आसीम मुनीर यांच्या ‘त्या’ फोटोंमुळे भारताचं काम झालं आता आणखी सोपं, नेमकं प्रकरण काय?
पाकिस्तानमध्ये तेथील लष्कराचं वर्चस्व आहे, येथील सरकार देखील लष्कराच्या इशाऱ्यावरच काम करते. आता पाकिस्तानी लष्कर आणि दहशतवाद्यांचं कनेक्शन पुन्हा एकदा जगासमोर आलं आहे.

पाकिस्तानमध्ये तेथील लष्कराचं वर्चस्व आहे, येथील सरकार देखील लष्कराच्या इशाऱ्यावरच काम करते. आता पाकिस्तानी लष्कर आणि दहशतवाद्यांचं कनेक्शन पुन्हा एकदा जगासमोर आलं आहे. एमएमएलकडून पाकिस्तानच्या कराची आणि लाहोर या दोन मोठ्या शहरांमध्ये अनेक ठिकाणी पोस्टर लावण्यात आले आहेत, या पोस्टरवर फील्ड मार्शल आसिम मुनीर यांचा फोटो पाकिस्तानमधील काही दहशतवाद्यांसोबत छापण्यात आला आहे. सध्या पाकिस्तानमध्ये या पोस्टरची जोरदार चर्चा सुरू आहे.
दरम्यान ही पहिलीच वेळ नाहीये की पाकिस्तानचं लष्कर आणि दहशतवाद्यांचा संबंध जगासमोर आला आहे, पहलगामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं ऑपरेश सिंदूर राबवलं, त्यावेळी भारताकडून पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानवर एअर स्ट्राईक करण्यात आला, या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांचे 9 अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले, तसेच 100 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाला. त्यावेळी देखील दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेमध्ये पाकिस्तानचे अनेक बडे सैन्य अधिकारी सहभागी झाले होते.
22 एप्रिलला जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी मोठा हल्ला केला होता, या हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला, त्यानंतर भारतानं पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केला. या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांचे 9 अड्डे उद्ध्वस्त झाले तसेच 100 हून अधिक दहशतवादी ठार झाले. दरम्यान त्यानंतर पाकिस्तानने देखील भारतावर ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न केला, मात्र भारतानं पाकिस्तानचे सर्व हल्ले परतून लावले, पाकिस्तानच्या अनेक मिसाईल आणि ड्रोन भारतानं पाडले, मात्र त्यानंतर प्रत्युत्तर म्हणून भारतानं केलेल्या हल्ल्यात पाकिस्तानचं मोठं नुकसान झालं. पाकिस्तानचे अनेक एअर बेस उद्ध्वस्त झाले तसेच रडार सिस्टिमचं देखील मोठं नुकसान झालं होतं. दरम्यान भारताच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेमध्ये पाकिस्तानी सैन्यातील अनेक अधिकारी दिसून आले होते. त्याचवेळी पाकिस्तानचा खराच चेहरा जगासमोर आला होता.
त्यानंतर आता पुन्हा एकदा एमएमएलकडून पाकिस्तानमधील कराची आणि लाहोर या दोन मोठ्या शहरांमध्ये अनेक ठिकाणी पोस्टर लावण्यात आले आहेत, ज्या पोस्टरवर फील्ड मार्शल आसिम मुनीर यांचा फोटो पाकिस्तानमधील काही दहशतवाद्यांसोबत छापण्यात आला आहे, त्यामुळे पुन्हा एकदा पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर उघड झाला आहे, पाकिस्तानी लष्कर आणि दहशतवाद्यांचा संबंध स्पष्ट झाला आहे. दरम्यान भारताकडून वारंवार पाकिस्तानचे दहशतवाद्यांसोबत असलेले संबंध जगासमोर आणण्याचा प्रयत्न सुरू आहे, या पोस्टरमुळे हे काम आता आणखी सोपं झालं आहे.
