पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंती, धर्मेंद्र प्रधान यांनी वाहिली आदरांजली
पंडित दिनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त भाजप नेत्यांनी आदरांजली वाहिली. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी त्यांच्या एकात्मिक मानवतावादाचे कौतुक केले. उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान मोदी यांनीही त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

भारतीय जनता पक्षाचे प्रणेते आणि भारतीय जनसंघाचे ज्येष्ठ नेते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांना आदरांजली वाहिली. यावेळी दिल्ली भाजप अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान , मंत्री आशिष सूद, खासदार प्रवेश वर्मा आणि इतर अनेक नेत्यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेला फुले अर्पण करून आदरांजली वाहिली.
या प्रसंगी बोलताना केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, भारतीय राजकारणात, आदरणीय दीनदयाळ उपाध्याय यांनी एकात्मिक मानवतावाद आणि अंत्योदय सारख्या प्रगतीशील विचारांद्वारे समाजाला एक नवीन दिशा देण्याचे उत्तम काम केले. समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत विकास आणि कल्याण पोहोचले तरच समाजाची खरी उन्नती शक्य आहे असे त्यांचे मत होते. पंडित दीनदयाळ उपाध्याय जी यांचे भारतीय राजकारण आणि समाजातील योगदान अविस्मरणीय राहील आणि त्यांचे दृष्टिकोन आपल्याला नेहमीच एक मजबूत, समृद्ध आणि स्वावलंबी भारत निर्माण करण्यासाठी प्रेरणा देईल, असे ते म्हणाले. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी भारतीय समाज, अर्थव्यवस्था, शिक्षण आणि प्रशासनाला स्पष्ट दिशा दाखवली. ते आपल्या सर्वांसाठी प्रेरणास्त्रोत आहेत. त्यांनी भारताच्या शिक्षण आणि निर्मितीवर विस्तृतपणे लिहिले आहे. पंतप्रधान मोदी त्यांच्या विचारांवर आधारित कल्याणकारी सरकार चालवत आहेत. आम्ही त्याच भारतीय तत्वज्ञानावर आणि त्यांच्या विचारांवर काम करत आहोत जे त्यांनी दशकांपूर्वी सांगितले होते” असेही त्यांनी नमूद केलं.
#WATCH दिल्ली: केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान ने कहा, “आज भारतीय विचार के प्रमुख स्तंभ पंडित दीनदयाल उपाध्याय जी की जन्म जयंती है। वे हम सभी की प्रेरणा के स्रोत हैं… उन्होंने पर्याप्त मात्रा में भारत की शिक्षा और रचना पर उल्लेख किया है… उन्हीं के विचारों के आधार पर… https://t.co/Be6DviJxmE pic.twitter.com/Mqlm1y9Zmy
— ANI_HindiNews (@AHindinews) September 25, 2025
उपराष्ट्रपति सी. पी. राधाकृष्णन यांनी वाहिली आदरांजली
उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांनीही पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली. सोशल मीडियावर त्यांनी एक पोस्टही केली. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी खोल चिंतन करत अत्यंत साधेपणाचे जीवन जगले असे त्यांनी लिहीले. त्यांच्या मृत्यूच्या वेळी त्यांच्या खिशात फक्त 5 रुपये होते. त्यांनी संस्कृतीत रुजलेल्या, करुणेने प्रेरित आणि अविभाज्य मानवतावादाने मार्गदर्शन केलेल्या भारताची कल्पना केली होती. त्यांचे जीवन अखंड मानवतावादाचे जिवंत उदाहरण होते आणि ते भारताचे खरे सेवक होते असेही त्यांनी नमूद केलं.
पंतप्रधान मोदींनी दिला आठवणींना उजाळा
पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे स्मरण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ते भारतमातेचे एक महान सुपुत्र आणि एकात्मिक मानवतावादाचे प्रणेते होते. त्यांचे राष्ट्रवादी आदर्श आणि अंत्योदयाचे तत्व देशाला समृद्धीकडे घेऊन गेले असे पंतप्रधान मोदींनी सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहीलं.
भारत माता के महान सपूत और एकात्म मानववाद के प्रणेता पंडित दीनदयाल उपाध्याय जी को उनकी जयंती पर कोटिश: नमन। देश को समृद्धि की राह दिखाने वाले उनके राष्ट्रवादी विचार और अंत्योदय के सिद्धांत विकसित भारत के निर्माण में बहुत काम आने वाले हैं। pic.twitter.com/Lrj39Nn7wP
— Narendra Modi (@narendramodi) September 25, 2025
तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही भारतीय जनसंघाचे संस्थापक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली. त्यांच्या अविभाज्य मानवतावादाच्या तत्वज्ञानाद्वारे, दीनदयाळ यांनी व्यक्ती, समाज आणि राष्ट्र यांना एक अविभाज्य भाग म्हणून पाहण्यावर आणि आर्थिक प्रगतीसह नैतिक आणि सांस्कृतिक उन्नतीवर भर दिला असे सोशल मीडिया पोस्टमध्ये गृहमंत्र्यांनी म्हटले. पंडित दीनदयाळ यांचे ‘सांस्कृतिक राष्ट्रवाद’ आणि ‘अंत्योदय’ हे तत्व प्रत्येक देशभक्तासाठी खरोखर प्रेरणादायी आहेत असेही त्यांनी लिहीले.
