AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आईवर बलात्कार, मुलीसोबत अश्लील कृत्य, माजी खासदाराला जन्मठेप, तुरुंगात 8 तास करणार असं काम

3 हजार अश्लील व्हिडीओ, 50 महिलांचं शोषण..., आईवर बलात्कार, मुलीसोबत अश्लील कृत्य करणाऱ्या माजी खासदाराला जन्मठेप, आता तुरुंगात 8 तास करणार असं काम...

आईवर बलात्कार, मुलीसोबत अश्लील कृत्य, माजी खासदाराला जन्मठेप, तुरुंगात 8 तास करणार असं काम
फाईल फोटो
| Updated on: Aug 05, 2025 | 10:21 AM
Share

बेंगळुरूमधील एका विशेष न्यायालयाने माजी खासदार प्रज्वल रेवण्णा याला बलात्कार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने माजी खासदाराला भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) विविध कलमांखाली दोषी ठरवलं आहे आणि दंडही ठोठावला आहे. आलिशान आणि रॉयल आयुष्य जगणारा प्रज्वल आता राहिलेलं आयुष्य तुरुंगात काढणार आहे. शिक्षा सुनावल्यानंतर प्रज्वल रेवण्णाला परप्पाना अग्रहारा तुरुंगातील कैद्यांच्या बॅरेकमध्ये पाठवण्यात आले.

कैदी नंबर 15528

राजकारणात सक्रिय असलेला माजी खासदार प्रज्वल रेवण्णा याला आता नवीन ओळख मिळाली आहे. कैदी नंबर 15528 अशी आता त्याची नवी ओळख असणार आहे. तुरुंगाच्या नियमांनुसार, त्याला एक पांढरा गाऊन देण्यात आला होता, जो दोषी कैद्यांना घालायचा असतो. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्षेच्या पहिल्या दिवशी प्रज्वल खूप अस्वस्थ दिसत होता आणि रात्रभर झोपू देखील शकला नाही.

सकाळची सुरुवात अन्य कैद्यांप्रमाणे…

सकाळची कामं पूर्ण केल्यानंतर प्रज्वल शांतपणे एका ठिकाणी बसला होता. तुरुंग अधिकाऱ्यांनी त्याला नाश्त्यासाठी खारट अवलक्की दिली. हा एक प्रकारचा कोरडा पोहे आहे, जो बहुतेकदा तिथल्या कैद्यांना दिला जातो… अशी देखील माहिती समोर येते आहे.

रोज 8 तास करावं लागणार काम…

थाटात जगणाऱ्या प्रज्वल याला आता रोज 8 तास काम करावं लागेल. तुरुंगाच्या नियमांनुसार, प्रज्वल याला वेग-वेगळ्या कामांमधून एका कामाची निवड करावी लागेल… जसं की बेकरीमध्ये काम करणं, बागकाम करणं, भाजीपाला पिकवणं, डेअरी फार्ममध्ये काम करणं, हस्तकला किंवा लाकूडकाम (सुतारकाम) करणं… यांसारखी कामं त्याला करावी लागणार आहेत.

कामाच्या बदल्यात पगार मिळेल.

सुरुवातीला, प्रज्वल रेवण्णा याला अकुशल कामगार मानलं जाईल आणि त्या बदल्यात त्याला दरमहा 524 रुपये मिळतील. जर त्याने चांगलं काम केलं तर एका वर्षानंतर त्यांना अर्ध-कुशल आणि नंतर कुशल कैद्यांच्या श्रेणीत बढती दिली जाऊ शकते, ज्यामुळे त्याचा पगार देखील वाढेल.

पीडितेली मिळणार भरपाई…

न्यायालयाने प्रज्वलला11 लाख 60 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. या दंडापैकी 11 लाख 25 हजार रुपये पीडितेला देण्यात येतील. ही भरपाई पीडितेला मदत आणि न्याय म्हणून देण्यात आली आहे.

पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी.
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली.
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला.
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप.
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार.