AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM मोदींच्या सेल्फी व्हिडीओची धमाल, अवघ्या 24 तासांत 30 कोटींहून अधिक व्ह्यूज, रचला नवा रेकॉर्ड

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या इन्स्टाग्रामवरील एका सेल्फी व्हिडिओने विक्रम प्रस्थापित केला. अवघ्या 24 तासांत या व्हिडिओला विक्रमी कोट्यावधी अब्ज व्ह्यूज मिळाले. याव्यतिरिक्त, त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर दहा लाखांहून अधिक नवीन फॉलोअर्सची भर पडली.

PM मोदींच्या सेल्फी व्हिडीओची धमाल, अवघ्या 24 तासांत 30 कोटींहून अधिक व्ह्यूज, रचला नवा रेकॉर्ड
पंतप्रधान मोदींचा सेल्फी व्हिडीओ
| Updated on: Jul 25, 2026 | 10:20 AM
Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या एका सेल्फी व्हिडिओने सोशल मीडियावर मोठी चर्चा निर्माण केली आहे. या व्हिडिओला अवघ्या 24 तासांत 303 दशलक्ष (30.3 कोटी) पेक्षा अधिक व्ह्यूज मिळाल्याचा दावा करण्यात आला असून, त्याच कालावधीत त्यांच्या इन्स्टाग्राम खात्यावर सुमारे 10 लाख नवीन फॉलोअर्सही जोडले गेले. गुरुवारी रात्री पोस्ट करण्यात आलेल्या या व्हिडिओत पंतप्रधान मोदी यांनी पेपर लीकच्या घटनांमुळे चिंतेत असलेल्या विद्यार्थी आणि तरुणांशी संवाद साधत त्यांना धीर दिला. व्हिडिओ काही तासांतच मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आणि 24 तासांत 303 दशलक्ष व्ह्यूजचा टप्पा पार केल्याचे सांगितले जात आहे. यामुळे नवा रेकॉर्ड सेट झाला आहे. यापूर्वी अमेरिकेतील प्रसिद्ध कंटेंट क्रिएटर IShowSpeed याच्या एका इन्स्टाग्राम रीलने 24 तासांत 300 दशलक्ष (30 कोटी) व्ह्यूज मिळवत विक्रम केला होता. FIFA World Cup 2026 च्या अंतिम सामन्यादरम्यान BTS सदस्यांसोबत झालेल्या भेटीवरील ही रील इन्स्टाग्रामवरील सर्वाधिक वेगाने पाहिली गेलेली रील ठरली होती.

24 तासांत नवा विक्रम

मात्र आता या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांच्या व्हिडिओने 303 दशलक्षहून अधिक व्ह्यूज मिळवत नवीन विक्रम प्रस्थापित केल्याचा दावा करण्यात आला आहे. एवढंच नव्हे तर त्यांच्या इन्स्टाग्राम खात्यावरील फॉलोअर्सची संख्या 10 लाखांनी वाढल्याचंही समोर आलं आहे.

“उद्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पेपर लीकविरोधात आणखी कठोर पावले उचलली जातील!” या कॅप्शनसह पोस्ट करण्यात आलेल्या या व्हिडिओला 15 दशलक्ष लाइक्स आणि 1.3 दशलक्ष कमेंट्स मिळाल्याचेही सांगितले जात आहे. पोस्ट झाल्यानंतर पहिल्या आठ तासांतच या व्हिडिओने 56 दशलक्ष व्ह्यूज आणि 5.9 दशलक्ष लाइक्सचा टप्पा गाठला.

पीएम मोदींचे लोकप्रिय व्हिडिओ

पंतप्रधान मोदी यांच्या अनेक सोशल मीडिया पोस्ट्सना यापूर्वीही मोठा प्रतिसाद मिळाला आहे.

– NEET पेपर लीकवरील सेल्फी व्हिडिओ – 300 दशलक्षहून अधिक व्ह्यूज मिळाल्याचा दावा.

– “Thank You, Friends” हा फॉलो-अप सेल्फी व्हिडिओ – 10 दशलक्षपेक्षा अधिक व्ह्यूज.

– पश्चिम बंगालमधील प्रचारादरम्यान झालमुरी खातानाचा व्हिडिओ – 100 दशलक्षपेक्षा अधिक व्ह्यूज.

– Vantara दौऱ्याची रील – सुमारे 1 अब्ज (१ बिलियन) व्ह्यूज मिळाल्याचे सांगितले जाते. या दौऱ्यात त्यांनी विविध वन्यप्राण्यांशी, विशेषतः हत्तींशी संवाद साधला होता.

– Skyroot स्पेस मिशन आणि बॅडमिंटनमधील यशांवरील पोस्ट्स – ५० ते २०० दशलक्ष व्ह्यूज मिळाल्याचे नमूद केले जाते.

रीलद्वारे विद्यार्थ्यांना दिलेला संदेश

“मला माहिती आहे की पेपर लीक ही काही छोटी गोष्ट नाही. लाखो विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी ही अत्यंत दुःखद बाब आहे.” असं पंतप्रधान त्यांच्या व्हिडीओमध्ये म्हणाले होते. “पेपर लीकच्या घटनेनंतर गेल्या अडीच महिन्यांत अनेक प्रभावी पावले उचलण्यात आली आहेत. दोषींना अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, ही आमची सर्वात मोठी जबाबदारी होती. सरकारने पूर्ण प्रयत्न करून २२ लाख विद्यार्थ्यांची परीक्षा शक्य तितक्या कमी वेळात पुन्हा घेण्याची व्यवस्था केली.” असंही त्यांनी नमूद केलं.

Follow Us
लाठ्या-बंदुका आणा... मी तिरंगा घेऊन येतो! सरकारला ठाकरेंचा थेट इशारा
Uddhav Thackeray | लाठ्या-बंदुका आणा... मी तिरंगा घेऊन येतो! सरकारला उद्धव ठाकरेंचा थेट इशारा
दिल्लीच्या आंदोलनाची धग मुंबईत! आदित्य -अमित एकाच मंचावर
Dadar | दिल्लीच्या आंदोलनाची धग मुंबईत! शिवाजी पार्कवर विद्यार्थ्यांचा महासागर; आदित्य ठाकरे-अमित ठाकरे एकाच मंचावर
पंतप्रधान मोदींचा अचानक Gen Z अवतार! सेल्फी व्हिडिओमागचं गुपित काय?
Pm Narendra Modi | पंतप्रधान मोदींचा अचानक Gen Z अवतार! सेल्फी व्हिडिओमागचं गुपित काय?
विद्यार्थ्यांवर पॅलेट गन का चालवली? जखमी आंदोलकाला समोर आणत....
Rahul Gandhi | विद्यार्थ्यांवर पॅलेट गन का चालवली? जखमी आंदोलकाला समोर आणत राहुल गांधींचा सरकारला थेट सवाल
CJP च्या दोन मागण्या मान्य, मात्र प्रधानांच्या राजीनाम्याचं काय?
CJP च्या दोन मागण्या मान्य, मात्र धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचं काय? काय म्हणालं सरकार?
पेपर फोडणाऱ्यांचं आता काय खरं नाही; दोषींना इतकी मोठी शिक्षा...
NEET Paper Leak Update | पेपर फोडणाऱ्यांचं आता काय खरं नाही; दोषींना इतकी मोठी शिक्षा, सरकारचा मोठा निर्णय
CJP-सरकारची निर्णायक बैठक सुरू; प्रधानांच्या राजीनाम्यावर CJP ठाम
मोठी बातमी! CJP-सरकारची निर्णायक बैठक सुरू; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर CJP ठाम
आज आम्हाला अटक होऊ शकते, पण.... अभिजित दिपके नेमकं काय म्हणाले?
Abhijeet Dipke | आज आम्हाला अटक होऊ शकते, पण.... अभिजित दिपके नेमकं काय म्हणाले?
आंदोलनाने सरकारची चिंता वाढली; दिल्ली पोलिसांच्या सुट्ट्याच रद्द?
Delhi Police News | विद्यार्थी आंदोलनाने सरकारची चिंता वाढली; दिल्ली पोलिसांच्या सुट्ट्याच केल्या रद्द, नवा आदेश काय?
हा शिवरायांचा महाराष्ट्र नाही! वर्षा गायकवाड यांचा संताप
Varsha Gaikwad | मुंबई पोलिसाकडून महिला आंदोलकाशी गैरवर्तन? हा शिवरायांचा महाराष्ट्र नाही! वर्षा गायकवाड यांचा संताप