AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM Modi Meeting With All CM | पंतप्रधान मोदींची सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांशी बैठक, कोरोना रुग्ण, लॉकडाऊन, लस वितरण यावर चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांसोबत बैठक आयोजित केली आहे. (PM Narendra Modi meeting with All State Chief Minister Live Update)

PM Modi Meeting With All CM | पंतप्रधान मोदींची सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांशी बैठक, कोरोना रुग्ण, लॉकडाऊन, लस वितरण यावर चर्चा
| Updated on: Nov 24, 2020 | 9:53 AM
Share

नवी दिल्ली : देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्सफरन्सिंगद्वारे बैठक आयोजित केली आहे. ही बैठक दोन टप्प्यात पार पडणार आहे. यात एका टप्प्यात मोदी सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांशी कोरोना रुग्णसंख्येवर चर्चा करतील. तर दुसऱ्या टप्प्यात सर्व राज्यात कोरोना लसीच्या वितरणाची तयारी यावर चर्चा केली जाईल. त्यामुळे या बैठकीवर देशभरातील जनतेचे लक्ष लागले आहे. (PM Narendra Modi meeting with All State Chief Minister Live Update)

पंतप्रधान मोदी बैठकीच्या पहिल्या टप्प्यामध्ये एकूण 8 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार आहेत. यात ज्या राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे, ते मुख्यमंत्री सहभागी होतील. म्हणजेच पहिल्या टप्प्यातील बैठकीमध्ये महाराष्ट्रचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उपस्थित असतील. तर दुसऱ्या टप्प्यात उर्वरित राज्यांचे मुख्यमंत्री या महत्वाच्या बैठकीत सामील होतील. दुसऱ्या टप्प्यातील बैठकीला दुपारी 12 वाजता सुरुवात होणार आहे.

?LIVE UPDATE?

[svt-event title=” पंतप्रधान मोदींच्या दोन महत्त्वपूर्ण बैठक ” date=”24/11/2020,9:51AM” class=”svt-cd-green” ] पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज होणारी दुसरी बैठक ही सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील प्रतिनिधींशी होईल. या बैठकीत कोरोना लसीचे वितरण यावर चर्चा होईल. देशात किमान पाच लसींच्या चाचण्या सुरु आहेत. याचे सकारात्मक परिणाम दिसत आहे. त्यामुळे सरकारतर्फे कोरोना लसीच्या वितरणावर चर्चा होणार आहे. ही बैठक दुपारी 12 वाजता सुरु होईल. [/svt-event]

[svt-event title=”‘या’ राज्यातील मुख्यमंत्री पहिल्या टप्प्यातील बैठकीत सहभागी होणार” date=”24/11/2020,9:48AM” class=”svt-cd-green” ] केरळ, पश्चिम बंगाल, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र आणि छत्तीसगड या राज्यात कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत आहे. दिवाळीनंतर या राज्यातील कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे. तसेच मृतांचा आकडाही वाढत आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील बैठकीत या राज्यातील मुख्यमंत्री सहभागी होतील. [/svt-event]

[svt-event title=” पंतप्रधान मोदींच्या दोन महत्त्वपूर्ण बैठक ” date=”24/11/2020,9:48AM” class=”svt-cd-green” ] पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहे. सकाळी 10.30 वाजता ही बैठक सुरु होईल. यातील पहिल्या टप्प्यात कोरोना रुग्ण वाढत असलेल्या राज्यातील मुख्यमंत्री सहभागी होतील. [/svt-event]

‘या’ विषयावर होणार चर्चा

या बैठकीत प्रत्येक राज्यातील कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेण्यात येणार आहे. तसेच लस वितरणाच्या धोरणासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली जाईल. या बैठकीला मुख्यमंत्र्यांव्यतिरिक्त राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाचे प्रतिनिधीही उपस्थित असतील, अशी माहिती मिळत आहे. पंतप्रधान मोदींनी याआधी अनेकदा सर्व राज्यातील मुख्यमंत्र्याशी बैठका घेतल्या  आहेत. या बैठकीत कोरोना या महत्त्वाच्या मुद्द्यावरच चर्चा झाली.

लॉकडाऊन वाढवणार का?

राज्यासह देशामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे देशासह राज्यात लॉकडाऊन करायचा का, या मुद्द्यावरही या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. (PM Narendra Modi meeting with All State Chief Minister Live Update)

संबंधित बातम्या :

CORONA UPDATE : 100 देशांच्या राजदूतांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी सिरम इन्स्टिट्यूटला भेट देणार

भारतीयांना कोरोना लस कधी मिळणार?, पीएम केअरचा निधी मोफत लसीकरणासाठी वापरणार का? राहुल गांधींचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रश्न

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.