AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पीएम मोदी शनिवारी गुजरात दौऱ्यावर, भावनगर आणि लोथल येथे करणार मोठ्या योजनांची घोषणा

भावनगरात पंतप्रधान नरेंद्र मोदी सुमारे १.५० लाख कोटी रुपयांच्या शिपिंग आणि समुद्री क्षेत्राशी संलग्न असलेल्या विविध योजनांचे उद्घाटन करणार आहेत. भावनगरच्या विकासासाठी १०० कोटी रुपयांहून अधिक योजनांची ते भेटही देतील.

पीएम मोदी शनिवारी गुजरात दौऱ्यावर, भावनगर आणि लोथल येथे करणार मोठ्या योजनांची घोषणा
| Updated on: Sep 19, 2025 | 6:40 PM
Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी २० सप्टेंबर रोजी एक दिवसाच्या गुजरात दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्या दरम्यान ते भावनगर आणि लोथल येथे अनेक कार्यक्रमात सामील होतील आणि विकास योजनांचा शुभारंभ करतील. सकाळी १० वाजता पंतप्रधान मोदी भावनगरातील एका भव्य रोड शोमध्ये सामील होतील. सुमारे १.५ किलोमीटर लांबीच्या या रोड शोमध्ये ३० हजाराहून अधिक लोक सहभागी होतील अशी शक्यता आहे.

या रोड शोचे मुख्य आकर्षण ऑपरेशन सिंदूर, जीएसटीत दिलासा आणि आत्मनिर्भर भारताची थीम असणार आहे. रोड शोनंतर पंतप्रधान जवाहर मैदान येथे पोहतील तेथे ते एक विशाल सभेला संबोधीत करणार आहेत.

भावनगरला देणार मोठी भेट

भावनगरात पंतप्रधान नरेंद्र मोदी सुमारे १.५० लाख कोटी रुपयांच्या शिपिंग आणि समुद्री क्षेत्राशी संबंघित विभिन्न योजनांचे भूमीपूजन त्यांच्या हस्ते होणार आहे. यासह ते भावनगरच्या विकासासाठी १०० कोटी रुपयांहून अधिक योजनांची भेटही देतील. या योजनामुळे या भागात रोजगाराच्या संधी वाढतील आणि औद्योगिक कारभाराला नवी दिशा मिळणार आहे.

४५०० कोटी रुपयातून विकसित होणाऱ्या योजनाचा आढावा

यानंतर पंतप्रधान मोदी लोथलचा दौरा करतील.लोथल सिंधु खोऱ्याच्या संस्कृतीचा एक महत्वपूर्ण व्यापरी केंद्र होता. यास भारताच्या प्राचीन समुद्री शक्तीचे प्रतीक मानले जात होते. येथे पंतप्रधान मोदी राष्ट्री समुद्र वारसा परिसर (एनएमएचसी) योजनेच्या प्रगतीचा आढावा घेतील. सुमारे ४,५०० कोटी रुपयांतून विकसित होत असलेली ही योजना पंतप्रधान मोदी यांच्या “विरासत भी, विकास भी” या दृष्टीकोणातून साकार होणारे एक महत्वाचे पाऊल आहे.

दुपारी १ वाजल्यानंतर पीएम मोदी एनएमएचसी परिसरात आता पर्यंत पूर्ण झालेल्या कामांची पाहणी करतील आणि अधिकाऱ्यांसोबत चर्चा करतील.या प्रकल्पाचे उद्दिष्ट भारताच्या समृद्ध सागरी वारशाचे जतन आणि प्रदर्शन करणे आहे. हे पंतप्रधान मोदी यांनी प्राचीन वारशाचे जतन करण्यासाठी जाहीर केलेल्या “पंच प्राण” प्रतिज्ञेशी देखील जोडलेले आहे.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.