पहलगाम हल्ल्यामुळे पीएम मोदी यांचा कानपुर दौरा रद्द, २० हजार कोटींच्या प्रकल्पांची करणार होते घोषणा
जम्मू-काश्मिरातील पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचा २४ एप्रिलचा कानपूर दौरा रद्द केला आहे. या हल्ल्यात कानपूर येथील शुभम द्विवेदी यांच्यासह २७ जणांना मृत्यू झाला आहे. कानपूर येथील तरुणाच्या मृत्यूने कानपूरवर शोककळा पसरली आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

जम्मू-काश्मिर येथील पहलगाम येथे मंगळवारी सकाळी झालेल्या अतिरेकी हल्ल्याने संपूर्ण देश सुन्न झाला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांचा सौदीचा दौरा अर्धवट सोडून ते भारतात परतले आहेत. त्यांनी त्यांचा २४ एप्रिल रोजीचा कानपूर दौरा रद्द केला आहे. कानपूरच्या शुभम द्विवेदी यांच्यासह २७ जणांचा मृत्यू झाला आहे. कानपूर येथे २४ एप्रिल रोजी २० हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन होणार होते. या पहलगामवरील हल्ल्यानंतर कानपूरमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. त्यामुळे पीएम मोदी यांचे कानपूर येथील २४ एप्रिलचे कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.
पंचायती राज दिवस
२४ एप्रिल रोजी पीएम मोदी बिहारच्या मधुबनीच्या पंचायती राज दिवसाच्या निमित्ताने एक पूर्व नियोजित कार्यक्रमात सामील होणार होते. या कार्यक्रमात व्हिडीओ कॉन्फरन्सिकद्वारे मोदी सहभागी होणार होते. हा कार्यक्रम देखील पुढे ढकण्याची शक्यता असणार आहे.
सौदीचा दौरा अर्धवट सोडला
पीएम मोदी यांनी कानपूरचाच दौरा रद्द केला नाही कर त्यांचा दोन दिवसांचा सौदीचा दौरा अर्धवट सोडून भारतात आले आहे. भारतात येतात त्यांनी पहमगामच्या घटनेवर एनएसए अजित डोभाल आणि परराष्ट्री मंत्री जयशंकर सह अन्य अधिकारी वर्गासोबत परिस्थितीचा आढावा घेतला आहे. याशिवाय आज सायंकाळी मोदी उच्च स्तरिय बैठक घेणार आहेत.
संरक्षण मंत्र्यासोबत तिन्ही दलाच्या प्रमुखांची बैठक –
पहलगाम येथील हल्ल्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली आहे. या बैठकीला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि भारतीय वायुसेना प्रमुख एअर चीफ मार्शल एपी सिंह सह अन्य अधिकारी देखील हजर होते. या बैठकीत तिन्ही दलाचे सैन्य प्रमुखांनी आपल्या तयारी संदर्भात संरक्षण मंत्र्यांनी माहीती दिली आहे. भारत या हल्ल्याचा प्रतिकार देण्याची तयारी करीत असल्याचे म्हटले आहे. २०१९ मध्ये ज्याप्रमाणे एअर स्ट्राईकला झाला होता तसाच एअर स्ट्राईक होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.