AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धक्कादायक, पाच दिवसात जंतर-मंतरवर पोलिसांनी शोधले 400 रेकॉर्डवरील गुन्हेगार, त्यासाठी वापरली खास सिस्टिम

CJP Protest FRS System : कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनात गुन्हेगारी वृत्तीची लोक घुसल्याचा आणि तेच पोलिसांवर हल्ला करत असल्याचा आरोप केला होता. आता पोलिसांनी एका अभिनव यंत्रणेचा वापर करत जंतर मंतर परिसरातील 400 रेकॉर्डवरील गुन्हेगारांची धरपकड केली आहे. काय आहे मोठी अपडेट?

धक्कादायक, पाच दिवसात जंतर-मंतरवर पोलिसांनी शोधले 400 रेकॉर्डवरील गुन्हेगार, त्यासाठी वापरली खास सिस्टिम
पाच दिवसात जंतर-मंतरवर पोलिसांनी शोधले 400 रेकॉर्डवरील गुन्हेगार
| Updated on: Jul 25, 2026 | 9:56 AM
Share

CJP Protest Jantar Mantar Delhi : जंतर मंतरवरील आंदोलन काही समाजकंटक हायजॅक करण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप दिल्ली पोलिसांनी केला होता. हेच असामाजिक तत्त्व पोलिसांवर टोकदार दगडांचा वर्षाव करत होते. काही ठिकाणी काचेच्या बाटल्या मारून फेकत होते. आंदोलकांच्या आडून ते पोलीस आणि यंत्रणेला लक्ष करत होते. पोलिसांनी चेहरा पाहून ओळख पटवणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानाचा फेशियल रिकॉग्निशन सिस्टिमचा (FRS) वापर करून गेल्या पाच दिवसांत 400 रेकॉर्डवरील गुन्हेगारांची ओळख पटवली. तर त्यातील काहींची धरपकड केली. जंतरमंतरवर आणि मध्य दिल्लीत पोलिसांनी FRS बसवले आहेत. गेल्या पाच दिवसात या तंत्रज्ञानाच्या मदतीने जंतर मंतर परिसर आणि आजूबाजूच्या क्षेत्रात अशा गुन्हेगारांची ओळख पटवली गेली.

400 जण रेकॉर्डवरील गुन्हेगार

आंदोलकांच्या आडून पोलिसांवर हल्ला करणाऱ्या या 400 जणांचा गुन्हेगारीशी संबंधित रेकॉर्डही पोलिसांच्या हाती आहे. साहिल, यश, रुबल आणि असे अनेक गुन्हे नोंदवलेले, गुन्ह्यांची पार्श्वभूमी असलेले गुन्हेगार समोर आलेले आहेत. त्यातील काही जण अट्टल गुन्हेगार असल्याचेही समोर आले आहे. 20 जुलै रोजी नवी दिल्ली जिल्ह्यात हिंसा भडकली होती. पोलिसांच्या वाहनांसह सार्वजनिक वाहनांचे मोठे नुकसान करण्यात आले होते. सार्वजनिक आणि सरकारी मालमत्तांचे नुकसान करण्यात आले होते. तर पोलिसांवर अणकुचीदार दगडं आणि काचेच्या बाटल्यांचा मारा करण्यात आला होता. या सर्व घटनांमध्ये या 400 जणांचा किती हात आहे याचा तपास पोलीस करत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, तपास यंत्रणेने सीसीटीव्ही फुटेज आणि सोशल मीडियावरील उपलब्ध व्हिडिओ आणि छायाचित्रांआधारे काही गुन्हेगारांची ओळख पटवली आहे. 20 जुलैच्या हिंसेत ही मंडळी सहभागी असल्याचा पोलिसांना संशय आहे.

आंदोलकांच्या आडून हिंसेची घटना

कॉक्रोच जनता पार्टी जंतर मंतरवर आंदोलन करत आहे. या आंदोलनात आणि आंदोलकांमध्ये काही गुन्हेगारीवृत्तीचे लोक शिरल्याचाही आरोप होत आहे. पोलीस डिजिटल पुराव्यांआधारे त्यांची ओळख पटवत आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा त्यासाठी वापर करण्यात येत आहे. फेशियल रिकॉग्निशन सिस्टिममुळे आता पोलिसांचे काम सोपे झाले आहे. त्यांच्याकडे उपलब्ध डेटाबेसशी पोलीस स्टेशनमधील गुन्हेगारांचा पडताळा करण्यात येत आहे. त्यात आतापर्यंत 400 हून अधिक लोकांची ओळख पटवली गेली आहे. त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी समोर आली आहे. या मंडळींमुळे आंदोलनाला गालबोट लागत आहे. तर दुसरीकडे सार्वजनिक मालमत्तेचेही नुकसान होत आहे. गेल्या 20-24 जुलै या दरम्यान पोलिसांनी ही कारवाई केली.

Follow Us
शारीरिक व्याधी बऱ्या करण्याचे आमिष दाखवून...
सोशल मीडियावरील रील्स पाहून संपर्क, ‘उतारे-विधी’च्या नावाखाली... पुण्यातील महिला भोंदूचा कारनामा
सावेंच्या भाऊ आणि पुतण्याला मारहाण करण्याच्या अगदीपूर्वीचा व्हिडिओ...
Atul Save Brother Marhan Case | सावेंच्या भाऊ आणि पुतण्याला मारहाण करण्याच्या अगदीपूर्वीचा व्हिडिओ व्हायरल
महाराष्ट्र गीत सुरू झाले तरी ठाकरे बंधू बसलेलेच, बड्या नेत्याचा आरोप
महाराष्ट्र गीत सुरू झाले तरी ठाकरे बंधू बसलेलेच, व्हिडीओ शेअर करत बड्या नेत्याचा आरोप
मनोज जरांगेंची ED चौकशी करणार? आंदोलनादरम्यान अवैध...
मनोज जरांगेंची ED चौकशी करणार? आंदोलनादरम्यान अवैध... बड्या नेत्याच्या आरोपाने खळबळ
भाजपमध्ये जाताच राघव चड्ढांचं मोठं विधान; थेट म्हणाले,आप म्हणजे एक...
भाजपमध्ये जाताच राघव चड्ढांचं मोठं विधान; थेट म्हणाले, आप म्हणजे एक...
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर... गुलाबराव पाटलांचं वक्तव्य पुन्हा..
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावरच... गुलाबराव पाटलांचं वक्तव्य पुन्हा चर्चेत
बुलेटमधील लोखंडी रॉड, हातातील कडा अन्... बड्या मंत्र्याच्या भावाला...
बुलेटमधील लोखंडी रॉड, हातातील कडा अन्... बड्या मंत्र्याच्या भावाला मारहाणीचं वेगळंच कारण समोर
1 हजार 800 कोटींचा निधी मंजूर; महारष्ट्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय;
1 हजार 800 कोटींचा निधी मंजूर; महारष्ट्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय; नगरविकास विभागाकडून...
जरांगेंच्या उपोषणाचा 14 वा दिवस; तोडगा निघणार?
Manoj Jarange | जरांगेंच्या उपोषणाचा 14 वा दिवस; तोडगा निघणार?
राजीनामा झाल्याशिवाय शांत बसायचं नाही; बड्या नेत्याची...
राजीनामा झाल्याशिवाय शांत बसायचं नाही; बड्या नेत्याची... राज्यात पुन्हा नव्या राजीनाम्याची मागणी