AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानला वाचायचं असेल तर… पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काय सांगितलं?

भारतानं प्रत्युत्तर म्हणून हल्ले करत पाकिस्तानचे अनेक एअरबेस आणि रडार सिस्टिम उद्ध्वस्त केली. यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला संबोधित केले. यावेळी त्यांनी पाकिस्तानला वाचायचं असेल तर एक मार्ग सुचवला आहे.

पाकिस्तानला वाचायचं असेल तर... पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काय सांगितलं?
pm narendra modi 2
| Updated on: May 12, 2025 | 11:47 PM
Share

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे एअर स्ट्राईक करत 9 दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. या हल्ल्यामध्ये 100 पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून ड्रोन हल्ला करण्यात आला. भारतानं हा हल्ला परतून लावला. त्यानंतर भारतानं प्रत्युत्तर म्हणून हल्ले करत पाकिस्तानचे अनेक एअरबेस आणि रडार सिस्टिम उद्ध्वस्त केली. यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला संबोधित केले. यावेळी त्यांनी पाकिस्तानला वाचायचं असेल तर एक मार्ग सुचवला आहे.

“ऑपरेशन सिंदूर दरम्यान जगाने पाकिस्तानचा चेहरा पाहिला आहे. मारलेल्या दहशतवाद्यांना निरोप देण्यासाठी पाकिस्तानचे अधिकारी होते. स्टेट स्पॉन्सर्ड टेररीझमचा हा मोठा पुरावा आहे. भारत आणि आपल्या नागरिकांना वाचवण्यासाठी आम्ही सातत्याने निर्णायक पावलं उचलत राहू. युद्धाच्या मैदानात आम्ही पाकिस्तानला प्रत्येकवेळी धूळ चारली आहे. यावेळी ऑपरेशन सिंदूरने नवीन आयाम जोडला आहे. आम्ही डोंगर आणि रेतीच्या प्रदेशात आपलं कौशल्य सिद्ध केलं आहे. आपल्या मेड इन हत्याचारे ही महत्त्वाची ठरल्याचं आपण पाहिलं आहे. प्रत्येक प्रकारच्या दहशतवादा विरोधात आपल्या सर्वांनी एकजूट राहणं आपली एकता, आपली सर्वात मोठी शक्ती आहे. हे युग युद्धाचं नाहीये. पण हे युग आतंकवादाचंही नाहीये. टेररिझमच्या विरोधात झिरो टॉलरन्स ही एक चांगल्या जगाची गॅरंटी आहे”, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

टेरर आणि ट्रेड एकत्र होणार नाही

“पाकिस्तानी फौज आणि पाकिस्तानचं सरकार ज्या पद्धतीने आतंकवादाला खतपाणी घालत आहे, ते एक दिवस पाकिस्तानलाच संपवेल. पाकिस्तानला वाचायचं असेल तर टेरर इन्फ्रास्ट्रक्चरचा सफाया करावा लागेल. त्याशिवाय शांतीचा काहीही मार्ग नाही. भारताचं मत एकदम स्पष्ट आहे. टेरर आणि टॉक एकसाथ होणार नाही. टेरर आणि ट्रेड एकत्र होणार नाही, पाणी आणि खूनही एक साथ वाहू शकत नाही. मी आज विश्वालाही सांगेल की, आमची कोशीश निती होती. पाकिस्तानशी चर्चा होईल तर टेररिझमवरच होईल. चर्चा होईल तर पीओकेवरही होईल”, असा इशारा नरेंद्र मोदींनी म्हटले.

प्रत्येक भारतीय शांतीने जगू शकेल

“प्रिय देशवासियांनो, आज बुद्ध पौर्णिमा आहे. भगवान बुद्धाने शांतीचा रास्ता दाखवला आहे. शांतीचा मार्गही शक्तीने जातो. मानवता, शांती समृद्धीकडे जाओ, प्रत्येक भारतीय शांतीने जगू शकेल, विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करू शकेल यासाठी भारताचं शक्तीशाली होणं गरजेचं आहे. गरज पडल्यावर या शक्तीचीही गरज आहे. गेल्या काही दिवसात भारताने हेच केलं आहे. मी पुन्हा मी भारताची सैन्य आणि सशस्त्र बलाला सॅल्यूट करतो”, असेही पंतप्रधान मोदींनी म्हटले.

जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्..
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात....
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?.
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार.
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा.
ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी...
ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी....
देवयानी फरांदे यांची भाजप पक्षप्रवेशांवरून नाराजी, FB पोस्टनं खळबळ
देवयानी फरांदे यांची भाजप पक्षप्रवेशांवरून नाराजी, FB पोस्टनं खळबळ.