Punjab Charanjit Channi : आपकी असुविधा के लिए हमे खेद है’, मोदींचा आदर करण्यासोबत आणखी काय म्हणाले पंजाबचे सीएम?

पंतप्रधान मोदी यांनी पंजाबमधील प्रकाराबद्दल संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केलीय. तर भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी पंजाब सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. या पार्श्वभूमीवर पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीतसिंह चन्नी यांनी पत्रकार परिषद घेत घडलेल्या प्रकाराबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे.

Punjab Charanjit Channi : आपकी असुविधा के लिए हमे खेद है', मोदींचा आदर करण्यासोबत आणखी काय म्हणाले पंजाबचे सीएम?
चरणजीतसिंह चन्नी, मुख्यमंत्री, पंजाब
Follow us
| Updated on: Jan 05, 2022 | 6:50 PM

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्यानं त्यांना पंजाब (Punjab) दौरा रद्द करावा लागला. या प्रकारानंतर राष्ट्रीय राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. खुद्द पंतप्रधान मोदी यांनी या प्रकाराबद्दल संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केलीय. तर भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा (JP Nadda) यांनी पंजाब सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. या पार्श्वभूमीवर पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीतसिंह चन्नी (CharanjitSingh Channi) यांनी पत्रकार परिषद घेत घडलेल्या प्रकाराबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे.

आज फिरोजपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना पंतप्रधान मोदी यांना परतावं लागलं त्याबद्दल मी खेद व्यक्त करतो. आम्ही आमच्या पंतप्रधानांचा आदर करतो, असं चन्नी यांनी म्हटलंय. तसंच सुरक्षेत काही चूक नव्हती. आम्ही खराब हवामानामुळे मोदींचा दौरा रद्द करण्याची विनंती पीएमओला केली होती. पण त्यांनी मार्ग बदलला. आम्हाला कळवलंही नाही, असं चन्नी म्हणत आहेत.

त्याचबरोबर मला आज भटिंडा येथे पंतप्रधानांचे स्वागत करण्यासाठी जायचं होतं. पण ज्यांना माझ्यासोबत जायचं होतं त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यामुळे मी पंतप्रधान यांच्या स्वागतासाठी जाऊ शकलो नाही, असंही चन्नी यावेळी म्हणाले.

पंजाबमध्ये नेमकं काय घडलं?

पंतप्रधान मोदी हे आज पंजाब दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांच्या सुरक्षाव्यवस्थेत काही त्रुटी झाल्याचं समोर आलं आहे. पंतप्रधान किंवा राष्ट्रपतींचा ताफा द्या मार्गावरुन जाणार असतो तो मार्ग पूर्ण रिकामा करण्यात येतो. मात्र, पंतप्रधान मोदींच्या मार्गावर काही शेतकरी आंदोलक आंदोलन करत असल्याचं दिसून आलं. त्यामुळे मोदींना काही वेळ आपल्या गाडीतच थांबून राहावं लागलं. त्यानंतर मोदींनी आपल्या पंजाब दौरा रद्द करत ते पुन्हा भटिंडा विमानतळावर पोहोचले. तिथे त्यांनी विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडे संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केलीय. ‘आपल्या मुख्यमंत्र्यांना धन्यवाद सांगा की, मी भटिंडा विमातळावर जिवंत पोहोचू शकलो’, अशा शब्दात पंतप्रधान मोदी यांनी संताप व्यक्त केल्याचं समजतं.

इतर बातम्या : 

‘मुंबई-पुण्‍यातील विद्यापीठांचे जेएनयू करायचे आहे काय?’ आशिष शेलार यांचा ठाकरे सरकारला सवाल

PM Narendra Modi : ‘आपल्या मुख्यमंत्र्यांना धन्यवाद सांगा की, मी भटिंडा विमानतळावर जिवंत पोहोचू शकलो’, पंतप्रधान मोदींची संतप्त प्रतिक्रिया

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.