AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘नव्या संसदेसाठी, स्पेशल विमानासाठी पैसा आहे,’ मात्र शेतकऱ्यांसाठी नाही? प्रियंका गांधींचा पंतप्रधानांना सवाल

उत्तर प्रदेशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देण्यासाठी सरकारकडे 14 हजार कोटी रुपये नाहीत. 2017 पासून उत्तर प्रदेशात उसाचा भाव वाढला नाही. हे सरकार फक्त अब्जाधिशांपुरताच विचार करतं, असा घणाघात प्रियंका गांधी यांनी केलाय.

'नव्या संसदेसाठी, स्पेशल विमानासाठी पैसा आहे,' मात्र शेतकऱ्यांसाठी नाही? प्रियंका गांधींचा पंतप्रधानांना सवाल
प्रियांका गांधी आणि नरेंद्र मोदी
| Updated on: Dec 07, 2020 | 10:26 AM
Share

नवी दिल्ली: दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस चांगलीच आक्रमक झालेली पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांच्या समर्थनात आणि कृषी कायद्याच्या विरोधात काँग्रेस नेते राहुल गांधी आक्रमक भूमिका मांडताना दिसत आहेत. त्यातच काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोंडित पकडण्याचा प्रयत्न केला आहे.(Priyanka Gandhi questions Prime Minister Narendra Modi on farmers’ issue)

उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरुन प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रश्न विचारला आहे. ‘नव्या संसदेसाठी केंद्र सरकारचे 20 हजार कोटी रुपये आहेत. पंतप्रधानांसाठी विशेष विमान खरेदी करण्यासाठी 16 हजार कोटी रुपये आहेत. मात्र उत्तर प्रदेशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देण्यासाठी सरकारकडे 14 हजार कोटी रुपये नाहीत. 2017 पासून उत्तर प्रदेशात उसाचा भाव वाढला नाही. हे सरकार फक्त अब्जाधिशांपुरताच विचार करतं,’ असा घणाघात प्रियंका गांधी यांनी केलाय.

अहंकाराची खुर्ची सोडा- राहुल गांधी

सरकारने अहंकाराची खुर्ची सोडून शेतकऱ्यांना त्यांचा हक्क आणि अधिकार द्यायला हवा, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे.  आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या समर्थनात राहुल गांधी यांनी ट्वीट केलंय. ‘अन्नदाता रस्ते-मैदानावर धरणं देत आहे आणि ‘खोटे’ टीव्हीवर भाषण. शेतकऱ्यांच्या मेहनतीचं ऋण आपल्यावर आहे. हे ऋण त्यांना न्याय आणि त्यांचे अधिकार देऊनच उतरवलं जाईल. त्यांच्यावर लाठीमार करुन, अश्रूधुराच्या नळकांड्या फोडून ते ऋण उतरलं जाणार नाही’, अशा शब्दात राहुल गांधी यांनी केंद्र सरकार आणि पर्यायानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला होता.

उद्याच्या भारत बंदला काँग्रेसचा पाठिंबा

“8 डिसेंबरला होणाऱ्या भारत बंदला काँग्रेस पक्षाचं समर्थन असेल. आम्ही आमच्या पक्ष कार्यालयांबाहेरही आंदोलन करणार आहोत. शेतकऱ्यांच्या समर्थनात राहुल गांधींनी टाकलेलं हे मजबूत पाऊल असेल. शेतकऱ्यांनी पुकारलेला भारत बंद आणि आंदोलन यशस्वी होण्यासाठी आम्ही प्रयत्न करु,” असं पवन खेडा यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.

संबंधित बातम्या:

FARMER PROTEST | शेतकऱ्यांनी पुकारलेल्या ‘भारत बंद’ला काँग्रेस, टीआरएस आणि ‘आप’चा पाठिंबा

‘अहंकाराची खुर्ची सोडा आणि शेतकऱ्यांना त्यांचा हक्क द्या’, कृषी कायद्यांवरुन राहुल गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

Priyanka Gandhi questions to PM Narendra Modi in farmer issue

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.