रात्रीच्या काळोखात भारतीय महिलेने दुबईत काय पाहिलं? ‘तो’ व्हिडीओ पाहताच म्हणाल…
Indian Girl: रात्री ते सुद्ध असं दृष्य... तुमचा विश्वासच बसणार नाही, भारतीय महिलेने रात्रीच्या काळोखात दुबईत काय पाहिलं? तिचा व्हिडीओ सध्या सर्वत्र होतोय व्हायरल, अनेकांनी कमेंट करत दिली प्रतिक्रिया

Indian Girl: सोशल मीडियावर असंख्य व्हिडीओ रोज व्हायरल होत असतात. पण काही व्हिडीओ असे आहेत जे कायम लक्षात राहतात… असाच एक व्हिडीओ आता देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये एक भारतीय महिला दुबईच्या रस्त्यांवर रात्र बिनधास्त फिरताना दिसत आहे. रात्री काळोखात महिला पूर्ण आत्मविश्वासाने एकटीच रस्त्यांवर फिरत असल्याचं पाहिल्यानंतर सर्वत्र दुबईतील सुरक्षा व्यवस्थेचं कौतुक होत आहे. फक्त कौतुकच नाही तर, महिला सार्वजनिक ठिकाणी स्वातंत्र्य आणि आत्मविश्वासाने फिरण्यास प्रेरित करत आहे.
व्हिडीओमध्ये महिलेने स्वतःचा अनुभव सांगितला आहे. महिला म्हणते, ‘दुबईत रात्र फिरताना देखील कोणतीच भीती वाटत नाही… भारतासारख्या देखील हे शक्य नाही…’, या पोस्टमुळे सोशल मीडियावर महिला स्वातंत्र्य आणि सार्वजनिक सुरक्षिततेवर नवीन चर्चा सुरू झाली आहे.
कसा होता महिलेचा अनुभव?
दुबईत राहणारी त्रिशा राज हिने इन्स्टाग्रामवर रात्री 2.37 वाजता रस्त्यावर फिरतानाचा एक व्हिडीओ पोस्ट केला. व्हिडीओमध्ये त्रिशा म्हणते, ‘संपूर्ण जगात हे फक्त एकाच ठिकाणी शक्य आहे आणि ते ठिकाण म्हणजे दुबई…’ व्हिडीओ पोस्ट करत कमेंटमध्ये त्रिशा म्हणाली, ‘भारतात वाढताना, ती नेहमीच रात्री बाहेर जाण्यास भीती वाटायची आणि संरक्षणासाठी भाऊ किंवा मित्राची आवश्यकता होती. पण दुबईमध्ये तसं नाही. मी माझी मान उंच करून रात्री एकटी रस्त्यावर फिरण्याचा अनुभव घेतला आहे… मला सुरक्षित आणि आत्मविश्वास वाटला.’
View this post on Instagram
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला. अनेकांनी कमेंट करत स्वतःची प्रतिक्रिया दिला. तर अनेकांनी महिलांसाठी सुरक्षित वातावरण असं देखली म्हटलं आहे. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘म्हणून दुबई अनेकांना स्वतःचं दुसरं घर वाटतं…’, दुसरा नेटकरी म्हणाला, ‘माझ्या शहरात मी रात्री 10 नंतर बाहेर देखील पडू शकत नाही..’ सध्या त्रिशा हिचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
UAE मिळाला आहे जगातील सर्वात सुरक्षित देशाचा किताब
जुलै 2025 मध्ये युएईला जगातील सर्वात सुरक्षित देश म्हणून घोषित केल्यानंतर या व्हिडिओला लोकप्रियता मिळत आहे. नुम्बेओ सेफ्टी इंडेक्सनुसार, युएईचा सेफ्टी स्कोअर 84.5 वरून 85.2 पर्यंत वाढला आहे, ज्यामुळे तो 167 देशांच्या यादीत अव्वल स्थानावर आहे. त्रिशाचा व्हिडिओ या दिशेने एक प्रेरणादायी उदाहरण बनला आहे.
