AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM MODI जाणणार जनतेच्या ‘मन की बात’, विकास किती झाला ? यासाठी सर्वे सुरु

एनडीए सरकारला ११ वर्षे पूर्ण झाली आहेत त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमो एपवर सर्वे सुरु केला आहे. तसेच जर केंद्र सरकार लोकांच्या अपेक्षा पूर्ण करीत असेल तर स्थानिक लोकप्रतिनिधींबद्दलही लोकांचा दृष्टिकोन काय आहे? याचाही पडताळणी होणार आहे.

PM MODI जाणणार जनतेच्या 'मन की बात', विकास किती झाला ? यासाठी सर्वे सुरु
| Updated on: Jun 10, 2025 | 4:10 PM
Share

पीएम मोदी यांच्या कार्यकाळाला ११ वर्षे पूर्ण झाल्याने केंद्र सरकार आता जनतेच्या मनाचा मागोवा घेण्यासाठी एक सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. हा सर्वे नमो मोबाईल एपद्वारे सुरु करण्यात आला आहे.या सर्वेत एकूण १५ प्रश्न विचारण्यात आले आहेत. विविध क्षेत्रातील संबंधीत या १५ प्रश्नांची उत्तरे जनतेकडून घेतली जाणार आहेत. जनतेच्या कसोटीवर मोदी सरकारची ही ११ वर्षे कशी गेली याचा पडताळा घेतला जाणार आहे.

पंतप्रधान पीएम मोदी यांनी सोमवारी एक्सवर पोस्ट केली आहे. यात त्यांनी केंद्र सरकारने गेल्या ११ वर्षात केलेल्या कामकाजाबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. आपल्या सरकारने सुशासन आणि परिवर्तनावर खास लक्ष पुरवल्याचे म्हटले आहे.

 मोदी यांनी दावा केला

सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास’ या सिद्धांतावर एनडीएने पथ प्रदर्शक परिवर्तन केले आहे. आर्थिक विकासाने सामाजिक उद्धारापर्यंत लोक केंद्रीत, सर्वसमावेशी आणि सर्वांगिण प्रगतीवर लक्ष्य केंद्रीत केले आहे. आज भारत केवळ सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्थाच नसून पर्यावरण बदल आणि डिजिटल व्यवहार सारख्या महत्वाच्या मुद्द्यावर एक प्रमुख जागतिक आवाज बनला आहे. आम्हाला आशा, विश्वास आणि विकसित भारताच्या निर्मितीचा संकल्पासह पुढे चालत आहोत असे पीएम मोदी यांनी म्हटले आहे.

जन-मन सर्वेक्षण: सरकारच्या कामाकडे जनता कशी पाहते

पंतप्रधान यांनी नमो एपवर सुरू केलेल्या जन-मन सर्वेक्षणाची माहिती शेअर केली आहे. गेल्या ११ वर्षांत अनेक सकारात्मक बदल झाले आहेत आणि राहणीमान सुलभ झाले असून चालना मिळाली आहे. त्यांनी जनतेला या जनसर्वेक्षणात सहभागी होण्याचे आवाहन केले. या सर्वेक्षणात विविध क्षेत्रांशी संबंधित प्रश्न समाविष्ट केलेले आहेत. उदाहरणार्थ, पहिला प्रश्न दहशतवादाविरुद्ध भारताच्या कठोर भूमिकेशी संबंधित आहे.

सर्वेक्षणात खालील प्रश्न विचारण्यात आले होते

गेल्या दशकात दहशतवादाविरुद्ध लढण्यात भारताचे धोरण कसे राहिले आहे ?

राष्ट्रीय सुरक्षेच्या आव्हानांविरुद्ध भारत सरकारच्या कठोर भूमिकेमुळे तुम्हाला एक नागरिक म्हणून किती सुरक्षित वाटते?

भारताचा आवाज आता पूर्वीपेक्षा जास्त जागतिक स्तरावर ऐकला जात आहे आणि त्याचा आदर केला जातो? असे वाटते का ?

गेल्या एका वर्षात तुम्ही डिजिटल इंडियाचे कोणते उत्पादन किंवा सेवा सर्वात जास्त वापरली?

महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाच्या दिशेने सर्वात महत्त्वाची सुधारणा कोणती आहे?

स्किल इंडिया, स्टार्टअप इंडिया किंवा शिक्षणात केलेल्या सुधारणांमुळे तरुणांसाठी संधी किती वाढल्या आहेत?

तुमच्या मते, मेक इन इंडियाचा उत्पादन क्षेत्रावर काय परिणाम झाला आहे?

राष्ट्रवाद आणि संस्कृतीने प्रेरित लोकांसाठी, प्रश्न असा आहे की तुम्हाला अभिमान कसा वाटत आहे?

सार्वजनिक समस्यांशी संबंधित मुद्द्यांवर स्थानिक आणि केंद्रीय पातळीवर लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थिती किंवा जबाबदारीबद्दल तुमचे काय मत काय आहे?

सध्या, विरोधकांकडून भारताच्या परराष्ट्रधोरणाबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत, म्हणून या सर्वेक्षणाद्वारे, जनतेचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. व्यवसायापासून ते पुरुष आणि महिलांपर्यंत वृद्धांपर्यंत प्रत्येक वर्गाचे विचार सर्वेक्षणात सुशासनाबाबत समाविष्ट केले पाहिजेत.

विकसित भारतातील पायाभूत सुविधा आणि सार्वजनिक सहभागाच्या कल्पनेबद्दल काही प्रश्न देखील आहेत. सर्वेक्षणात सहभागी होणाऱ्यांसाठी ऑनलाईन प्रमाणपत्रे देखील तात्काळ जारी केली जात आहेत, जेणेकरून सर्वेक्षणात सहभागी होणाऱ्यांची संपूर्ण नोंद असेल.

सरकारसह खासदार आणि आमदारांचे रिपोर्ट कार्ड

साधारणपणे, निवडणुकीच्या वेळी, सरकार किंवा पक्ष त्यांच्या प्रतिनिधींचे अंतर्गत रिपोर्ट कार्ड तयार केले जातात, परंतु सरकारला ११ वर्षे पूर्ण होण्याच्या या महत्त्वाच्या टप्प्यावर, पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारसह खासदार आणि आमदारांचे रिपोर्ट कार्ड तयार करू इच्छित आहेत. जर केंद्र सरकार लोकांच्या अपेक्षा पूर्ण करीत असेल तर स्थानिक लोकप्रतिनिधींबद्दल लोकांचा दृष्टिकोन काय आहे? म्हणूनच सर्वेक्षणात यासाठीही एक प्रश्न विचारण्यात आला आहे.

काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला
काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला.
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट.
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग.
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता.
सत्तार, हिंदू देव-देवता अन् मामू...दानवेंचा संजय शिरसाटांवर हल्लाबोल
सत्तार, हिंदू देव-देवता अन् मामू...दानवेंचा संजय शिरसाटांवर हल्लाबोल.
गळ्यात सोन्याचं कमळ,नगराध्यक्षा हेमलता सावजींच्या मंगळसूत्राची चर्चा
गळ्यात सोन्याचं कमळ,नगराध्यक्षा हेमलता सावजींच्या मंगळसूत्राची चर्चा.
मी सेलिब्रेशन केलं नाही...मालवणमधील विजयानंतर निलेश राणे काय म्हणाले?
मी सेलिब्रेशन केलं नाही...मालवणमधील विजयानंतर निलेश राणे काय म्हणाले?.
आईचा विजय लेकाला मोठा आनंद, प्रणिता भालके विजयी अन् शौर्यने थोपटले दंड
आईचा विजय लेकाला मोठा आनंद, प्रणिता भालके विजयी अन् शौर्यने थोपटले दंड.
कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा
कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा.
जेजुरीत भंडाऱ्यानं आगीचा भडका उडाला, प्रत्यक्षदर्शीनं सांगितल घडल काय?
जेजुरीत भंडाऱ्यानं आगीचा भडका उडाला, प्रत्यक्षदर्शीनं सांगितल घडल काय?.