30 जानेवारीला दोन मिनिटांचं मौन, हालचालींवरही निर्बंध, शहीद दिवसासाठी केंद्राचा नवा आदेश

देशाच्या स्वातंत्र्यांसाठी बलिदान देणाऱ्यांच्या स्मरणार्थ मौन ठेवण्यास सांगण्यात आलं आहे. त्याशिवाय, यादरम्यान काम आणि हालचालींवरही निर्बंध असतील

30 जानेवारीला दोन मिनिटांचं मौन, हालचालींवरही निर्बंध, शहीद दिवसासाठी केंद्राचा नवा आदेश
Follow us
| Updated on: Jan 20, 2021 | 2:08 PM

नवी दिल्ली : महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्या पुण्यतिथीबाबत म्हणजेच 30 जानेवारीबाबत केंद्र सरकारने (Order For Martyrs Day) एक नवा आदेश जारी केला आहे. हा दिवस नेहमीप्रमाणे शहीद दिवसाच्या रुपात साजरा केला जाईल. सोबतच सर्व राज्य सरकार आणि केंद्र शासित प्रदेशांसाठी निर्देश जारी करण्यात आले आहेत. यामध्ये देशाच्या स्वातंत्र्यांसाठी बलिदान देणाऱ्यांच्या स्मरणार्थ मौन ठेवण्यास सांगण्यात आलं आहे. त्याशिवाय, यादरम्यान काम आणि हालचालींवरही निर्बंध असतील (Order for Martyrs Day).

शहीद दिवसासाठी जे आदेश गृह मंत्रालयाकडून जारी करण्यात आले आहेत त्यानुसार, 30 जानेवारीला प्रत्येक वर्षी सकाळी 11 वाजता दोन मिनिटांचं मौन ठेवलं जाईल. त्यासोबतच संपूर्ण देशात त्या दोन मिनिटांसाठी कुठलंही काम किंवा हालचाल होणार नाही. ज्या ठिकाणी सायरनची व्यवस्था असेल त्या ठिकाणी सायरन वाजवून मौनबाबत आठवण करुन दिली जाईल. काही-काही ठिकाणी याबाबत गनने फायर करुनही सूचना दिली जाईल. हा अलर्ट सकाळी 10.59 वाजता केला जाईल. त्यानंतर दोन मिनिटांसाठी मौन ठेवावं लागेल.

ज्या ठिकाणांवर सिग्नल नसेल तिथे सुविधेनुसार कुठल्याही पद्धतीने सूचना पोहोचवली जाऊ शकते. आधी काही कार्यालयांमध्ये मौनदरम्यान कामकाज सुरु राहायचं. सध्या याचे काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

महात्मा गांधी यांचा मृत्यू

30 जानेवारी 1948 ला महात्मा गांधी यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. 30 जानेवारी 1948 च्या संध्याकाली जेव्हा सायंकाळच्या प्रार्थनेसाठी जात होते तेव्हा नथुराम गोडसेने त्यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या, यामध्ये महात्मा गांधी यांचा मृत्यू झाला होता (Order For Martyrs Day).

संबंधित बातम्या :

ड्रॅगन फ्रुटच्या वाढत्या प्रसिद्धीचा फायदा घेण्याचा भाजप सरकारचा प्रयत्न? फळाचं चक्क नावच बदललं

दोन दिवस तीन अपघात, गुजरात-महाराष्ट्र-बंगाल, 28 मृत्यू, थंडी ठरतेय काळरात्र?

‘काँग्रेसच्या 50 वर्षाच्या काळातील विनाशकारी नितीमुळेच शेतकरी गरीब’, जावडेकरांचं राहुल गांधींना प्रत्युत्तर

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.