पंतप्रधान मोदींच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात त्यांचे आवडते पदार्थ कोणते आहेत आणि त्याचे आरोग्यदायी फायदे
पंतप्रधान मोदी हे आज त्यांचा 75 वा वाढदिवस साजरा करत आहेत. या वयातही मोदीजी आरोग्याच्या बाबतीत तंदुरुस्त आणि उत्साही आहेत. त्यांच्या तंदुरुस्तीचे रहस्य त्यांच्या साध्या आहारात आहे. पंतप्रधान मोदींना कोणते पदार्थ खायला आवडतात आणि त्यामुळे शरीराला कोणते फायदे मिळतात ते जाणून घेऊयात.

पंतप्रधान नरेंद्र मोदीजी 17 सप्टेंबर 2025 (बुधवार) त्यांचा 75 वा वाढदिवस साजरा करणार आहेत. पंतप्रधान मोदींचे जीवन संघर्ष, समर्पण आणि दृढनिश्चय हे सर्वांसाठी एक उत्तम उदाहरण आहे. या वयातही पंतप्रधान मोदी उल्लेखनीयपणे तंदुरुस्त आणि निरोगी आहेत. ते फक्त चार तास झोपतात आणि संपूर्ण दिवस देशसेवेसाठी स्वत:ला समर्पित करतात. तर यासर्वांमध्ये मोदीजी त्यांच्या व्यायामाची आणि आहाराची विशेष काळजी घेत असतात. 74 व्या वर्षीही ते दिवसभर उत्साहाने काम करत असतात. कारण मोदीजी त्यांच्या आहारात निरोगी आणि पौष्टिक पदार्थांचे सेवन करतात.
पंतप्रधान मोदी जेव्हा जेव्हा ते एखाद्या राज्याला भेट देतात तेव्हा ते नेहमीच तेथील प्रसिद्ध पदार्थांची चव चाखतात. त्यांनी अनेकदा मुलाखतींमध्ये त्यांच्या आवडत्या पदार्थांचा उल्लेख केला आहे. पंतप्रधान मोदींचे आवडते पदार्थ कोणते आहेत आणि ते खाल्ल्याने कोणते फायदे आरोग्याला होत असतात ते जाणून घेऊयात.
पंतप्रधान मोदींना हे दक्षिण भारतीय पदार्थ खायला खूप आवडते
पंतप्रधान मोदींनी एकदा एका मुलाखतीत सांगितले होते की त्यांना दक्षिण भारतात बनवला जाणारा उपमा खायला खूप आवडतो. ते जेव्हा जेव्हा दक्षिण भारताला भेट देतात तेव्हा उपमा आवडीने खातात. रव्यापासून बनवलेला हा एक हलका नाश्ता आहे जो पचनास मदत करतो. त्यात विविध प्रकारच्या भाज्यांचा समावेश केला जातो, ज्यामुळे त्याचे पौष्टिक मूल्य आणखी वाढते. तर यामध्ये कार्बोहायड्रेट्स, फायबर आणि अनेक जीवनसत्त्वे असतात. ते रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करते, वजन कमी करण्यास मदत करते आणि हृदयाचे आरोग्य सुधारते.
पंतप्रधान मोदींना आवडते गुजराती खिचडी
पंतप्रधान मोदी हे मूळचे गुजरातचे आहेत. त्यांना अनेक गुजराती पदार्थ खायला आवडतात, पण जेव्हा आवडत्या पदार्थांचा विचार केला जातो तेव्हा त्यांच्या यादीत गुजराती खिचडीचे नाव सर्वात प्रथम असते. मसूर डाळ आणि तांदळापासून बनवलेली ही खिचडी पचायला सोपी असते. तर मोदींनी ही खिचडी चांगल्या आरोग्यासाठी सुपरफूड असल्याचं सांगितले आहे.
तर यावेळी पोषणतज्ञ नमामी अग्रवाल यांनी देखील सांगितले आहे की खिचडीचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. त्यात प्रथिने, फायबर आणि अनेक जीवनसत्त्वे असतात, ज्यामुळे ती एकूण आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. ही खिचडी खाल्ल्याने आतड्यांचे आरोग्य सुधारते, ज्यामुळे पोटाशी संबंधित समस्यांपासून आराम मिळतो. खिचडी वजन कमी करण्यासाठी देखील फायदेशीर आहे.
गोड पदार्थांमध्ये मोदींना आवडते आंब्यापासून बनवलेले पदार्थ
पंतप्रधान मोदींनी एका मुलाखतीत सांगितले की त्यांना आंबे खायला खूप आवडतो आणि आमरस देखील खूप आवडतो. हेल्थलाइनच्या मते , आंब्यामध्ये प्रथिने, कार्बोहायड्रेट्स, फॅट, फायबर, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम सारखे पोषक घटक असतात. आंबा हे कमी कॅलरी असलेले फळ आहे जे असंख्य आरोग्य फायदे देते. नैसर्गिक साखरेमुळे ते मधुमेहींसाठी चांगले मानले जाते. आंबा हृदयाच्या आरोग्यासाठी आणि पचन सुधारण्यासाठी देखील फायदेशीर आहे.
