AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Railway Accident : भयानक रेल्वे अपघात, ट्रेन नाही काळ आला, मृतदेहाच्या अक्षरक्ष: चिंधड्या, कुठे घडला अपघात? किती जण ठार?

Railway Accident : पॅसेंजर ट्रेन प्लॅटफॉर्म नंबर चारवर उभी होती.ते फुट ओव्हर ब्रिज ऐवजी ट्रॅक क्रॉस करत होते. त्याचवेळी ट्रॅकवरुन येणाऱ्या कालका एक्सप्रेसने या प्रवाशांना धडक दिली.

Railway Accident : भयानक रेल्वे अपघात, ट्रेन नाही काळ आला, मृतदेहाच्या अक्षरक्ष: चिंधड्या, कुठे घडला अपघात? किती जण ठार?
Railway Track
| Updated on: Nov 05, 2025 | 11:42 AM
Share

देव दिवाळीच्या प्रसंगी वाराणसी येथे गंगा स्नानासाठी निघालेल्या भाविकांसोबत एक दुर्देवी घटना घडली. चुनार रेल्वे स्टेशनवर ट्रॅक ओलांडत असताना ट्रेनची धडक बसली. यात 8 महिला प्रवाशांचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, सर्व महिला चोपनहून वाराणसी येथे चाललेल्या. सर्व पॅसेंजर ट्रेनने चुनार येथे पोहोचलेल्या. वाराणसीला जाणारी ट्रेन पकडण्यासाठी त्या ट्रॅक ओलांडत होत्या. RPF जवानांनी जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चोपनहून चुनार येथे पोहोचलेली पॅसेंजर ट्रेन प्लॅटफॉर्म नंबर चारवर उभी होती. या ट्रेनमधून उतरलेल्या प्रवाशांना वाराणसीला जाण्यासाठी प्लॅटफॉर्म नंबर एक वर जायचं होतं. ते फुट ओव्हर ब्रिज ऐवजी ट्रॅक क्रॉस करत होते. त्याचवेळी ट्रॅकवरुन येणाऱ्या कालका एक्सप्रेसने या प्रवाशांना धडक दिली. या दुर्घटनेत आठही महिलांचा मृत्यू झाला. अन्य जखमी आहेत. सर्व महिला भाविक देव दिवाळीच्या निमित्ताने वाराणसीला गंगा स्नानासाठी चालले होते.

मृतकाच्या नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला

हा अपघात इतका भयानक होता की, कालका एक्सप्रेसच्या धडकेत महिला प्रवाशांच्या अक्षरक्ष: चिधड्या झाल्या. घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. मृतकाच्या नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला. चहूबाजूला आरडाओरडा सुरु होता. माहिती मिळताच एसडीएम, अपर पोलीस अधीक्षकांसह अन्य अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

मुख्यमंत्र्यांनी काय निर्देश दिले?

चुनार रेल्वे स्टेशनवर झालेल्या या अपघाताची मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी माहिती घेतली. मृतकांच्या नातेवाईकांप्रती संवेदना व्यक्त केली. जखमींना चांगले उपचार मिळतील याची काळजी घ्या, असे अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. अपघातानंतर मृतदेह रेल्वे रुळावरुन हटवून त्यांची ओळख पटवण्यात आली. यात सविता (28) साधना (16) शिव कुमारी (12) अप्पू देवी (20) सुशीला देवी (60) कलावती देवी (50) अशी मृतांची नावं आहेत.

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.