानची हवाई शक्तीच संपवून टाकली. पाकिस्तानने अमेरिकेच्य पायावर लोळण घेऊन भीक मागितली नसती, तर पाकिस्तानी लष्कराचं यापेक्षाही मोठं नुकसान झालं असतं. चार दिवसांच्या या लढाईत पाकिस्तान एअर फोर्सला जबर फटका बसला आहे. F-16 च्या जीवावर उडणाऱ्या पाकिस्तानी हवाई दलाला भारतापेक्षा आपण किती मागे आणि जुनाट आहोत, हे सुद्धा चांगलं समजलय.
पाकिस्तानने भारतातली शहरं आणि लष्करी तळांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केल्यानंतर इंडियन एअर फोर्सने त्यांना दीर्घकाळ लक्षात राहील अशी अद्दल घडवली. इंडियन एअर फोर्सचा हवाई हल्ला अत्यंत अचूक आणि खोलवर होता, ज्याची पाकिस्तानने कल्पनाही केली नसेल. भारताच्या हवाई हल्ल्यात पाकिस्तानची रडार सिस्टिम कोसळली. कमांड आणि कंट्रोल सिस्टिम उद्धवस्त झाली तसच चिनी आणि तुर्की शस्त्रास्त्रांच्या मर्यादा कळल्या. ANI वृत्तसंस्थेने वरिष्ठ लष्करी सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिलीय.
कुठले मिसाइल्स वापरले?
भारताने 6 आणि 7 मे च्या रात्री बहावलपूर, मुरीदकेसह अन्य दहशतवादी तळ उडवून दिले. त्याला पाकिस्तानने प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानने मोठ्या प्रमाणात ड्रोन, रॉकेट्स आणि मिसाईलद्वारे हवाई हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण भारताच्या वेगवेगळ्या थराच्या एअर डिफेन्स सिस्टिमने हवेतच हे सर्व हल्ले परतवून लावले. पाकिस्तानच्या या नापाक हल्ल्यानंतर 9 आणि 10 मे च्या रात्री इंडियन एअर फोर्सने पाकिस्तानात अक्षरक्ष: तांडव केलं. भारतीय फायटर जेट्स आणि मिसाईल्सनी पाकिस्तानातील चकाला ते सरगोधा आणि रहीम यार खान, कराची येथील हवाई तळांना टार्गेट केलं. भारताने हा हल्ला करताना क्रूझ मिसाइल्स स्काल्प, ब्राह्मोस त्यानंतर आत्मघातकी ड्रोन्स वापरले.
भारताचा पहिला उद्देश काय होता?
पाकिस्तानी रडार आणि एअर डिफेन्स उद्धवस्त करणं. भारतीय शस्त्रांनी चिनी बनावटीची HQ-9 एअर डिफेन्स सिस्टिम आणि लाहोर येथील रडार स्टेशन उद्धवस्त केलं.
PAF च्या विमानांना सीमेजवळ का येता आलं नाही?
सीमेजवळच रडार स्टेशन उद्धवस्त झाल्याने पाकिस्तानी सैन्य दलं आंधळं झालं. S-400 आणि आकाश एअर डिफेन्स सिस्टिममुळे पाकिस्तानी एअर फोर्सची विमानं सीमेजवळ येऊ शकली नाहीत. त्यांना आपल्याच देशात अजून आत खोलवर उड्डाण करावं लागलं.
भारताच्या दोन जुन्या शस्त्रांची महत्त्वाची भूमिका
पाकिस्तानने चिनी आणि तुर्कीच्या ड्रोनद्वारे हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण सियाचीन ते नलियापर्यंत असलेल्या भारताच्या मजबूत एअर डिफेन्स सिस्टिमने हवेतच ही ड्रोन्स नष्ट केली. महत्त्वाच म्हणजे L-70 आणि ZU-23 या भारताच्या जुन्या सिस्टिमने सुद्धा ड्रोन्स पाडण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
युद्ध भूमीवर काय चाललय हेच त्यांना समजत नव्हतं
9 मे रोजी चकाला, मुरीद आणि सरगोधा या एअर बेसेसवरील कमांड आणि कंट्रोल सिस्टिम उद्धवस्त करण्यावर लक्ष केंद्रीत करण्यात आलं. मिराज, राफेल, Su-30, Mig-29 मधून स्काल्प आणि ब्राह्मोस मिसाइल्स डागून एअरबॉर्न अर्ली वॉर्निंग प्लेन आणि जमिनीवरील कंट्रोल सिस्टिमचा समन्वय तोडण्यात आला. यामुळे पाकिस्तान एअर फोर्स आंधळी झाली. युद्ध भूमीवर काय चाललय हेच त्यांना समजत नव्हतं. त्यामुळे ते योग्य प्रत्युतर देण्याच्या स्थितीत नव्हते, शिवाय येणारा हवाई धोका काय? हे सुद्धा त्यांना समजत नव्हतं. पक्षाघातासारखी पाकिस्तान एअरफोर्सची स्थिती झाली. आपल्या हालचाली समजू नयेत यासाठी पाकिस्तान एअरफोर्सला नागरी विमानांच्या आडून उड्डाण करावं लागत होतं. ही त्यांची अस्वस्थतता होती.
जमिनीवरुन जमिनीवर हल्ला करणारी मिसाइल्स डागली
10 मे रोजी रात्री 1 वाजता पाकिस्ताने जमिनीवरुन जमिनीवर हल्ला करणारी मिसाइल्स डागून आदमपूर, गुजरात आणि पंजाब येथील रणनितीक दृष्ट्या महत्त्वाच्या ठिकाणांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. पण भारताच्या स्वदेशी एअर डिफेन्सने त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडला. हवेतच ही मिसाइल्स नष्ट केली. काही मिसाइल्स भारतीय हद्दीत येऊन पडली, पण त्याचा स्फोट झाला नाही. नागरिकांच्या दृष्टीस पडल्यानंतर त्यांनी सैन्याला याची माहिती दिली.
पाकिस्तानी एअरफोर्स अजून किती वर्ष मागे गेलं?
10 मे ची सकाळ उजाडली, तेव्हा पाकिस्तानी एअरफोर्सच बरच नुकसान झालेलं होतं. कसं उत्तर द्यायच याची कुठलीच रणनिती त्यांच्याकडे नव्हती. त्यामुळे भारताकडे त्यांनी सीजफायरची मागणी केली. ही कारवाई म्हणजे पाकिस्तान आणि त्यांच्या पाठिराख्यांसाठी हा मोठा धक्का आहे. “हल्ल्याची अचूकता, तीव्रता आणि भारताची तयारी पाहून ते नक्कीच थक्क झाले असतील” असं एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं. ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तानी एअरफोर्सच मनोधैर्य खच्ची झालचं. पण त्यांच्या हवाई दलाला अजून पाच वर्ष मागे ढकललं.
