Narendra Modi Birthday: केंद्र सरकार आता पंतप्रधानांना मोदींना मिळालेल्या भेटवस्तूही विकणार

PM Modi Birthday | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आतापर्यंत देशविदेशात अनेक दौरे केले आहेत. यावेळी पंतप्रधान मोदी यांना अनेक भेटवस्तू आणि मानचिन्हे मिळाली होती. या भेटवस्तूंचा आता ऑनलाईन लिलाव केला जाणार आहे.

Narendra Modi Birthday: केंद्र सरकार आता पंतप्रधानांना मोदींना मिळालेल्या भेटवस्तूही विकणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी
Follow us
| Updated on: Sep 17, 2021 | 12:36 PM

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वयाच्या 72 व्या वर्षात पदार्पण करत आहेत. देशभरात पंतप्रधान मोदी अत्यंत लोकप्रिय आहेत. त्यामुळे देशभरात त्यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाकडूनही पंतप्रधानांच्या वाढदिवशी एक खास मोहीम राबवली जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आतापर्यंत देशविदेशात अनेक दौरे केले आहेत. यावेळी पंतप्रधान मोदी यांना अनेक भेटवस्तू आणि मानचिन्हे मिळाली होती. या भेटवस्तूंचा आता ऑनलाईन लिलाव केला जाणार आहे. 17 सप्टेंबरपासून ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून या गोष्टींचा लिलाव होईल. या लिलावातून मिळालेले पैसे नमामि गंगे या केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी दिले जातील.

लिलाव करण्यात येणाऱ्या वस्तूंमध्ये देशातील ऑलिम्पिकपटूंची खेळाची साधने, अयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृती, चारधामची प्रतिकृती, रुद्राक्ष सेंटरची प्रतिकृती, पेटिंग आणि वस्त्रांचा समावेश आहे. या लिलावात सहभागी होण्यासाठी https://pmmementos.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. या संकेतस्थळावर लिलावसंदर्भातील सर्व तपशील उपलब्ध असेल. 17 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर या काळात हा लिलाव पार पडेल.

पंतप्रधान मोदींच्या अमेरिकन दौऱ्याविषयी साशंकता

पंतप्रधान मोदी ( PM Narendra Modi ) आणि अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन ( Jo Biden ) 24 सप्टेंबरला अमेरिकेची राजधानी वॉग्शिंटन इथं भेटणार आहेत. बायडन सत्तेवर आल्यानंतर ही पहिली वेळ असेल, जेव्हा बायडन आणि मोदी एकमेकांना भेटतील. 22 सप्टेंबरच्या रात्री मोदी अमेरिकेत दाखल होती. व्हाईट हाऊसकडून ( White House ) मोदींच्या स्वागताची तयारी करण्यात आली आहे. मात्र, या दौऱ्यात अडथळा येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याला कारण, पंतप्रधान मोदींनी घेतलेली कोव्हॅक्सिनची लस. ( covaxin ) या लसीला अद्याप जागतिक आरोग्य संघटनेकडून ( WHO) मान्यता मिळालेली नाही. शिवाय, अमेरिकेच्या अन्न-औषध प्रशासनानेही ही लस स्वीकारलेली नाही. त्यामुळे या दौऱ्यावर आता प्रश्नचिन्हं निर्माण झालं आहे.

अमेरिकेत क्वाड देशांची बैठक होणार आहे. यामध्ये भारत-अमेरिकेसह ऑस्ट्रेलिया आणि जापानचे पंतप्रधान सामील होतील. या दौऱ्यात तालिबान, चीन आणि कोरोनावर चर्चा होण्याची शक्यता आहे. यानंतर 25 सप्टेंबरला पंतप्रधान मोदी न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्र महासभेच्या 76 व्या सत्राला संबोधित करतील.

संबंधित बातम्या:

‘बॅकरुम बॉय’ ते ‘मोदी मीन्स बिजनेस’ ते ‘राजकारणाचा जादूगार’, नरेंद्र मोदींचा भन्नाट प्रवास

PM Modi Untold Stories : लहानपणी मगरीचं पिल्लू पकडून घरी आणलं, नरेंद्र मोदींचे 10 भन्नाट किस्से

पंतप्रधानांनी कोव्हॅक्सिनचे दोन्ही डोस घेतले, पण अमेरिकेत मान्यताच नाही, नरेंद्र मोदींच्या दौऱ्यावर प्रश्नचिन्ह?

Non Stop LIVE Update
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.