Puducherry Floor Test: काँग्रेसच्या आणखी दोन आमदारांचा राजीनामा; पुदुचेरीत सरकारची अग्निपरीक्षा

या दोन आमदारांच्या राजीनाम्यामुळे 33 सदस्यीय विधानसभेत काँग्रेस-डीएमके आघाडीच्या आमदारांची संख्या घटून 11 झाली आहे. | Puducherry Floor Test

Puducherry Floor Test: काँग्रेसच्या आणखी दोन आमदारांचा राजीनामा; पुदुचेरीत सरकारची अग्निपरीक्षा

नवी दिल्ली: देशात काँग्रेसची सत्ता असलेल्या मोजक्या राज्यांपैकी एक असणाऱ्या पुदुचेरीत व्ही. नारायणसामी ( V Narayanasamy) यांचे सरकार सोमवारी अग्निपरीक्षेला सामोरे जाईल. पुदुचेरीत काँग्रेसच्या अनेक आमदारांनी राजीनामे दिले आहेत. त्यामुळे आजच्या बहुमत चाचणीत व्ही. नारायणसामी याचे सरकार पडणार की राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Congress Government’s Numbers Dwindle Day Before Floor Test in Puducherry)

काँग्रसचे आमदार लक्ष्मीनारायण आणि डीएमकेचे आमदार वेंकटेशन यांनी रविवारी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. यापूर्वी काँग्रेसच्या चार आमदारांनी पक्षाला रामराम ठोकला होता. त्यामुळे पुदुचेरी विधानसबेत काठावरचे बहुमत असणारे काँग्रेसचे सरकार धोक्यात आले आहे.

या दोन आमदारांच्या राजीनाम्यामुळे 33 सदस्यीय विधानसभेत काँग्रेस-डीएमके आघाडीच्या आमदारांची संख्या घटून 11 झाली आहे. तर विरोधी पक्षाच्या आमदारांची संख्या 14 झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री नारायणसामी आज बहुमत चाचणीत काही राजकीय चमत्कार करुन दाखवणार का, हे पाहावे लागेल. अन्यथा निवडणुकीआधीच पुदुचेरीतील काँग्रेसचे सरकार कोसळेल.

एप्रिल-मे दरम्यान विधानसभा निवडणूक

या सगळ्या उलथापलथीनंतरही मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी यांनी  सरकार बहुमतात असल्याचा दावा केला आहे. एप्रिल-मे महिन्यात पुद्दुचेरी विधानसभा निवडणूक होत आहे. त्यापूर्वी तिथे मोठ्या राजकीय हालचाली होताना पाहायला मिळत आहेत. पुद्दुचेरी विधानसभेत काँग्रेसचे 10, DMK 3, ऑल इंडिया एन आर काँग्रेस 7, AIDMK 4, भाजप 3 तर 1 अपक्ष आमदार आहे. काँग्रेसच्या 4 आमदारांनी राजीनामा दिला आहे. तर एक आमदार अयोग्य ठरले आहेत. पुद्दुचेरी विधानसभेत बहुमताचा आकडा 15 आहे.

किरण बेदी यांची उचलबांगडी

काही दिवसांपूर्वीच भाजपच्या किरण बेदी यांची पुदुचेरीच्या नायब राज्यपाल पदावरून उचलबांगडी करण्यात आली होती. किरण बेदी यांच्या जागी तेलंगणाचे राज्यपाल तमिलसाई सुंदरराजन यांच्याकडे पुद्दुचेरीच्या उपराज्यपाल पदाचा अतिरिक्त कारभार सोपवला आहे. 10 फेब्रुवारीला राज्याचे मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी यांनी राष्ट्रपती कोविंद यांना पत्र लिहिलं होतं. त्या पत्राद्वारे उपराज्यपालांना परत बोलवण्याची विनंती केली होती. किरण बेदी यांचा कारभार तुघलकी असल्याचा आरोप व्ही. नारायणसामी यांनी केला होता.

इतर बातम्या :

OBC Quota Split | ओबीसी आरक्षणाच्या केंद्रीय यादीचे चार वर्ग होणार, न्या.रोहिणी आयोगाची शिफारस

अमित शाहांना भाजपचा झेंडा शेजारी देशात फडकवण्याची इच्छा, श्रीलंका म्हणतं तुमच्यासाठी दारं बंद

(Congress Government’s Numbers Dwindle Day Before Floor Test in Puducherry)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI