AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Parliament Monsoon Session : ऑपरेशन सिंदूर आणि सीजफायरवर प्रश्न, अखेर सरकारने संसदेत सांगितलं सत्य

Parliament Monsoon Session : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षांच्या गदारोळादरम्यान सरकारने ऑपरेशन सिंदूरवर उत्तर दिलय. ऑपरेशन सिंदूर आणि सीजफायरवर प्रश्न झाला. सीजफायरवरुन अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलय. कारण आपली बाजू वरचढ असताना सीजफायरची घोषणा झाली.

Parliament Monsoon Session : ऑपरेशन सिंदूर आणि सीजफायरवर प्रश्न, अखेर सरकारने संसदेत सांगितलं सत्य
फाईल फोटो
| Updated on: Jul 25, 2025 | 3:01 PM
Share

संसदेच पावसाळी अधिवेशन सुरु आहे. या सत्रात आतापर्यंत मोठा गदारोळ पहायला मिळाला आहे. विरोधी पक्षाचा विरोध आणि घोषणाबाजीमुळे अनेकदा कामकाज स्थगित करावं लागलय. सरकारकडून ऑपरेशन सिंदूरवर उत्तर देण्यात आलं. सरकारने सांगितलं ऑपरेशन सिंदूरची सुरुवात का केली?. ऑपरेशन सिंदूरवर राज्यसभेत सरकारने उत्तर दिलय. सपा खासदाराने विचारलं की, काय ऑपरेशन सिंदूरची घोषणा आंतरराष्ट्रीय दबावापोटी झाली होती?. सपा खासदार रामजी लाल सुमन यांनी विचारलं की, ऑपरेशन सिंदूर सुरु असताना अचानक युद्धविरामाच्या घोषणेचा सैन्याच्या मनोबलावर काय परिणाम झाला?. कारण आपलं सैन्य त्यावेळी यशस्वी ठरत होतं. अचानक झालेला युद्धविराम सैन्याचं मनोबल आणि देशवासियांच्या भावनेच्या विरोधात होता.

पाकिस्तान प्रायोजित दहशतवादाला उत्तर देण्यासाठी ऑपरेशन सिंदूरची सुरुवात झाली. याचा उद्देश दहशतवादी इन्फ्रास्ट्रक्चर नष्ट करणं आणि भारतात दहशतवाद्यांना पाठवण्यापासून रोखणं हा होता, असं सरकारकडून उत्तर देण्यात आलं.

सरकारने संसेदत काय सांगितलं?

“भारताची कारवाई ही टार्गेट ठरवून आणि मोजून-मापून होती. पाकिस्तानने काही सैन्य ठिकाणांशिवाय भारतीय नागरिक क्षेत्रांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानच्या या चिथावणीखोर कारवायांना भारतीय सैन्य दलाने कठोर आणि निर्णायक प्रत्युत्तर दिलं. त्यामध्ये पाकिस्तानी सैन्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं” असं सरकारकडून सांगण्यात आलं.

DGMO मध्ये झालेल्या चर्चेचा तपशील काय?

त्यानंतर 10 मे 2025 रोजी पाकिस्तान सैन्य अभियानाच्या महासंचालकांनी आपल्या भारतीय समकक्षांसोबत चर्चा केली. त्यांनी गोळीबार आणि सैन्य कारवाई रोखण्याची विनंती केली. त्यावर त्याच दिवशी सहमती बनली. त्यानंतर सीजफायरची घोषणा करण्यात आली.

पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उद्धवस्त

22 एप्रिलला झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये तणाव वाढलेला. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात 26 नागरिकांचा मृत्यू झाला. त्यानंतर भारताने पाकिस्तानवर अनेक निर्बंध लादले. पहलगामचा बदला घेण्यासाठीच भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर लॉन्च केलं. त्यात पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उद्धवस्त करण्यात आले.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.