AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऑक्सिजनचे टेन्शन लवकरच संपणार; देशभर प्लान्ट उभारण्याच्या मोहिमेला गती

भारत मेच्या मध्यापर्यंत ऑक्सिजनची आवश्यकता आणि पुरवठा यांचा पूर्णपणे ताळमेळ घालू शकणार आहे. याबाबतीत भारत अधिकाधिक आत्मनिर्भर बनू शकणार आहे. रुग्णालयांमध्ये स्वत:चाच ऑक्सिजन प्लान्ट उभारण्याच्या मोहिमेने वेग घेतला आहे. (Oxygen tension will soon end; Accelerate the plant building campaign across the country)

ऑक्सिजनचे टेन्शन लवकरच संपणार; देशभर प्लान्ट उभारण्याच्या मोहिमेला गती
ऑक्सिजन
| Updated on: May 01, 2021 | 12:23 AM
Share

नवी दिल्ली : कोरोनाने भारताचे टेन्शन भलतेच वाढवले आहे. एकीकडे कोरोनाचा थैमान प्रचंड वेगाने वाढत असताना या विषाणूला थोपवण्यासाठी आरोग्य यंत्रणेकडून प्रयत्नांची पराकाष्ठा केली जात आहे. आरोग्य यंत्रणा विषाणूला हरवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करतेय, मात्र त्यातच ऑक्सिजन तुटवड्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. ऑक्सिजन न मिळाल्यामुळे अनेक कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावा लागत आहे. अशा संकटकाळात मे महिन्याच्या मध्यापर्यंत ऑक्सिजनच्या उत्पादनासंबंधी चांगली परिस्थिती निर्माण होण्याची चिन्हे आहेत. मागील दहा दिवसांत चहूबाजूंनी झालेल्या प्रयत्नांना पुढील महिन्यात चांगले यश मिळणार असल्याची आशा आहे. भारत मेच्या मध्यापर्यंत ऑक्सिजनची आवश्यकता आणि पुरवठा यांचा पूर्णपणे ताळमेळ घालू शकणार आहे. याबाबतीत भारत अधिकाधिक आत्मनिर्भर बनू शकणार आहे. रुग्णालयांमध्ये स्वत:चाच ऑक्सिजन प्लान्ट उभारण्याच्या मोहिमेने वेग घेतला आहे. (Oxygen tension will soon end; Accelerate the plant building campaign across the country)

न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर ऑक्सिजन उत्पादनामध्ये वेदांता प्लान्टची ताकद वापरली जाणार आहे. शुक्रवारी विदेशातून 1900 ऑक्सिजन कंसन्ट्रेटरचा पुरवठा भारताला करण्यात आला आहे. मोठ्या औद्योगिक कंपन्या ऑक्सिजन उत्पादनाच्या मोहिमेत उतरल्या आहेत. भारत सरकारनेही व्यक्तीगत रुपात ऑक्सिजन कंसन्ट्रेटरच्या आयतीला मंजुरी दिली आहे.

ऑक्सिजनच्या उत्पादनवाढीसाठी उपाय

देशातील 11 खाद्य कंपन्यांनी ऑक्सिजन उत्पादन युनिट लावण्याचे काम सुरू केले आहे. याच महिन्यात काही युनिटमध्ये ऑक्सिजनच्या उत्पादनाची सुरुवात केली जाणार आहे. रसायन आणि खाद्य विभागाच्या माहितीनुसार, या युनिटची उत्पादन क्षमता ताशी 1064 घनमीटर असेल. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, बिहार, झारखंड, ओडिशा, गुजरात, महाराष्ट्र आणि केरळच्या युनिटमध्ये ऑक्सिजन उत्पादनाची प्रक्रिया सुरू झाली आहे.

कुठली कंपनी कुठे युनिट उभारणार

– आरसीएफ ही खाद्य कंपनी मुंबईच्या पालिका रुग्णालयांत पोर्टेबल पीएसए युनिट उभारणार आहे. याची उत्पादन क्षमता ताशी 30 क्युबिक मीटर असेल. 10 मेपर्यंत या युनिटची स्थापना केली जाणार आहे. आरसीएफ महाराष्ट्रात अलिबाग आणि उत्तर प्रदेशच्या सिद्धार्थ नगरमध्ये ऑक्सिजन युनिट उभारणार आहे.

– सीएफसीएल राजस्थानच्या कोटामध्ये ऑक्सिजन युनिट उभारणार आहे. याची क्षमता ताशी 26 क्युबिक मीटर असेल. पुढील दीड महिन्यात हा युनिट कार्यान्वित होईल.

– कृभको गुजरातच्या सूरत, हजारिया आणि उत्तर प्रदेशच्या शाहजहांपूरमध्ये युनिट उभारणार आहे. याची उत्पादन क्षमता ताशी 30 क्युबिक मीटर असेल. 10 मेपर्यंत या शहरांच्या जिल्हा रुग्णालयांत ऑक्सिजन युनिट कार्यान्वित होण्याची आशा आहे.

– इंडो गल्फ, एफएसीटी, एनएफएल, आयपीएल, एचयूआरएल, इफको या मोठ्या औद्योगिक कंपन्या उत्तर प्रदेशात विविध ठिकाणी ऑक्सिजन उत्पादनाचे युनिट उभारणार आहेत.

– जीएसएफसी आणि जीएनएफसी तसेच इफको या कंपन्या गुजरातमध्ये ऑक्सिजनची उत्पादन क्षमता वाढवण्यास मोठा हातभार लावणार आहेत. (Oxygen tension will soon end; Accelerate the plant building campaign across the country)

इतर बातम्या

1 मे रोजी 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींचे लसीकरण होणार, महापालिकेची 5 लसीकरण केंद्रे सज्ज

Flipkart Big Saving Days Sale : G40 ते Razr 5G, मोटोरोलाचे स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.