विजयादशमीच्या मुहूर्तावर पंतप्रधान मोदी करणार सात नव्या संरक्षण कंपन्यांचं लोकार्पण

PM Modi | या सात संरक्षण कंपन्यांमध्ये मुनिशन्स इंडिया लिमिटेड (MIL), आर्मर्ड व्हेईकल्स कॉर्पोरेशन लिमिटेड (अवनी); एडवांस्ड वेपन्स एंड इक्विपमेंट इंडिया लिमिटेड (एडब्ल्यूई इंडिया); ट्रूप कम्फर्ट्स लिमिटेड (टीसीएल); यंत्र इंडिया लिमिटेड (YIL), इंडिया ऑप्टेल लिमिटेड (आईओएल) आणि ग्लाइडर्स इंडिया लिमिटेडचा (जीआईएल) समावेश आहे.

विजयादशमीच्या मुहूर्तावर पंतप्रधान मोदी करणार सात नव्या संरक्षण कंपन्यांचं लोकार्पण
पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर सात नवीन संरक्षण कंपन्या राष्ट्राला समर्पित करतील. संरक्षण मंत्रालयाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित असतील. यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि संरक्षण उद्योग संघटनांचे प्रतिनिधी या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) म्हटले की, देशाच्या संरक्षण सज्जतेमध्ये स्वावलंबन सुधारण्याच्या हालचालीचा एक भाग म्हणून सरकारने ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्ड एका विभागातून सात पूर्ण मालकीच्या सरकारी कॉर्पोरेशनमध्ये बदलण्याचा निर्णय घेतला आहे.

या सात संरक्षण कंपन्यांमध्ये मुनिशन्स इंडिया लिमिटेड (MIL), आर्मर्ड व्हेईकल्स कॉर्पोरेशन लिमिटेड (अवनी); एडवांस्ड वेपन्स एंड इक्विपमेंट इंडिया लिमिटेड (एडब्ल्यूई इंडिया); ट्रूप कम्फर्ट्स लिमिटेड (टीसीएल); यंत्र इंडिया लिमिटेड (YIL), इंडिया ऑप्टेल लिमिटेड (आईओएल) आणि ग्लाइडर्स इंडिया लिमिटेडचा (जीआईएल) समावेश आहे.

संरक्षण मंत्रालयाने 28 सप्टेंबर रोजी आदेश जारी केला की 1 ऑक्टोबरपासून आयुध निर्माणी मंडळ रद्द करण्यात आले आहे आणि 7 नवीन कंपन्या स्थापन करण्यात आल्या आहेत. आता कामगार कारखान्यांमध्ये संपावर जाऊ शकत नाहीत किंवा कोणालाही चिथावणी देऊ शकत नाहीत. तसे केल्यास तुरुंगवास आणि दंड होऊ शकतो. मात्र, या दोन्ही कामगार संघटनांनी सरकारचे ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्ड रद्द करून 7 कॉर्पोरेशनच्या स्थापनेविरोधात उच्च न्यायालयातून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. सैन्यासाठी गणवेशापासून ते शस्त्रे, दारूगोळा, तोफ आणि क्षेपणास्त्रे तयार करणाऱ्या कारखान्यांचे कामगार या निर्णयामुळे नाराज झाले आहेत.

काँग्रेसचा आक्षेप

सर्वोच्च न्यायालयाचे वकील प्रशांत भूषण यांनी सरकारच्या या निर्णयाविषयी संताप व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, ‘हे पाऊल हे आपले संरक्षण क्षेत्र खासगी हातांना सोपवण्याची पहिली पायरी आहे. विमानतळ, बंदरे, रेल्वे, बँका, संरक्षण उद्योगांपासून सर्व काही या सरकारमध्ये खासगी होत असल्याची टीका त्यांनी केली. तसेच काँग्रेस पक्षानेही केंद्र सरकारच्या या निर्णयाचा तीव्र निषेध केला आहे.

इतर बातम्या:

“घुसखोरी थांबवा नाहीतर पुन्हा सर्जिकल स्ट्राईक करावा लागेल”, गृहमंत्री अमित शाहांचा पाकिस्तानला इशारा

महात्मा गांधींच्या जागी ते सावरकरांना राष्ट्रपिता करणार, ओवेसींचा राजनाथ सिंह यांच्यावर हल्लाबोल

राजनाथसिंहांनी इतिहासाची मोडतोड केली? महात्मा गांधींच्या सांगण्यावरुनच सावरकरांचा ब्रिटीशांकडे माफीनामा सादर केल्याचं वक्तव्य

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI