सोनिया गांधी, प्रतिभा पाटील ते ममता बॅनर्जी, स्टॅलिन… ‘कोरोना’लढ्यासाठी पंतप्रधानांची दिग्गजांना फोनाफोनी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोनिया गांधी, मुलायमसिंह यादव यांच्यापासून ममता बॅनर्जी, स्टॅलिन यासारख्या नेत्यांना 'कोरोना'च्या मुद्द्यावर फोन केला. (PM Modi calls Manmohan Singh Pratibha Patil)

सोनिया गांधी, प्रतिभा पाटील ते ममता बॅनर्जी, स्टॅलिन... 'कोरोना'लढ्यासाठी पंतप्रधानांची दिग्गजांना फोनाफोनी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिग्गज नेत्यांना फोन करुन ‘कोरोना’च्या मुद्द्यावर चर्चा केली. दोन माजी राष्ट्रपती आणि दोन माजी पंतप्रधानांना फोन करुन नरेंद्र मोदी यांनी ‘कोरोना’च्या अभूतपूर्व संकटाबाबत बातचीत केली. सोनिया गांधी, मुलायमसिंह यादव यांच्यापासून ममता बॅनर्जी, स्टॅलिन यासारख्या नेत्यांना मोदींनी फोन केला. (PM Modi calls Manmohan Singh Pratibha Patil)

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि प्रतिभा पाटील यांना नरेंद्र मोदी यांनी फोन केला होता. तर कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, तसेच जनता दलाचे दिग्गज नेते आणि माजी पंतप्रधान एचडी देवगौडा यांच्याशी मोदींनी फोनवरुन संवाद साधला.

याशिवाय, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंह यादव, अखिलेश यादव, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, बिजू जनता दलाचे नेते आणि ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक, तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव, तामिळनाडूतील द्रमुक नेते एमके स्टॅलिन आणि शिरोमणी अकाली दलाचे नेते प्रकाश सिंह बादल अशा विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनाही त्यांनी फोन केला होता. (PM Modi calls Manmohan Singh Pratibha Patil)

दरम्यान, सर्वांशी झालेल्या चर्चेचा तपशील अद्याप गुलदस्त्यात आहे. परंतु कोरोनाशी एकत्रित लढा देण्याच्या दृष्टीने व्यापक धोरण विकसित करण्याबाबत चर्चा झाल्याचे म्हटले जाते. पंतप्रधान मोदी बुधवारी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सर्वपक्षीय नेत्यांशी संवाद साधणार आहेत. या बैठकीत ते संसदेत प्रतिनिधित्त्व करणाऱ्या प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांशी सल्ला मसलत करणार आहेत.

पंतप्रधान अनेकदा म्हणाले आहेत, की कोरोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी देशाकडून एकत्रित प्रयत्न आवश्यक आहेत. याआधी त्यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबतही संवाद साधला होता. बिगरभाजप शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशीही त्यांनी वार्तालाप केला होता.

(PM Modi calls Manmohan Singh Pratibha Patil)

Published On - 4:01 pm, Sun, 5 April 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI