AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कारागृहात पती-पत्नीला एकांतात भेटण्याची सोय, शारीरिक संबंधही ठेवता येणार

आता कैद्यांना देखील त्यांच्या जोडीदारासोबत एकांतात वेळ घालावीत येणार आहे. इतकेच काय शारीरिक संबंधासाठी विशेष सुविधा देखील करण्यात आलेली आहे.

कारागृहात पती-पत्नीला एकांतात भेटण्याची सोय, शारीरिक संबंधही ठेवता येणार
कैदी प्रतीकात्मक फोटो Image Credit source: Social Media
| Updated on: Oct 12, 2022 | 7:51 AM
Share

चंदिगढ, कारागृहातले जीवन म्हणजे फक्त एकाकीपणा! ना कुटुंब ना कोणी परिचयाचे. मात्र कैद्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आलेली आहे. तुरुंगातल्या कैद्याला (prisoner) आपल्या जोडीदारासोबत (Partner) एकांतात एकत्र वेळ घालवता येणार आहे (Meeting in Private room). या सुविधेची सर्वत्र चर्चा होत आहे. तुरुंगात कैद्यांसाठी खास खोली बनवण्यात आली आहे. या खोलीत भेटीदरम्यान कैदी शारीरिक संबंधही (physical relation)  बनवू शकतो. ऐकायला हे आश्चर्यकारक वाटत असले तरी हे खरं आहे. पंजाबमधील तुरुंगात बंद कैद्यांना आता अशी सुविधा मिळणार आहे. आता पती-पत्नी पंजाबच्या (Panjab) तुरुंगात एकांतात वेळ घालवू शकणार आहेत. अशी सुविधा देणारे पंजाब हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.

सुविधेचा लाभ घेणाऱ्याने दिली प्रतिक्रिया

बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, सिंग गोइंदवाल तुरुंगातील कैदी गुरजित हे या सुविधेचा लाभ घेणारे पहिले कैदी आहेत. त्यांनी सांगितले की, तुरुंगातील कैद्याला एकटेपणा जाणवतो त्यामुळे ते नैराश्यात राहतात, मात्र या सुविधे अंतर्गत  जेव्हा माझी पत्नी मला भेटायला आली तेव्हा आम्ही एका खोलीत काही तास एकांतात घालवले. माझ्यासाठी हा मोठा दिलासा होता, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

गुरजीत सिंग हे हत्येप्रकरणी शिक्षा भोगत आहे. या नव्या सुविधेबद्दल ते पंजाब सरकारचे आभार मानत आहेत. पती-पत्नीला जेलमध्ये एकांतात भेटण्याची सुविधा देणारे पंजाब आता पहिले राज्य बनले आहे. पंजाबच्या या तुरुंगात मिळणाऱ्या सुविधांबाबत सर्वत्र  चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे या भेटीदरम्यान पती-पत्नीमध्ये शारीरिक संबंधही ठेऊ शकतात.

असा होता आधीचा नियम

यापूर्वी पंजाबमध्ये कैद्यांना त्यांना भेटायला आलेय जोडीदाराशी शारीरिक संबंध ठेवण्याची परवानगी नव्हती. भेटायला आलेले कुणीही ठराविक अंतरावर उभे राहून बोलू शकत होते. यादरम्यान त्यांच्यामध्ये काचेची भिंतही होती. गुरजीत सिंह म्हणाले की, आता सरकार विवाहित जोडप्यांना तुरुंगात खाजगी भेटीगाठी घेण्याची परवानगी देत ​​आहेत. हा अत्यंत सुखद निर्णय आहे.

या नव्या सुविधेबाबत पंजाबचे विशेष महासंचालक हरप्रीत सिद्धू यांनी बीबीसीला सांगितले की, जो जोडीदार तुरुंगाच्या बाहेर आहे त्याच्यासाठी त्याच्या जोडीदाराचा सहवास न मिळणं ही देखील एक प्रकारची शिक्षाच आहे.

या कैद्यांचे समाजात परत येणे सुनिश्चित व्हावे, एवढीच आमची इच्छा आहे. त्यामुळेच पंजाबच्या तुरुंगात एकांतात भेटण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.” ते म्हणाले की, देशातील हा अशा प्रकारचा पहिला पायलट प्रकल्प असून सध्या 25 पैकी 17 ठिकाणी ही सुविधा उपलब्ध आहे.

हरप्रीत सिद्धू म्हणाले की अशी सुविधा अनेक देशांच्या तुरुंगांमध्ये आहे. याशिवाय न्यायालयांचे असे अनेक आदेश आहेत जे या सुविधेला समर्थन देतात. जोडप्यांचे मिलन किंवा त्यांच्यातील लैंगिक संबंध ही एक गरज आहे असेही ते म्हणाले.

या सुविधेचा लाभ घेणाऱ्या अर्जांची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, पहिल्याच आठवड्यातच कैद्यांकडून त्यांच्या जोडीदाराला भेटण्याच्या परवानगीसाठी 385 अर्ज प्राप्त झाले आहे.

अनेक देशांमध्ये आहे अशी व्यवस्था

पंजाब सरकारने आपल्या निर्णयामध्ये वैवाहिक जीवनाचा अर्थ स्पष्ट करण्यासाठी शब्दकोशाचा हवाला दिला आहे आणि म्हटले आहे की विवाहित जोडपे तुरुंगात त्यांच्या भेटीदरम्यान लैंगिक संबंध ठेवू शकतात. पंजाब सरकारच्या म्हणण्यानुसार अनेक देशांमध्ये अशा भेटीला परवानगी आहे. यामध्ये अमेरिका, फिलिपिन्स, कॅनडा, सौदी अरेबिया, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, फ्रान्ससह अनेक देशांचा समावेश आहे.

धोकादायक कैद्यांना मिळणार का सुविधेचा लाभ?

या सुविधेचा फायदा गुंडांना मिळणार का?, असा प्रश्न नक्कीच तुमच्याही मनात आला असेल. मात्र गुंड किंवा अधिक धोकादायक कैद्यांना त्यांच्या पती किंवा पतींना भेटण्याची परवानगी नाही. नमूद केलेल्या नियमांनुसार, उच्च जोखमीचे कैदी, गुंड आणि दहशतवादी यांना ही सुविधा मिळणार नाही.

यासोबतच लैंगिक शोषण, लैंगिक अत्याचार आणि कौटुंबिक हिंसाचाराच्या गुन्ह्यात शिक्षा भोगणाऱ्यांना ही सुविधा मिळणार नाही. तसेच ज्या कैद्यांना टीबी, एचआयव्ही, लैंगिक आजार आहेत त्यांनाही ही परवानगी मिळणार नाही. अशा परिस्थितीत कारागृहातील डॉक्टरांकडून मंजुरी घ्यावी लागेल.

अशा कैद्यांना नाही मिळणार सुविधेचा लाभ

  • गेल्या तीन महिन्यांत कारागृहात कोणताही गुन्हा केलेल्यांनाही ही सुविधा मिळणार नाही.
  • ज्यांनी तीन महिने कर्तव्य बजावले नाही त्यांनाही या सुविधेचा लाभ मिळणार नाही.
  • कारागृहात चांगली वागणूक नसणारे आणि तुरुंगाची शिस्त मोडणाऱ्यांनाही ही सुविधा मिळणार नाही.

कोणत्या गुन्हेगारांना मिळेल प्राधान्य

  • जे गुन्हेगार प्रदीर्घ काळ तुरुंगात आहेत
  • मुलाच्या आई किंवा वडिलांना प्राधान्य मिळेल
  • पॅरोलसाठी पात्र असलेल्या कैद्यांना प्राथमिक यादीत शेवटी ठेवले जाईल
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.