चंद्रपूरः राज्यातून एकानंतर एक प्रकल्प बाहेर जात आहेत. यामुळे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांची फार अडचण होणार नाही. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) तोंड द्यावं लागणार आहे. ते जिथे जिथे जातील तिथे तिथे त्यांना याचं उत्तर द्यावं लागणार आहे. पहिला प्रकल्प गेला तेव्हा आम्ही जबाबदार नव्हतो, असे ते म्हणाले. मात्र आता सरकारच्या हातून दोन प्रकल्प गेले आहेत. याचं उत्तर द्यावं लागणार आहे, असं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केलंय.
ते म्हणाले, वेदांता प्रकल्पानंतर दोन प्रकल्प तर राज्याच्या हातून गेले. आता तिसराही पेट्रो केमिकल्सचा प्रकल्प कर्नाटकात जाण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे असे प्रकल्प बाहेर जाताना, एकनाथ शिंदे अडचणीत आहे, असे मी मानतो, असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलंय.