Prophet Muhammad remarks: अरबांचा दबाव, उत्तर प्रदेश सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये, नुपूर शर्मा, जिंदलनंतर आणखी एक भाजप नेता ताब्यात

भाजप नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर मोदी सरकारवर जगभरातून टीका होतेय. कतार, कुवेत, इराण आदी देशांनी त्यांच्या देशातील भारतीय राजदूतांकडे आपला निषेध व्यक्त केला.

Prophet Muhammad remarks: अरबांचा दबाव, उत्तर प्रदेश सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये, नुपूर शर्मा, जिंदलनंतर आणखी एक भाजप नेता ताब्यात
भाजप युथ विंग नेता हर्षित श्रीवास्तव याला अटक Image Credit source:
Follow us
| Updated on: Jun 08, 2022 | 10:44 AM

कानपूर (उत्तर प्रदेश): अरब देशांचा (Arab Countrites) वाढता दबाव पाहता उत्तर प्रदेश सरकारनं मोहम्मद पैगंबरांविरोधात (Mohammad Paigambar) टिप्पणी करणाऱ्यांविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा, कुमार जिंदल यांच्यानंतर आता आणखी एका भाजपा नेत्याला ताब्यात घेण्यात आलं. भाजपाच्या युथ विंग नेता हर्षित श्रीवास्तव (Harshit Shriwastav) असं त्याचं नाव असून त्याने मोहम्मद पैगंबरांविरोधात वादग्रस्त ट्विट केलं होतं. कानपूर येथील हिंसेनंतर हर्षित श्रीवास्तवने हे ट्वीट केलं होतं. यावरून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सध्या हर्षित श्रीवास्तवनं आपलं ट्वीट सोशल मीडियातून काढून काढलं आहे. मात्र लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी त्याच्यारोधात गुन्हा दाखल झाला असून मंगळवारी पोलिसांनी त्याला अटक केली. धर्माचा अपमान करून शांतता भंग करणाऱ्या कुणालाही क्षमा केली जाणार नाही, अशी भूमिका पोलिसांनी घेतली. हर्षित श्रीवास्तवच्या ट्वीटनंतर मुस्लिम संघटनांनी तीव्र विरोध दर्शवला होता. त्यांनतर पोलिसांनी ही कारवाई केली. सध्या उत्तर प्रदेश पोलीस सोशल मीडियावर करडी नजर ठेवून आहेत.

नुपूर शर्मा आणि कुमार जिंदल यांच्यावरही कारवाई

मोहम्मद पैगंबरांविरोधात टीव्हीवरील एका चर्चे दरम्यान वादग्रस्त वक्तव्य केल्या प्रकरणी उत्तर प्रदेशच्या भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा यांचं प्रथामिक सदस्यत्व भाजपनं रद्द केलं आहे. पक्षाने त्यांच्याविरोधात चौकशीचे आदेश दिले आहे. तसेच भाजपचे मीडिया प्रभारी नवीन कुमार जिंदाल यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे. जिंदाल यांनी याच मुद्द्यावर वादग्रस्त ट्विट केले होते. नुपूर शर्मा आणि नवीन कुमार जिंदाल यांच्या टिप्पणीनंतर अल्पसंख्याक समाजातील लोक संतापले आहेत. याविरोधात शुक्रवारी कानपूरमध्ये रॅली काढण्यात आली. दुकाने बंद करण्याच्या प्रयत्नात दोन समाजात हिंसाचार भडकला. दगडफेक आणि जाळपोळही झाली. काहीजण गंभीर जखमी झाले.

अरब देशांकडून भारतावर टीका

भाजपच्या प्रवक्त्यांनी मोहम्मद पैगंबरांविरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद आखाती देशात पहायला मिळाले. 57 सदस्यीय मुस्लिम देशांची संघटना असलेल्या ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन अर्थात ओईसीपर्यंत (OEC) हे प्रकरण गेलं. भारतीय मुस्लिमांना लक्ष्य करण्याविरोधात संघटनेविरोधात आवाहन केलं गेलं. भाजपविरोधात 6 आखाती देशांच्या संघटनेनंही टीका केली. भाजप नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर मोदी सरकारवर जगभरातून टीका होतेय. कतार, कुवेत, इराण आदी देशांनी त्यांच्या देशातील भारतीय राजदूतांकडे आपला निषेध व्यक्त केला. दरम्यान, भगवान महादेवांचा अपमान सहन न झाल्यानं मी हे वक्तव्य केलं होतं. आता मी माझे शब्द मागे घेत असल्याचं सांगत नुपूर शर्मा यांनी माफीही मागितली आहे. मात्र सध्या तरी पैगंबरांविरोधात टिप्पणी केल्याचा हा वाद अजून शमलेला नाही

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.