AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजप मुख्यमंत्र्याने राजीनामा देताच राष्ट्रपती राजवट लागू, मणिपूरमध्ये मोठ्या घडामोडी

एन बीरेन सिंह यांनी आपला राजीनामा देताना राज्यामध्ये तीन महिन्यांसाठी राष्ट्रपती राजवट लागू करण्याचाही प्रस्ताव दिला होता. त्यानंतर मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. अखेर मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे.

भाजप मुख्यमंत्र्याने राजीनामा देताच राष्ट्रपती राजवट लागू, मणिपूरमध्ये मोठ्या घडामोडी
Manipur President Rule
| Updated on: Feb 13, 2025 | 8:09 PM
Share

Manipur President Rule : गेल्या दोन वर्षांपासून मणिपूरमध्ये सातत्याने हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. त्यातच काही दिवसांपूर्वी मणिपूरचे मुख्यमंत्री एन बीरेन सिंह यांनी मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा दिला होता. एन बीरेन सिंह यांनी आपला राजीनामा देताना राज्यामध्ये तीन महिन्यांसाठी राष्ट्रपती राजवट लागू करण्याचाही प्रस्ताव दिला होता. त्यानंतर मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. अखेर मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे.

मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी 9 फेब्रुवारी 2025 रोजी राज्यपालांची भेट घेऊन त्यांचा राजीनामा सुपूर्द केला होता. मणिपूर विधानसभेचे अधिवेशन 10 फेब्रुवारी 2025 रोजी होणार होते. मणिपूर सरकारविरुद्ध अविश्वास प्रस्ताव आणण्याची तयारी विरोधक करत होते. त्यानंतर बिरेन सिंग यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

राष्ट्रपती राजवट म्हणजे नेमकं काय?

राज्यातील शासकीय कारभार संविधानानुसार चालणे शक्य नसल्याचा अहवाल राज्यपालांनी राष्ट्रपतींना दिला किंवा राष्ट्रपतींची स्वत:ची तशी खात्री पटली, तरी राष्ट्रपती त्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करु शकतात. भारतीय राज्यघटनेच्या 18 व्या भागात अनुच्छेद 352 ते 360 मध्ये आणीबाणीच्या परिस्थितीबाबत तरतुदी आहेत. त्यात आणीबाणीचे 3 प्रकार दिले आहेत. त्यातील पहिली म्हणजे 352 कलमान्वये राष्ट्रीय आणीबाणी, दुसरी 356 कलमान्वये राष्ट्रपती राजवट आणि तिसरी म्हणजे 360 कलमान्वये आर्थिक आणीबाणी.

राष्ट्रपती राजवट लागू झाल्यापासून दोन महिन्यांच्या आत संसदेची मान्यता मिळवणे आवश्यक असते. संसदेच्या मंजूरीनंतर सहा महिन्यांसाठी राष्ट्रपती राजवट लागू करता येते. संसदेने पुढील सहा महिन्यांसाठी मान्यता दिल्यास राष्ट्रपती राजवटीचा कालावधी वाढवता येऊ शकतो. संसदेची मान्यता मिळत असली, तरीही कोणत्याही राज्यात जास्तीत जास्त तीन वर्षापर्यंत राष्ट्रपती राजवट लागू करता येऊ शकते

राज्याची सर्व सत्ता राष्ट्रपतींच्या हाती

राष्ट्रपती राजवटीत न्यायालयीन वगळता राज्याची सर्व सत्ता राष्ट्रपतींच्या हाती असते. राष्ट्रपतींचे प्रतिनिधी म्हणून राज्यपाल राज्याच्या मुख्य सचिवांच्या सहाय्याने शासन चालवतात. राष्ट्रपती राजवटीत संबंधित राज्याच्या विधिमंडळाची कार्ये, अधिकार संसदेकडे सोपवले जातात.

राष्ट्रपती स्वतः आदेश देऊन राज्य सरकारच्या सेवेतील कोणत्याही अधिकाऱ्यांना कारवाई करण्यास सांगू शकतात. लोकसभेची बैठक नसल्यास राज्याच्या संचित निधीतून पैसा खर्च करण्याचा आदेश राष्ट्रपती त्या कालावधीमध्ये देऊ शकतात. राष्ट्रपती राजवटीतही उच्च न्यायालयाचे अधिकार अबाधित असतात. संबंधित राज्याच्या विधानसभेचे विसर्जन करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना असतो.

Follow Us
पूर्णेकरला संपवण्यामागे कोणाचा हात?, राऊतांनी सगळंच सांगून टाकलं
Sanjay Raut on Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा दावा! पूर्णेकरला संपवण्यामागे कोणाचा हात?, राऊतांनी सगळंच सांगून टाकलं
तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन
CM DCM Meeting : रात्री उशिरा तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन; जागावाटपावर खलबतं - सुत्र
लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेलं 1 किलो सोनं एवढ्या कोटींना विकलं
Lalbaugcha Raja Auction : लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेलं 1 किलो सोनं तब्बल एवढ्या कोटींना विकलं! बाप्पाचा आशीर्वाद मानून भक्तानेच खरेदी केलं
मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांवर ED ची नजर? तब्बल एवढ्या कोटींच्या....
Manoj Jarange ED : मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांवर ED ची नजर? आर्थिक व्यवहारांची गोपनीय चौकशी सुरू; तब्बल एवढ्या कोटींच्या व्यवहारांचा दावा
हे जैनांचं नाही, आगरी-कोळी, मराठी बांधवांचं शहर; मनसेचा कोणाला टोला?
MNS On Narendra Mehata : मीरा-भाईंदरच्या ओळखीवरून राजकीय रणकंदन! हे जैनांचं नाही, आगरी-कोळी आणि मराठी बांधवांचं शहर; मनसेचा नेमका कोणाला टोला?
मीनाक्षी शिंदेंच्या घरीच कट रचला? पूर्णेकर प्रकरणात पुरवणी जबाबाने...
Sanjay Raut : मीनाक्षी शिंदेंच्या घरीच कट रचला? पूर्णेकर प्रकरणात पुरवणी जबाबाने खळबळ; संजय राऊतांनी थेट...
ऐन सणासुदीला महागाईचा झटका! कमर्शियल LPG तब्बल एवढ्या रुपयांनी महाग
LPG Price : ऐन सणासुदीला महागाईचा झटका! कमर्शियल LPG तब्बल एवढ्या रुपयांनी महाग; ऑक्टोबरमधील हे मोठे बदल जाणून घ्या
मुंबईत येणं महागलं! पाचही टोलनाक्यांवर टोलवाढ; तब्बल एवढ्या टक्क्यांनी
Mumbai Toll Tax : मुंबईत येणं महागलं! पाचही टोलनाक्यांवर टोलवाढ; तब्बल एवढ्या टक्क्यांनी टोल महागले....
ठाकरे बंधू एकवटले! 4 ऑक्टोबरच्या मोर्चाची टॅगलाईन ठरली; लोकशाही आणि...
Raj Thackeray : Uddhav Thackeray : ठाकरे बंधू एकवटले! 4 ऑक्टोबरच्या मोर्चाची टॅगलाईन ठरली; लोकशाही आणि संविधान.....
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान