AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Operation Sindoor : अखेर हाजीपूरच्या महिलांची ‘ती’ प्रतिज्ञा पूर्ण, भारतानं पाकिस्तानवर एअर स्ट्राईक करताच लावलं कुंकू

भारतानं पाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राईकनंतर हाजीपूरच्या महिलांनी एकमेकिंना कुंकू लावून आनंद साजरा केला आहे. आमचा बदला पूर्ण झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

Operation Sindoor : अखेर हाजीपूरच्या महिलांची 'ती' प्रतिज्ञा पूर्ण, भारतानं पाकिस्तानवर एअर स्ट्राईक करताच लावलं कुंकू
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 07, 2025 | 3:53 PM
Share

22 एप्रिल रोजी पाकिस्तानी दहशतवाद्यांनी जम्मू काश्मीरच्या पहलगामध्ये मोठा हल्ला केला. या हल्ल्यामध्ये 26 जणांचा मृत्यू झाला होता. तर अनेक जण जखमी झाले होते. या घटनेनंतर संपूर्ण देशात संतापाची लाट होती. या घटनेमुळे अनेक महिलांचं कुंकू पुसलं गेलं होतं. त्यामुळे ज्यांनी या महिलांचं कुंकू पुसलं तो मरत नाही, आपला बदला पूर्ण होत नाही, तोपर्यंत कुंकू लावणार नाही अशी प्रतिज्ञा हाजीपूरच्या महिलांनी केली होती. अखेर मध्यरात्रीच्या सुमारास भारतानं पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमध्ये एअर स्ट्राईक केला. या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांचे एकूण 9 अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले आहेत, भारतानं पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला आहे, त्यानंतर आता हाजीपूरच्या महिलांनी आपल्या कपाळाला कुंकू लावलं आहे.

भारतानं पाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राईकनंतर हाजीपूरच्या गांधी आश्रमातील महिलांनी एकमेकिंना कुंकू लावून आनंद साजरा केला आहे. आज आमचा बदला पूर्ण झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात ज्या पद्धतीनं भारतीय लष्कराने पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केला, दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले ते पाहून मनाला खूप बरं वाटलं, अशी प्रतिक्रिया या महिलांनी दिली आहे. तसेच या महिलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानण्यासाठी एक पत्र देखील लिहिलं आहे.

भारतानं मध्यरात्रीच्या सुमारास पीओके आणि पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केला. या एअर स्ट्राईकमध्ये पाकव्याप्त काश्मीरमधील 5 तर पाकिस्तानमधील 4 दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले. या हल्ल्यामध्ये एकाही पाकिस्तानमधील सामान्य नागरिकाची जीवितहानी झालेली नाही, मात्र भारतानं ज्या ठिकाणी हल्ले केले तिथे दहशतवाद्यांचे अड्डे नव्हतेच, या एअर स्ट्राईकमध्ये पाकिस्तानचे 26 लोक मारले गेले तर 46 जण जखमी झाल्याचा दावा पाकिस्तानकडून करण्यात आला आहे. तसेच आम्ही भराताचे पाच लढाऊ विमानं पाडल्याचा दावा देखील पाकिस्ताननं केला आहे. भारतानं केलेल्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानला चांगलीच धडकी भरल्याचा चित्र आहे. या हल्ल्यामध्ये अनेक दहशतवादी ठार झाले आहेत.

Follow Us
मोदींच्या पंतप्रधानपदावर राऊतांचे भाकीत; बन यांच्याकडून प्रत्युत्तर
संजय राऊतांचा दावा: पंतप्रधान मोदींचा १७ सप्टेंबरला शेवटचा वाढदिवस असेल
राहुल गांधींनी झारखंडचाही दौरा करावा: चित्रा वाघ यांचे आवाहन
राहुल गांधींनी झारखंडचाही दौरा करावा: चित्रा वाघ यांचे आवाहन
लातूर शाळेतील शासकीय अनास्था आणि गैरव्यवस्थापन: तातडीने कारवाईची मागणी
लातूर शाळेतील शासकीय अनास्था आणि गैरव्यवस्थापन: तातडीने कारवाईची मागणी
पालकमंत्री गोगावलेंना तटकरेंच्या शुभेच्छा अजून नाहीत
पालकमंत्रीपदाच्या शुभेच्छा: भरत गोगावलेंना अजूनही सुनील तटकरेंच्या शुभेच्छांची प्रतीक्षा
आता काही खरं नाही! तुकाराम मुंढेंनी खाद्य तेलाबाबत घोषणा केलीच...
आता काही खरं नाही! तुकाराम मुंढेंनी घोषणा केलीच...  खाद्य तेलाबाबत एफडीएकडून कडक नियमावली
जज साहेब...बाळासाहेबांचे विचार...व्यंगचित्रातून शिंदे गटाचा ठाकरेंवर
जज साहेब...बाळासाहेबांचे विचार...व्यंगचित्रातून शिंदे गटाचा ठाकरे गटावर निशाणा!
पोलिस संरक्षण काढून ये मग... फलटणमध्ये निंबाळकर vs निंबाळकर,
Video : पोलिस संरक्षण काढून ये मग...  फलटणमध्ये निंबाळकर vs निंबाळकर, थेट बुलेटस्वारी करत स्वीकारलं चॅलेंज
गद्दारी करून मलाही आमदारकी... ठाकरेंच्या बड्या नेत्याचं विधान तुफान
गद्दारी करून मलाही आमदारकी... ठाकरेंच्या बड्या नेत्याचं विधान तुफान चर्चेत, असं काही घडलं की...
शिवसेना कोणाची? 2018 ची घटना आणि 19 लाख सदस्यांचा दावा, कोर्टात काय...
शिवसेना कोणाची? 2018 ची घटना आणि 19 लाख सदस्यांचा दावा, कामत यांचा युक्तिवाद, ठाकरेंना जिंकून देणार?
कोर्टातील युक्तिवाद संपवण्याआधी... ठाकरेच्या वकीलांची मोठी मागणी
कोर्टातील युक्तिवाद संपवण्याआधी... ठाकरेंचे वकील देवदत्त कामत यांची कोर्टाकडे मोठी मागणी