AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM Narendra Modi : साधना करताना मनात, डोक्यात काय आलं? मोदींनी शब्दात उतरवला साधनेचा अनुभव

PM Narendra Modi : "सुरुवातीला निवडणुकीचा कोलाहल मनात आणि डोक्यात सुरु होता. रॅली, रोड शो मध्ये दिसलेले असंख्य चेहरे माझ्या डोळ्यासमोर आले" पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर ध्यान धारणेसाठी कन्याकुमारीला गेले होते. तो अनुभव त्यांनी शब्दात उतरवला आहे.

PM Narendra Modi : साधना करताना मनात, डोक्यात काय आलं? मोदींनी शब्दात उतरवला साधनेचा अनुभव
PM Narendra Modi
| Updated on: Jun 03, 2024 | 11:52 AM
Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा निवडणूक 2024 चा प्रचार संपल्यानंतर तामिळनाडूतील कन्याकुमारी येथे ध्यानधारणेसाठी गेले होते. साधना करुन परतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका ब्लॉग लिहिला आहे. त्यात त्यांनी स्वामी विवेकानंद यांच्याकडून मिळालेली प्रेरणा आणि लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या अनुभवांचा उल्लेख केला आहे. कन्याकुमारीच्या तीन दिवसाच्या अध्यात्मिक यात्रेत वेगवेगळे अनुभव मिळाल्याच पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे. त्यांना स्वत:मध्ये चैतन्य, ऊर्जेचा एक प्रवाह जाणवला. 24 च्या या निवडणुकीत सुखद योगायोगाच्या अनेक गोष्टी जुळून आल्या. “अमृतकाळातील या पहिल्या लोकसभा निवडणुकीत मी, 1857 च्या प्रथम स्वातंत्र्य संग्रामाच प्रेरणास्थळ मेरठमधून प्रचार अभियानाची सुरुवात केली. देशभर भ्रमंती करताना या निवडणुकीतील माझी शेवटची सभा पंजाबच्या होशियारपुरमध्ये झाली. संत रविदास यांची तपोभूमी, गुरुंची भूमी पंजाबमध्ये शेवटची सभेच सौभाग्य लाभण खूप खास आहे” असं पंतप्रधान मोदींनी त्यांच्या ब्लॉगमध्ये म्हटलं आहे.

त्यानंतर मला कन्याकुमारी येथे भारत मातेच्या चरणी बसण्याची संधी मिळाली. “सुरुवातीला निवडणुकीचा कोलाहल मनात आणि डोक्यात सुरु होता. रॅली, रोड शो मध्ये दिसलेले असंख्य चेहरे माझ्या डोळ्यासमोर आले. माता-भगिनींकडून मिळालेलं प्रेम, आशिर्वाद, त्यांच्या डोळ्यात माझ्याबद्दल विश्वास हे सगळं मला दिसत होतं. माझ्या डोळ्यात पाणी होतं. मी शुन्यात चाललेलो. साधनेमध्ये माझा प्रवेश सुरु झालेला” असं मोदींनी या ब्लॉगमध्ये म्हटलय.

…आणि शब्द सगळे आपोआपच शुन्यात गेले

“काही क्षणात राजकीय वाद विवाद, वार-पलटवार, आरोपांचे स्वर आणि शब्द सगळे आपोआपच शुन्यात गेले. माझ्या मनात विरक्तीचा भाव आणखी तीव्र झाला. माझं मन बाह्य जगापासून पूर्णपणे अलिप्त झालं. इतक्य मोठ्या जबाबदाऱ्यांमध्ये अशी साधना कठीण असते. पण कन्याकुमारीची भूमी आणि स्वामी विवेकानंदांच्या प्रेरणेने हे सहजतेने शक्य झालं. खासदार म्हणून काशीत मतदान होत असताना ते सोडून इथे आलो होतो. मी ईश्वराचा आभारी आहे. मला जन्मापासून त्यांनी हे संस्कार दिले. मी हा सुद्धा विचार केला की, स्वामी विवेकानंद यांना त्या स्थानावर साधना करताना काय अनुभव आला असेल. माझ्या साधनेच्या काही भागात असे विचार येऊन गेले” असं मोदींनी ब्लॉगमध्ये लिहिलय.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा