19 लाख 10 लाखापेक्षा मोठे की छोटे? चिदंबरम यांचा बिहारमधील नोकऱ्यांवरुन भाजपला सवाल

काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी भाजपच्या 19 लाख नोकऱ्यांच्या आश्वासनावर जोरदार टोलेबाजी केली आहे.

19 लाख 10 लाखापेक्षा मोठे की छोटे? चिदंबरम यांचा बिहारमधील नोकऱ्यांवरुन भाजपला सवाल

नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीचा (Bihar Assembly Election) प्रचार शिगेला पोहचला आहे. त्यातच मतदारांना आकर्षित करण्यासाठी राजकीय पक्षांकडून घोषणांचा पाऊस पडत आहे. त्यातच राष्ट्रीय जनता दलाने दिलेल्या 10 लाख नोकऱ्यांच्या आश्वासनावर भाजपकडून जोरदार टीका झाली. त्यानंतर आता काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी भाजपच्या 19 लाख नोकऱ्यांच्या आश्वासनावर जोरदार टोलेबाजी केली आहे. तसेच 19 लाख 10 लाखापेक्षा मोठे आहेत की छोटे असा प्रश्न चिदंबरम यांनी भाजपला विचारला आहे (P Chidambaram criticize BJP over 19 lakh job promise in Bihar Election).

माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी एक ट्विट करत म्हटले, “बिहार विधानसभा निवडणुकीत राजदने 10 लाख नोकऱ्या देण्याचं आश्वासन दिलं. याची भाजप आणि जेडीयूच्या नेतृत्वातील एनडीएने चेष्टा केली. मात्र, यानंतर एनडीएने (NDA) आपल्या घोषणापत्रात बिहारमध्ये 19 लाख नोकऱ्या देण्याचं आश्वासन (Promise) दिलं. मला हे माहितीच नव्हतं की 10 च्या तुलनेत 19 छोटी संख्या आहे. मला वाटतं मी पुन्हा प्राथमिक शाळेत जायला हवं.”

भाजपचं आश्वासन निवडणुकीतील ‘जुमला’ : राहुल गांधी

चिदंबर यांच्या आधी गुरुवारी (22 ऑक्टोबर) राहुल गांधी यांनी देखील भाजपवर सडकून टीका केली होती. ते म्हणाले होते, “भाजपचं आश्वासन केवळ निवडणुकीतील ‘जुमला’ आहे. हे आश्वासन देखील भाजपच्या इतर आश्वासनांप्रमाणेच खोटं आश्वासन आहे.” यावेळी राहुल गांधी यांनी भाजपकडून बिहारच्या निवडणुकीत दिलेल्या मोफत कोरोना लशीच्या आश्वासनावरही निशाणा साधला. भारत सरकारने मोफत कोरोना लशीची घोषणा केली आहे. अधिक माहितीसाठी कृपया राज्यनिहाय निवडणूक कार्यक्रम पाहावा, असं म्हणत त्यांनी भाजपला टोला लगावला.

एनडीएने बिहारमध्ये मागील 13 वर्षांपेक्षा अधिक काळ सत्ता उपभोगूनही बिहारला विकासापासन आणखी दूर ढकललं आहे. त्यांनी जे काही आश्वासनं दिले ते केवळ निवडणुकीतील ‘जुमले’ आहेत.

दरम्यान, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी गुरुवारी (22 ऑक्टोबर) बिहारमध्ये भाजपचं घोषणापत्र मांडताना कोविड-19 लस बिहारमधील प्रत्येक नागरिकाला मोफत मिळेल अशी घोषणा केली होती. तसेच बिहारमधील युवकांसाठी 19 लाख नोकऱ्या निर्माण करु असंही आश्वासन दिलं.

हेही वाचा :

बिहार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात पंतप्रधान मोदी-राहुल गांधी आज आमनेसामने, रॅली आणि सभांचा धडाका

‘…हा आचारसंहितेचा भंग आहे’, बिहार निवडणुकांवरून जितेंद्र आव्हाडांची भाजपवर टीका

बिहार विधानसभा निवडणुकीतील तीन कट्टर विरोधक एकत्र! काय आहे कारण?

P Chidambaram criticize BJP over 19 lakh job promise in Bihar Election

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *