AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘आपले प्राण वाचवा…’, भारताच्या हल्ल्यानंतर मशिदीत लपला पाकिस्तान लष्कराच्या कमांडर

Operation Sindoor News: भारताने केलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानी लष्करातील अधिकारी प्रचंड घाबरले होते. यासंदर्भात एक रेडिओ चॅटच्या माध्यमातून माहिती बाहेर आली आहे. त्यात पाकिस्तानी कमांडर हल्ल्यानंतर मशिदीत लपल्याचे समोर आले आहे.

'आपले प्राण वाचवा...', भारताच्या हल्ल्यानंतर मशिदीत लपला पाकिस्तान लष्कराच्या कमांडर
भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानी अधिकारी घाबरले (फाईल फोटो) Image Credit source: TV 9 Marathi
| Updated on: May 24, 2025 | 11:12 AM
Share

Operation Sindoor News: पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर कारवाई केली. ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानमधील दहशतवाद्यांची तळ नष्ट केली. त्यानंतर पाकिस्तानकडून भारतावर ड्रोन आणि क्षेपणास्त्राने हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. भारताने हा हल्ला परतवून लावला. त्यांचे सर्व ड्रोन आणि क्षेपणास्त्र हवेतच नष्ट केले. त्यावेळी पाकिस्तानने सीमेवर प्रचंड गोळीबार केला. त्याला भारताने जोरदार प्रत्युत्तर दिले. भारताच्या या जबरदस्त हल्ल्यानंतर पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील मुझफ्फरबाद येथील पोस्टवरुन पाकिस्तान कमांडर पळून गेला. भारतीय लष्करी अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनंतर आयएएनएस या न्यूज एजन्सीने ही माहिती दिली. भारतीय लष्कराला पाकिस्तानी लष्कराच्या रेडिओ चॅटवरुन ही माहिती मिळाली आहे.

पाकिस्तानच्या 75 व्या इन्फँट्री ब्रिगेडमधील एक वरिष्ठ कमांडर पीओकेमधील मुझफ्फराबाद येथे तैनात होता. भारताकडून झालेल्या हल्ल्यानंतर तो प्रचंड घाबरला. त्यानंतर तो आपली पोस्ट रिकामी करत पळून गेला. त्यावेळी कनिष्ठ अधिकाऱ्याने वायरलेसवर त्या कमांडरला ऑपरेशन पुन्हा सुरु करण्याबाबत विचारले. त्याला तो कमांडर म्हणाला, ऑफिस नंतर सुरु करु, आधी आपले प्राण वाचवा.

रिडिओ चॅटवरुन मशिदीत लपल्याचे खुलासा

रिडिओ चॅटवर ऐकण्यात आलेल्या संदेशानुसार कमांडर लपण्यासाठी मशिदीत घुसला होता. चॅटमध्ये एका कनिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले, आमचे कमांडर मोठ्या अवघड परिस्थिती पळाले आहेत. ते मशिदीत नमाज अदा करत आहेत. भारताचा हल्ला थांबल्यानंतरच ते परतणार असल्याचे म्हणाले आहे.

दरम्यान, या घटनेमुळे पाकिस्तानी लष्कराचे मनौधर्य किती खालवले आहे, त्याची माहिती मिळत आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर भारताने पाकिस्तानी लष्कराची चांगलीच धुलाई केली होती. तसेच ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानचे प्रचंड नुकसान केले. या ऑपरेशनमध्ये 25 मिनिटांत 24 क्षेपणास्त्र डागण्यात आले. दहशतवाद्यांची नऊ तळ उद्ध्वस्त केली. त्यात लश्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मद यांचे प्रशिक्षण शिबीर आहे. भारताच्या या ऑपरेशनमध्ये 100 पेक्षा जास्त जास्त दहशतवादी मारले गेले. त्यात यूसुफ अझहर आणि अब्दुल मलिक रऊफ यासारखे मोठे दहशतवादी आहेत.

पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.