या बॅलेट बॉक्सनेच देशातील दिग्गज नेत्यांचे उघडले ‘नशीब’; मतदान पेट्यांची रंजक कथा

Godrej Ballot Box : आज ईव्हीएमवरुन देशात मोठा गदारोळ उठला आहे. मतदानात हेराफिरी होत असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. विरोधकांसह अनेक संघटना पु्न्हा मतदान पेटीत (Ballot Box) मतदान प्रक्रिया राबविण्याची मागणी करत आहेत.

या बॅलेट बॉक्सनेच देशातील दिग्गज नेत्यांचे उघडले 'नशीब'; मतदान पेट्यांची रंजक कथा
या मतपेट्यांनी उघडले दिग्गजांचे नशीब
Follow us
| Updated on: Apr 04, 2024 | 11:54 AM

लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम तापला आहे. इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन (EVM) विषयी सत्ताधारी आणि विरोधकांच्या आरोपांच्या फैरी सुरु आहेत. ईव्हीएममुळे मतदानात हेराफेरी होत असल्याचा विरोधकांनी खुल्या मंचावरुन आरोप केला आहे. तर निवडणूक आयोगाने त्याला उत्तर दिले आहे. पण 1998 पूर्वी देशात मतदानासाठी बॅलेट पेपरचा वापर करण्यात येत होता, हे अनेकांना माहिती सुद्धा नाही. 1951-52 मधील निवडणूक कशी झाली. भारताचे पहिले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून ते अटल बिहारी वाजपेयी यांच्यापर्यंत अनेक दिग्गजांचे नशीब या मतपेटीत कसे बंद झाले. अनेकांना या मतपेटीने कशी लॉटरी लावली, त्यांची ही रंजक कथा…

पहिल्या निवडणुकीत 12 लाखांहून अधिक बॅलेट बॉक्स

  • वर्ष 1951-52 मध्ये देशात पहिल्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या होत्या. तेव्हा देशात लोकसभा आणि राज्यांतील विधानसभांच्या निवडणुका एकत्र झाल्या होत्या. भारत नेमकाच स्वतंत्र झाला होता. इतक्या मोठ्या प्रमाणात निवडणुका होण्यासाठी निवडणूक आयोगाचा कस लागला होता. निवडणूक आयोगाने जोरदार तयारी केली. बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यात आल्या.
  • त्यावेळी देशातील अनेक कंपन्यांना निवडणुकीतील बॅलेट बॉक्सविषयी, मतपेट्या तयार करण्याविषयीचा अनुभव गाठीशी नव्हता. त्यातील सुरक्षेसंदर्भातील माहिती नव्हती. तेव्हा हे शिवधनुष्य गोदरेज समूहाने शिर धरले. मुंबईतील त्यांच्या प्रकल्पात त्याकाळी 12.83 लाख बॅलेट बॉक्स तयार करण्यात आले.

गोदरेजचं मास्टर

हे सुद्धा वाचा

त्याकाळी देशात गोदरेज समूहच लॉकर, ताले तयार करत होत. या कंपनीकडे याविषयीचा अनुभव होता. प्रत्येक दिवशी 15,000 बॅलेट बॉक्स तयार करण्याची कामगिरी पार पडत केवळ चार महिन्यात या कंपनीने 12.24 लाख बॅलेट बॉक्स तयार करण्याच पराक्रम केला होता. इतकेच नाही तर ज्या इतर कंपन्यांना हे काम जमलं नाही, त्यांची पण ऑर्डर गोदरेजनेच पूर्ण करुन दिली होती.

मतदान पेटीची किंमत 5 रुपये

  1. गोदरेज आर्काइव्सनुसार, बॅलेट बॉक्ससाठी लॉकिंग सिस्टिम तयार करण्यासाठी इंटरनल लॉक्सचा वापर करण्यात आला. तिजोरीप्रमाणे मतदान पेट्यांना ऑउटर लॉक्सचा वापर करण्यात आला नाही. बाहेरील कुलूपामुळे मतदान पेट्या महाग ठरत होत्या. पण या अंतर्गत कुलूपामुळे मतपेट्यांची किंमत कमी झाली.
  2. केंद्र सरकारने प्रत्येक मतपेटीची किंमत त्याकाळी 5 रुपये निश्चित केली होती. या बजेटमध्ये मतपेट्या तयार करण्यावर मोथी माथापच्ची झाली. त्यावेळी कंपनीतील कर्मचारी नत्थालाल पांचाळ यांनी आतील कुलूपाची कल्पना सूचवली. तसा बॉक्सचं तयार करुन दाखवला. या बॅलेट बॉक्सचा रंग कायम ‘ऑलिव ग्रीन’च राहिला.
TV9 फेस्टीव्हलमध्ये अनुप्रिया पटेल यांनी घेतला देवी भगवतीचा आशीर्वाद
TV9 फेस्टीव्हलमध्ये अनुप्रिया पटेल यांनी घेतला देवी भगवतीचा आशीर्वाद.
त्या एका व्यक्तीच्या बदल्यासाठी सिद्दीकींची हत्या? कोण आहे अनूज थापन?
त्या एका व्यक्तीच्या बदल्यासाठी सिद्दीकींची हत्या? कोण आहे अनूज थापन?.
'अंधारे अन् राऊत मोठे नेते, एक वाघ्या अन् ती मुरळी',मनसे नेत्याची टीका
'अंधारे अन् राऊत मोठे नेते, एक वाघ्या अन् ती मुरळी',मनसे नेत्याची टीका.
फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं कधीपर्यंत चालणार 'लाडकी बहीण' योजना?
फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं कधीपर्यंत चालणार 'लाडकी बहीण' योजना?.
बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडून पळून जाणाऱ्या आरोपीचा व्हिडीओ व्हायरल
बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडून पळून जाणाऱ्या आरोपीचा व्हिडीओ व्हायरल.
'मविआ'ची पत्रकार परिषद, ठाकरे-पटोले अन् पवार यांचा कोणावर हल्लाबोल?
'मविआ'ची पत्रकार परिषद, ठाकरे-पटोले अन् पवार यांचा कोणावर हल्लाबोल?.
निवडणुकीला पैसे वाटले, नक्की घ्या, कारण..., राज ठाकरे काय बोलून गेले?
निवडणुकीला पैसे वाटले, नक्की घ्या, कारण..., राज ठाकरे काय बोलून गेले?.
विधानसभेचे राज ठाकरेंनी रणशिंग फुंकले; 'ना युत्या, ना आघाड्या आपण… '
विधानसभेचे राज ठाकरेंनी रणशिंग फुंकले; 'ना युत्या, ना आघाड्या आपण… '.
'फुकट कसले पैसे देताय?', 'लाडकी बहीण'वरून राज ठाकरेंचे सरकारवर ताशेरे
'फुकट कसले पैसे देताय?', 'लाडकी बहीण'वरून राज ठाकरेंचे सरकारवर ताशेरे.
...म्हणून बाबा सिद्दीकींची हत्या केली, बिश्नोई गँगचा मोठा खुलासा उघड
...म्हणून बाबा सिद्दीकींची हत्या केली, बिश्नोई गँगचा मोठा खुलासा उघड.